Breaking News

महत्वाच्या बातम्या

मत्स्यदुष्काळाने मच्छीमार हैराण

बोटीवर लावण्यासाठी मोठा मासाही नाही सापडला उरण : रामप्रहर वृत्त : समुद्राच्या खवळलेल्या लाटांचा सामना करीत आपला मासेमारी व्यवसाय करणार्‍या मच्छीमारांकडून समुद्राच्या उसळत्या लाटांचा सामना करीत कुटुंबीयांसह उत्साहात होळी साजरी करण्यात येते, मात्र या वर्षी पडलेल्या मत्स्यदुष्काळामुळे त्यांच्या होळीचा ‘बेरंग’ झाल्याचे दिसून आले. बोटीवर लावण्यासाठीही मोठा मासा मिळाला नसल्याची खंत …

Read More »

उन्हाळ्याच्या सुटीत कोकणात येवा

‘कोरे’तर्फे विशेष रेल्वे गाड्या मुंबई : प्रतिनिधी : उन्हाळ्याच्या सुटीसाठी कोकणात जाणार्‍या प्रवासी, तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य, तसेच कोकण रेल्वे प्रशासनातर्फे 5 एप्रिलपासून एकूण 60 विशेष मेल, एक्स्प्रेस विशेष भाडे आकारून चालविण्यात येतील. पनवेल ते सावंतवाडी आणि पुणे ते सावंतवाडीदरम्यान या विशेष जादा मेल, एक्स्प्रेस धावतील. गाडी क्रमांक 01411 पुणे …

Read More »

पॅन कार्डच्या नियमात होणार मोठे बदल

नागपूर : प्रतिनिधी : प्राप्तिकर विभागाने पॅन कार्डच्या नियमात तीन मोठे बदल केले आहेत. येत्या 1 एप्रिलपासून हे बदल होणार आहेत. पॅन कार्ड आधार कार्डला अद्यापही लिंक केलेले नसेल, तर अनेक अडचणी उद्भवू शकतात. आधारला पॅन न जोडल्यास आयटी कलम 139(ए) अंतर्गत ते निष्क्रिय समजले जाईल. प्रत्यक्ष कर संचालक मंडळांनी …

Read More »

कोल्हापुरात युतीचा मेळावा विक्रमी होणार

चंद्रकांत पाटील यांचा दावा, तयारीचा आढावा कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या प्रचाराचा प्रारंभ येत्या 24 मार्च रोजी कोल्हापुरातील मेळाव्यातून होणार आहे. या मेळाव्याची सभा ही विक्रमी उपस्थितीची राहील आणि त्यातून युतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात वातावरणनिर्मिती केली जाणार असल्याचा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. महाराष्ट्रात युतीला लोकसभेमध्ये 45 जागा …

Read More »

तुकोबांच्या नामघोषाने देहू दुमदुमले

लक्ष लक्ष नेत्रांनी अनुभवला बीज सोहळा श्रीक्षेत्र देहू : प्रतिनिधी : इंद्रायणी तीरावरील वैकुंठस्थान येथे तुकाराम-तुकाराम असा आसमंत दणाणणारा जयघोष…, माध्यान्ही नांगदुरकीच्या वृक्षावर झालेली बेल-लाह्या फुलांची उधळण, अशा अपूर्व उत्साहात लक्ष लक्ष नेत्रांनी बीज सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला. श्री संत तुकाराम महाराजांचा 371 वा बीजोत्सव सोहळ्यासाठी गेल्या दोन …

Read More »

माथेरानमध्ये मालगाडी सुरू करा; स्थानिकांची मागणी

कर्जत : बातमीदार माथेरान हे जगविख्यात पर्यटनस्थळ असून, येथील पर्यटन अबाधित राहण्यासाठी व येथील निसर्गचा र्‍हास होऊ नये म्हणून येथे मोटार वाहनांना बंदी आहे. त्यामुळे येथील स्थानिकांना मालवाहतूक मनुष्यबळावर करावी लागते. पण कालानुरूप मालवाहतुकीकरीता माणसे मिळणे कठीण झाले आहे. यासाठी येथील स्थानिकांनी मालवाहतूक करणारी मालगाडी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी …

Read More »

रायगडात राजकीय घडमोडींना वेग

नाराजांना गोंजारण्याचे प्रयत्न सुरू अलिबाग : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोंडींना वेग आला आहे. इतर पक्षातील नाराजांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना आपल्या पक्षात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आता खर्‍या अर्थाने राजकीय वातावरण तापू लागले आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने विद्यमान खासदार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत …

Read More »

सुनील तटकरे यांचे मधू ठाकूरांपुढे लोटांगण

अलिबाग : प्रतिनिधी सुनील तटकरे यांना अलिबागेत पाऊल ठेवू देणार नाही, अशी भीमगर्जना करणार्‍या काँग्रेसचे माजी आमदार मधू ठाकूर यांना गळाला लावण्यात राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार सुनील तटकरे यशस्वी झाले असून, गुरुवारी धूळवडीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने अलिबागेत आलेल्या सुनील तटकरे यांनी पापांपुढे चक्क लोटांगण घालत निवडणुकीत पाठिंबा देण्याचे आवाहन केले. दोन …

Read More »

भोजनदान व पाणीवाटप उपक्रम

महाड ः चवदार तळे येथे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, दिवंगत एम. एस. जाधव (माजी नगरसेवक पनवेल) प्रतिष्ठान व क्रांतिभूमी विचार मंच महाड यांच्या वतीने भोजनदान व पाणीवाटप उपक्रम राबविण्यात आला. त्याचा प्रारंभ सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद …

Read More »

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी भारताचे जोरदार प्रयत्न सुरू

लंडन : वृत्तसंस्था पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेला हीरे व्यापारी नीरव मोदी याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लंडनमधील सरकारी यंत्रणेने ही कारवाई केली. मोदीच्या अटकेमुळे त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू करता येईल, असा विश्वास भारताच्या परराष्ट्र खात्यामार्फत व्यक्त करण्यात आला आहे. न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे …

Read More »