वादळग्रस्त घरे अथवा स्थावर मालमत्ता पुन्हा उभ्या करता येतात. पिकाकरिता वर्षभराची नुकसानभरपाई देऊन भागते. परंतु 40-50 वर्षे वयाचे आंबे वा माडासारखे वृक्ष जेव्हा जमीनदोस्त होतात तेव्हा सारे जीवनमानच ढासळते. पुन्हा तसे झाड उभे करायला काही वर्षे लागतील हे सरकारने लक्षात घ्यावे. पर्यटन व्यावसायिक व मच्छिमारांचाही विचार सरकारने करायला हवा आहे. …
Read More »नुकसानग्रस्तांना भरीव मदत करून दिलासा द्या!
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधीमाजी मुख्यमंत्री तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 11) निसर्ग चक्रीवादळात प्रचंड नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्याचा दौरा केला. या वेळी यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड तसेच श्रीवर्धन तालुक्यातील वादळग्रस्त भागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी श्रीवर्धन येथे आयोजित पत्रकार परिषदेला …
Read More »सिडकोच्या मान्सूनपूर्व कामांची चौकशी करावी
नगरसेविका कुसुम पाटील यांची मागणी; अनियमित व निकृष्ट दर्जाची कामे असल्याचा आरोप कळंबोली : प्रतिनिधी कोरोना महामारीचा फायदा घेत सिडको अधिकारी व ठेकेदार यांनी साटेलोटे करत मान्सूनपूर्व कामांना थुकपट्टी लावण्याचे काम केले आहे. सिडको वसाहतीतील कामे निकृष्ठ दर्जाची करण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली जावून रहिवासींना अनेक समस्यांना सामोरे …
Read More »पोलादपूर : तालुक्यातील पर्यटनक्षेत्र असलेल्या उमरठ, कुडपण आणि महादेवाचा मुरा या गावांतील अनेक घरे, वाडे व शौचालयांचे निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक झाडेही उन्मळून पडली. येथील नुकसानग्रस्त नागरिक शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. (छाया : शैलेश पालकर)
Read More »मुरूड ः राजपुरी कोळीवाड्यात वादळी वार्यामुळे सर्वाधिक बोटी फुटून आर्थिक नुकसान झाले आहे. माजी मुख्यमंत्री तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रायगड दौर्यात या बोटींची पाहणी केली. या वेळी अनेक मच्छीमार बांधव उपस्थित होते.
Read More »शिवशाहीमधील एलईडी चोरणार्यास पोलिसांकडून अटक
पेण ः प्रतिनिधी पेणमधील रामवाडी बसस्थानकात पार्क करून ठेवलेल्या शिवशाही बसमधील एलईडी चोरणार्यास पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादीने त्यांच्या ताब्यातील शिवशाही बस विभागीय कार्यशाळा रामवाडी येथे पार्क केली होती. त्यामधील 4200 रुपयांचा एलईडी डिस्पले आरोपीने चोरून नेला होता. या प्रकरणी सदर आरोपीला 8 जून रोजी रात्री अटक करण्यात आली. याबाबत …
Read More »निसर्ग चक्रीवादळाने हिरावला पशुपक्ष्यांचा निवारा; अन्नाच्या शोधात वन्यप्राणी शिरले मानवी वस्तीत
पाली ः प्रतिनिधी शतकातील सर्वात मोठे आणि भयाण चक्रीवादळ कोकणाने जवळून पाहिले. निसर्गाच्या या प्रकोपातून अनेक दशके सावरणे कठीण आहे. कोट्यवधींची वित्तहानी व त्याजोडीला झालेली मनुष्यहानीदेखील हादरवून टाकणारी आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका मानवजातीलाच नाही, तर येथील पशुपक्ष्यांनाही बसला आहे. आजघडीला पधुधन मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले. वादळात मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने …
Read More »नागोठण्यात मास्क वापराबाबत नागरिक अजूनही उदासीनच
नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या चेहर्यावर मास्क लावावा, असे शासनाकडून बंधनकारक करण्यात आले आहे, मात्र नागोठणेत या आदेशाला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येते. 95 टक्के नागरिक मास्क न लावताच गावभर फिरत असल्याचे चित्र दिसत आहे. नागोठणे शहरात साधारणतः अडीच महिने उलटूनही अनेकांच्या चेहर्याला अद्यापही मास्कचा स्पर्शच …
Read More »नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी; नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांचे आवाहन आ. रविशेठ पाटील यांच्या हस्ते अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप
पेण ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेबरोबरच सुरक्षितता बाळगणेही महत्त्वाचे असल्याचे नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी सांगितले. कोरोनाविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती वाढावी म्हणून आयुष मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार पेण नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांना अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा प्रीतम पाटील बोलत होत्या. या वेळी …
Read More »खोपोलीत तीन कोरोनाबाधित रुग्ण
खोपोली ः प्रतिनिधी मागील आठवड्यात खोपोलीतील एक डॉक्टर व त्यांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आढळली असताना बुधवारी खोपोलीत अजून एक कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. येथील काटरंग भागातील तरुण नोकरीसाठी पळस्पे फाटा येथे दररोज ये-जा करीत होता. त्याला कोरोनासदृश लक्षणे आढळल्यावर त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. बुधवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper