Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

न्हावा खाडी येथे मंदिराचे भूमिपूजन

उरण : रामप्रहर वृत्त  : न्हावा खाडी येथे ह्मश्वेश्वर देवाचे मंदिर उभारण्यात येणार आहे. या मंदिराच्या कामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 7) करण्यात आले. या वेळी माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर, माजी उपसरपंच चंद्रकांत भोईर, अरुण ठाकूर, अध्यक्ष सी. एल. ठाकूर, …

Read More »

रस्त्यावरील फांद्यांचा वाहनांना फास

रसायनी : प्रतिनिधी  : दांड-रसायनी रस्त्यावर झाडांच्या फांद्या वाढलेल्या असून त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. यामुळे वाहनचालक हैराण झालेले असून झाडांच्या वाढलेल्या फांद्यांमुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परिसराने वेढलेला भाग असल्याने या परिसरात येण्याजाण्याकरिता दांड-रसायनी रस्त्याचाच वापर केला जातो. या रस्त्यावरून …

Read More »

विवाह नोंदणी प्रमाणपत्रच नाही

कशी करणार नव्या जीवनाची सुरुवात? पनवेल : प्रतिनिधी  : विवाह नोंदणी प्रमाणपत्र न दिल्याने नव्या जीवनाची सुरुवात नव्या विचाराने कशी करणार, असा प्रश्न रायगड जिल्हा धर्मादाय संस्था अंतर्गत 9 मे रोजी 2018 रोजी अलिबाग तालुक्यातील झिराड येथील तपस्वी रामजी लक्ष्मण घरत समाज मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह …

Read More »

भाजपच्या नगरसेवकांची सभापतिपदी बिनविरोध निवड ; पनवेलच्या चार प्रभाग समित्यांचा कारभार तरुणांच्या हाती

पनवेल/कामोठे ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे तरुण तुर्क उमेदवार शत्रुघ्न काकडे, संजय भोपी, गोपीनाथ भगत व तेजस कांडपिळे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे प्रभाग समित्यांचा कारभार आता प्रथमच युवकांच्या हाती आला आहे.  प्रभाग सभापतिपदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. सकाळी 11 वाजता  आयुक्त गणेश देशमुख …

Read More »

कोकण रेल्वे धावणार सुसाट

पनवेल : नितिन देशमुख : कोकण रेल्वेचा प्रवास सुरक्षित व जलद व्हावा, यासाठी पाच नवीन क्रॉसिंग स्टेशन उभारण्यात येत असून, यामध्ये रायगड जिल्ह्यातील इंदापूर रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.  तेथे क्रॉसिंग स्टेशन उभारण्याचे काम वेगाने सुरु असून, या वर्ष अखेर ते पूर्ण होईल. सुधारित स्थानकात प्रतीक्षा गृह, आरक्षण कक्ष व इतर …

Read More »

सिडकोकडून महापालिकेकडे भूखंडांचे हस्तांतरण

पनवेल : बातमीदार  : महापालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोकडून महापालिकेकडे वेगवेगळ्या सोयीसुविधांचे हस्तांतरण सुरू आहे. पनवेल महापालिकेला सिडकोतर्फे खारघरमधील 17 बाजारतळांचे भूखंड आणि पनवेलमधील बगिचा आणि मैदानांसाठी आरक्षित ठेवलेले 48 भूखंड हस्तांतरित करण्यात येणार आहेत. महापालिकेने पैसे अदा केले असून पुढील तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे. शहरांचे शिल्पकार असलेल्या सिडकोने शहरे वसवून नागरिकांना …

Read More »

बांधकाम मजुरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

मनपाच्या इमारतीचे काम करताना कामगारांचे जीव टांगणीवर नवी मुंबई : प्रतिनिधी एकीकडे नवी मुंबई परिसरात चाललेल्या खाजगी इमारतीच्या बांधकामांवर काम करताना बांधकाम मजूर सुरक्षात्मक साहित्य वापरत आहेत, परंतु या उलट मनपाच्या इमारतीचे काम करत असताना मात्र बांधकाम मजूर सुरक्षात्मक साहित्य न घेता काम करत असल्याने भरउन्हात जर एखाद्या कामगाराला भोवळ …

Read More »

शहरात शुद्ध पाण्याचा काळा धंदा जोरात

पनवेल : बातमीदार शहराच्या अनेक भागांत विनापरवाना पाणी विक्रेते मिनरल वॉटरच्या नावाखाली साधे पाणी विकत आहेत. त्यामुळे पनवेलकर पैसे मोजून आजार विकत घेताहेत. नफा कमावण्यासाठी शहरात शुद्ध पाण्याचा काळा धंदा जोरात सुरू आहे. शहर व ग्रामीणच्या अनेक भागात विनापरवाना पाणी विक्रेते मिनरल वॉटरच्या नावाखाली साधे पाणी विकत आहेत. अन्न व …

Read More »

तीन गाड्यांची धडक; एक ठार

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे मुंबई लेनला 7-700 किमी अंतरावर एका उभ्या इको गाडीला पाठीमागून आलेल्या टाटा मांझा, आयशर टेम्पो व टाटा टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक व्यक्ती ठार झाल्याची घटना पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कोणत्याही …

Read More »

चार मतदान केंद्रांच्या अध्यक्षांवर कारवाई

पनवेल : बातमीदार मतदान केंद्रांवर कामात हलगर्जी केल्याबद्दल चार केंद्राध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातील चार वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर घडलेल्या प्रकारामुळे पनवेलच्या क्षेत्रीय अधिकार्‍यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. 29 एप्रिल रोजी मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदानप्रक्रिया झाली. पनवेल विधानसभा मतदारसंघात राज्यातील सर्वात जास्त …

Read More »