Breaking News

महत्वाच्या बातम्या

हाऊज द जोश! टीम इंडियाने घातल्या आर्मीच्या कॅप

रांची : वृत्तसंस्था पुलवामामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना सलाम करण्यासाठी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या सामन्यापूर्वी आर्मीच्या कॅप परिधान केल्या. माजी कर्णधार व लोकल बॉय महेंद्रसिंह धोनीने खेळाडूंबरोबरच सहाय्यक स्टाफलाही हा कॅप्सचे वाटप केले. त्याचबरोबर देशवासियांनी राष्ट्रीय संरक्षण निधीला सढळ हस्ते मदत करावी, जेणेकरून शहीद जवानांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळू शकेल, …

Read More »

मोदींमुळे भारताच्या शक्तीची जगाला ओळख खासदार किरीट सोमय्या यांचे प्रशंसोद्गार

पनवेल : प्रतिनिधी अभिनंदनची बिनशर्त सुटका पाकिस्तानला करायला लावून प्रधान मंत्री नरेंद्र मोदींनी आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि उत्तम नेतृत्व कसे असते हे जगाला दाखवून दिले असल्याचे खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी (दि. 6) खारघर येथे झालेल्या बुद्धिजीवी संमेलनात सांगितले. खारघर येथील सरस्वती इंजिनियरिंग कॉलेजमध्ये सायंकाळी 6 वाजता भाजपच्या रायगड जिल्हा बुद्धिजीवी …

Read More »

अद्ययावत महाड बसस्थानकामुळे कोकणच्या विकासात भर -गीते

महाड : प्रतिनिधी महाड येथील एसटी स्थानक हे कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा दुवा असून या ठिकाणी सुंदर अद्ययावत बसस्थानक उभे राहणे गरजेचे होते. महाड येथील अद्ययावत एसटी बसस्थानक हे कोकणाच्या वैभवात व विकासात भर टाकेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री अनंत गीते गुरुवारी (दि. 7) यांनी महाड येथील नूतन एसटी …

Read More »

रायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती

पनवेल : रामप्रहर वृत्त ऑगस्ट 2017 मध्ये शासनाची मंजुरी मिळूनदेखील सुरक्षा रक्षकांची भरती न करणार्‍या सुरक्षा मंडळाला सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणी वजा सूचना केल्यानंतर मार्चअखेर एक हजार सुरक्षा रक्षकांची भरती करण्याचे रायगड सुरक्षा मंडळाने ठरविले आहे. रायगड सुरक्षा मंडळामध्ये मुख्य मालक म्हणून नोंदीत आस्थापनांना, मंडळाचे सुरक्षा रक्षक …

Read More »

जम्मू बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला; 1 ठार, 30 जखमी

जम्मू : वृत्तसंस्था जम्मूमधील बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. बसस्थानकावरील तिकीट खिडकीच्या दिशेने ग्रेनेड टाकण्यात आला होता, यानंतर मोठा स्फोट झाला. गुरुवारी (दि. 7) सकाळी 12 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात 30 जण जखमी झाले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ग्रेनेड टाकण्यात आला तेव्हा सुदैवाने बसस्थानकावर …

Read More »

महाराष्ट्रात विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक अशक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; चर्चेला पूर्णविराम नागपूर : प्रतिनिधी महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय आज रात्री घेण्यात येईल आणि लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूक होईल, अशी चर्चा गुरुवारी (दि. 7) सकाळपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून बरेच तर्कवितर्कही लढवले जाताहेत, परंतु हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे …

Read More »

ट्रकखाली चिरडून एकाचा मृत्यू

पनवेल : वार्ताहर तळोजा येथील टी.सी.आय.एक्स्प्रेस कंपनीत घडलेल्या विचित्र अपघातात एका ट्रकचालकाचा त्याच्याच ट्रकखाली येऊन दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. श्याम अशोक धुसाणे (38) असे या ट्रकचालकाचे नाव आहे. या घटनेला दुसरा ट्रकचालक जबाबदार असल्याचे तपासात आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील मृत ट्रकचालक श्याम धुसाणे …

Read More »

निरामय हॉस्पिटलतर्फे तळोजा कारागृहात व्याख्यान

खारघर : रामप्रहर वृत्त : खारघर येथील निरामय हॉस्पिटलतर्फे तळोजा कारागृहातील पोलीस महिलांचे मानसिक, शारीरिक आरोग्य स्वस्थ राखण्यासाठी कारागृहाच्या संकुलात बुधवारी (दि. 6) एका प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आयोजित कार्यक्रमात निरामय हॉस्पिटलतर्फे  आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कॉर्पोरेट ट्रेनर तरन्नुम डोब्रियाल यांनी ’शारीरिक व मानसिक संतुलन’यावर मार्गदर्शन केले.  रोजचा …

Read More »

गाडीच्या डिक्कीतून 82 हजार रुपयांची चोरी

पनवेल : बातमीदार : धान्य विक्रीचा व्यवसाय करत असलेल्या एका व्यापार्‍याच्या दुचाकी गाडीच्या डिक्कीतून चोरट्यांनी 82 हजार रुपये लंपास केले आहेत. शहर पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.रमनीकलाल लालाजी देडीया (64) यांनी दुकान बंद करून दिवसभरात झालेल्या व्यवसायाचे 82 हजार रुपये त्यांनी चेन असलेल्या बॅगेमध्ये ठेवून ते दुकान बंद करून …

Read More »

नवी मुंबईकरांसाठी पाताळगंगेचे पाणी

मोरबे प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणीसाठी प्रस्ताव आयआयटीकडे नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : नवी मुंबईची पुढील 20 वर्षांनंतरही तहान भागविण्यासाठी पालिका प्रशासनाने आताच तयारी केली आहे. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात पातळगंगा नदीतून पाणी उचलून ते मोरबेत टाकण्यासाठीचा प्रकल्प प्रस्तावित असून यासाठी 282 कोटींची तरतूद केली आहे. या योजनेची व्यवहार्यता तपासण्यासाठी प्रस्ताव …

Read More »