दहा महिन्यांत मंजुरीपर्यंत पोहोचणारी फायझरची लस आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आली असून तिचे साठ्याचे निकष हा अनेक विकसनशील देशांसाठी मोठा अडथळा ठरतो आहे. ही लस उणे 70 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानात ठेवणे आवश्यक असून भारतासारख्या देशातही अशा सुविधा उपलब्ध नाहीत. देशाच्या कानाकोपर्यात लस पोहोचवणे आवश्यक असल्याने ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका यांच्या लसीकरिता …
Read More »येत्या आठवड्यात सर्वांसाठी लोकल प्रवासाचा मुहूर्त ठरणार?
11-12 डिसेंबरला महत्त्वपूर्ण बैठक मुंबई : प्रतिनिधीमुंबईसह आसपासच्या महानगरातील लोक लोकल कधी सुरू होते याच्या प्रतीक्षेत असताना प्रशासनाकडून मुंबईत लोकल सर्वांसाठी खुली करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्यात या संदर्भात महत्त्वपूर्ण होणार असून, या बैठकीत लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याची तारीख निश्चित होऊ शकते.येत्या आठवड्याच्या शेवटी अर्थात 11-12 डिसेंबरला बैठक …
Read More »‘देशात डिसेंबरअखेर कोरोना लशीला मान्यता मिळेल’
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाच्या संकटाशी सामना करणार्या भारतीयांसाठी एक खूशखबर आहे. भारतात डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळेल, अशी आशा दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केली आहे. देशात सध्या सहा लशींवर काम सुरू आहे. यापैकी दोन लशींचे शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरू असल्याचेही त्यांनी …
Read More »पनवेल मनपाकडून भोकरपाडा प्रकल्पाची पाहणी
लवकरच पाणीपुरवठा होणार सुरळीत पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रामधील पनवेल शहर आणि नवीन पनवेल वसाहतीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 3) महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या भोकरपाडा येथील वॉटर ट्रिटमेंट प्लांटला भेट देऊन पाहणी केली तसेच अधिकार्यांशी चर्चा केली. या …
Read More »ठाकरे सरकार पळ काढतेय : देवेंद्र फडणवीस
मुंबई : प्रतिनिधीराज्यात शेतकर्यांच्या समस्या, मराठा आरक्षणाचा विषय, ओबीसींमधील भीतीचे वातावरण, महिला अत्याचारांच्या वाढत्या घटना या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन किमान दोन आठवड्यांसाठी घेण्याची आम्ही मागणी केली होती, मात्र राज्य सरकारने ती अमान्य करीत केवळ दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे सरकार चर्चेपासून पळ काढतेय, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री …
Read More »महाविकास आघाडीला धक्का
धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीत भाजपचे अमरीश पटेल विजयी धुळे : प्रतिनिधीधुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पटेल यांना 332, तर महाविकास आघाडीकडून निवडणूक लढलेले काँग्रेसचे अभिजित पाटील यांना अवघी 98 मते मिळाली.काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अमरीश पटेल तसेच भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले अभिजीत …
Read More »महडच्या मंदिरात ‘रंगछंद’ची रांगोळी
खोपोली : प्रतिनिधी संकष्टी चतुर्थी निमित्ताने गुरुवारी (दि. 3) खालापूर, चौक, खोपोली, कर्जत, पनवेल, रसायनी या परिसरातील भक्तांनी महड येथील विनायकाचे दर्शन घेतले. कोरोनामुळे गेले काही महिने मंदिरे बंद होती. मंदिर उघडण्यासाठी परवानगी मिळाल्यामुळे अनेक भक्तांनी गुरुवारी आपल्या लाडक्या बाप्पांचे दर्शन घेतले. तर पनवेलच्या ‘रंगछंद‘च्या कलाकारांनी आज गणपती बाप्पांची सुंदर …
Read More »कर्जत तालुका कुस्तीसाठी पोषक -संदीप वांजळे
कर्जत : बातमीदार तालुक्यातील कुस्तीच्या परंपरेला काही दशकांचा इतिहास आहे आणि कुस्तीसाठी येथे पोषक वातावरणही आहे, त्यामुळे कर्जत तालुक्यातील मल्ल राष्ट्रीय पातळीवर चमकतील, असा विश्वास राष्ट्रीय कुस्तीपटू संदीप वांजळे यांनी येथे व्यक्त केला. कर्जत तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष भगवान धुळे यांनी आर्थिक भार उचलून खरेदी केलेल्या मॅटचे लोकार्पण नुकताच अशोक …
Read More »फी कपात करण्यास राठी इंग्लिश स्कूलचा नकार
रोहे : प्रतिनिधी शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या फीमध्ये कपात करण्यास स्पष्ट नकार दिल्याने रोहे येथील जे. एम. राठी इंग्लिश स्कूलच्या फीबाबत निर्माण झालेला तिढा कायम आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या, काहींचे व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशातच ऑनलाइन शिक्षणासाठी पालकांना मोठा खर्च सोसावा लागत आहे. यामुळे पालकांना …
Read More »रोटरी वोकेशनल अवॉर्डने कोविड योद्धे सन्मानित
पनवेल : वार्ताहर रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज यांच्या वतीने रोटरी मेगा हेल्थ सेंटर, आणि ब्लड बँक हॉल यांना खांदा वसाहत येथे रोटरी वोकेशनल अवॉर्डने समाजातील कोविड महामारीत उत्कृष्ट सेवा दिलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात क्लबचे अध्यक्ष रुपेश यादव यांनी राष्ट्रगीताने केली. या पुरस्कारांचे वितरण मुंबईच्या महापौर किशोरी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper