Breaking News

महत्वाच्या बातम्या

नेरळपाडा येथील रस्ता बंद झाल्याने नागरिकांचे हाल

वाहनचालकांना पर्यायी रस्त्याचा मोठा फेरा; विद्यार्थ्यांना शाळेलाही होणार उशीर कर्जत : बातमीदार नेरळ पूर्व व पश्चिम यांना जोडणारा एकमेव मार्ग म्हणजे पाडा येथील रेल्वे फाटक रस्ता. मात्र नेरळ शहरात सुरू असलेल्या अंतर्गत रस्त्यांच्या कामांमुळे आता नेरळमधील पाडा येथील रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. नेरळ पूर्व भागातील सुमारे 50 च्या वर …

Read More »

मुरूड बांधकाम खात्याची चौकशी करा

समन्वय समितीचे अध्यक्ष जयवंत अंबाजी यांचे आदेश मुरूड : प्रतिनिधी मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम खाते हे बोगस कामांना प्राधान्य देत असून क्वॉलिटी कंट्रोल बोर्डाकडून कोणतेही प्रमाणपत्र न आणता ठेकेदारांना बिल अदा केले जाते.जेव्हा रस्त्याची कामे सुरु असतात तेव्हा मुरुड तालुक्यासाठी दोन अभियंते हे काम सुरु असताना उपस्थित राहत नाही. त्यामुळे …

Read More »

शहिदांच्या कुटुंबीयांना सरकारचा आधार; वीरपत्नी, वीरमाता यांना शेतीयोग्य जमिनीचे वाटप

मुंबई : प्रतिनिधी शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असून, या कुटुंबांना आधार देणे हे राज्य शासनाचे कर्तव्यच असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 8) येथे केले. सह्याद्री अतिथीगृहात शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता यांना शेतीयोग्य जमिनीचे वाटप करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास …

Read More »

पनवेलमध्ये नारीशक्तीला सलाम विविध क्षेत्रांतील महिलांचा मनपातर्फे गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात शुक्रवारी (दि. 8) साजरा झाला. यानिमित्ताने पनवेल महापालिकेच्या वतीनेही नारीशक्तीला सलाम करण्यात आला. हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल आणि नेहा गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण सभापती …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात महिला दिन साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे शुक्रवारी (दि. 8) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयुर्वेद तज्ज्ञ व येरला मेडिकल कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. निरंजन पटेल यांनी महिलांच्या आरोग्यासाठी आयुर्वेद आणि योगाचे महत्त्व विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. डॉ. रत्नप्रभा म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे …

Read More »

लीज डीड सुधारणा योजनेचे सिडकोकडून सादरीकरण

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा : राज्याच्या महसूल व वन विभागाने शासकीय जमिनींसंदर्भात फ्री होल्ड धोरण निश्चित केले व त्या धर्तीवर सिडकोनेदेखील लीजशी संबंधित काही अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने फ्री होल्डप्रमाणे सर्व सुविधा नवी मुंबईतील रहिवाशांना मिळाव्यात म्हणून भाडेपट्ट्याच्या अटी शिथिल करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळामसोर मांडण्यात आला …

Read More »

टीआयपीएलमध्ये महिला कर्मचार्यांचा सन्मान

पनवेल : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून टीआयपीएलच्या पाडेघर येथील कार्यालयात महिला कर्मचार्‍यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करताना कर्मचारी वृंद, दुसर्‍या छायाचित्रात महिला कर्मचार्‍यांनी केक कापून महिला दिन साजरा केला.

Read More »

मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प टप्पा 3-अ : रेल्वेचा ताण कमी होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मुंबई उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करणारा व वाहतुकीसाठी वरदान ठरणार्‍या मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या टप्पा 3-अ ला गुरुवारी (दि. 7) केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 30 हजार 849 कोटींचा खर्च अपेक्षित असून, येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

अमित जाधव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

पनवेल : जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप प्रतोद अमित जाधव यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर,  भाजप जिल्हा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरत, तालुकाध्यक्ष मोतीलाल कोळी, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत आदींनी शुभेच्छा दिल्या. सोबत अनेश ढवळे, प्रविण खंडागळे, ज्ञानेश्वर पाटील, राजेश पाटील, योगेश पाटील …

Read More »

अटल आहार योजनेद्वारे कामगाराना सकस आहार

नागपूर : प्रतिनिधी : राज्यात आतापर्यत 10 लाखावर कामगारांची नोंदणी कामगार मंडळाकडे झाली आहे, मात्र कामगारांची नोंदणी करून न थांबता कामगार हिताची प्रत्येक योजना त्यांच्या पर्यंत पोहोचविण्यात येत आहे. कामगारांना कामाच्या ठिकाणी  सकस आहार नाममात्र पाच रुपयात अटल आहार योजनेद्वारे देण्यात येईल. अटल आहार योजनेच्या माध्यमातून कामगारांच्या आयुष्यात परिवर्तन होईल, …

Read More »