रायगड जिल्ह्यात विधानसभेची भाजपकडे एकही जागा नसताना प्रशांत ठाकूर यांच्या 2014मधील विजयाने पक्षाच्या येथील यशाची सुरुवात झाली होती. त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांच्यासह महेश बालदी आणि रविशेठ पाटील यांनीही विजय मिळवला. ताज्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर तर जिल्ह्यात शेकापचे अस्तित्वच धोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. …
Read More »खारघर येथील राम मंदिर निर्माण निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल : वार्ताहर अयोध्येत उभारण्यात येणार्या प्रभू श्रीराम मंदिराच्या भव्य निर्माणासाठी राम मंदिर निर्माण निधी संकलन अभियान देशभर राबविण्यात येत आहे. सर्व भारतीयांच्या सहभागाने हे भव्य श्रीराम मंदिर साकारण्यात येणार आहे. याचाच भाग म्हणून खारघर येथील राम मंदिर निर्माण निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 15) कोकण म्हाडा मा. सभापती …
Read More »नवी मुंबईत ड्रग्स विक्रीचे रॅकेट
कोट्यवधींची उलाढाल, पोलिसांसमोर मोठे आव्हान नवी मुंबई : रामप्रहर वृत्त 21 व्या शतकातली स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणार्या नवी मुंबईतले ड्रग्स विक्रीचे रॅकेट मोडीत काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. गांजा वगळता इतर इतर सर्व सिन्थेटिक (कृत्रिम) ड्रग्स असून, देश-विदेशात बनवले जात आहेत. हे ड्रग्स थेट मनोविकृतीवर गंभीर परिणामकारक आहेत. त्याची नशा …
Read More »अॅड. मनोज भुजबळ यांची राम मंदिर निर्माणासाठी देणगी
एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश सुपूर्द पनवेल : प्रतिनिधी अयोध्येत उभारण्यात येणार्या भव्य राम मंदिर निर्माणासाठी शनिवारी (दि. 16) पनवेल तालुका अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे पनवेल तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानाच्या …
Read More »वेश्वी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा
ग्रामपंचायत निवडणूक निकाल; तालुक्यात 26 जागांवर भाजपचे उमेदवार; आमदार महेश बालदींकडून अभिनंदन उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील नागाव, केगाव, म्हातवली, चाणजे, फुंडे व वेश्वी या सहा ग्रामपंचायत निवडणूक मतदान मतमोजणी सोमवारी (दि. 18) उरण नगरपरिषदेच्या महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळेत करण्यात आली. या वेळी वेश्वी ग्रामपंचायतीवर सर्वच्या सर्व जागांवर …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकांचा आज लागणार निकाल
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मतदान झालेल्या 78 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि. 18) होऊन निकाल घोषित केला जाणार आहे. त्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने तयारी केली आहे. कोरोनामुळे मतमोजणी ठिकाणी जाण्यास कलम 144 अन्वये प्रतिबंध घालण्यात आला आहे. जिल्ह्यात 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 78 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान …
Read More »‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी जोडणार्या रेल्वेंचा शुभारंभ
अहमदाबाद : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 17) गुजरातच्या केवाडिया येथील ’स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी जोडणार्या आठ रेल्वेंना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वे वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई व प्रतापनगरशी जोडल्या जाणार आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाला एक भारत, श्रेष्ठ भारत हा मंत्र देणार्या सरदार …
Read More »खराब रस्त्यांवरून आव्हाडांचा ठाकरे सरकारला घरचा अहेर
कल्याण : प्रतिनिधी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांची उणीधुणी काढताना दिसतात. त्यावरून बरीच चर्चा रंगते. अशाच प्रकारे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवरून ठाकरे सरकारला घरचा अहेर दिला आहे. कल्याण पश्चिममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 70वा वाढदिवस होणार भव्य अन् संस्मरणीय; विविध समाजोपयोगी कार्यक्रमांची असणार रेलचेल
पनवेल : हरेश साठे गोरगरीब असो वा श्रीमंत सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि सगळा समाज आपला कुटुंब आहे असे मानून नेहमी मदतीचा हात देणारे दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा 70वा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला जातो. यंदाही सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून पण …
Read More »औरंगाबादच्या नामांतरावरून महाविकास आघाडीत बिघाडी; शिवसेना-काँग्रेसमध्ये जुंपली
मुंबई : प्रतिनिधी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याचा मुद्दा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमध्ये उफाळून आला आहे. शिवसेनेकडून वारंवार नामांतराची मागणी केली जात आहे, तर काँग्रेसकडून त्यास सातत्याने विरोध दर्शविला जात आहे. आता याच मुद्द्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला धर्मनिरपेक्षतेवरून टोला लगावला आहे, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper