पनवेल ः बातमीदार खारघर येथील मराठी फाऊंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही शनिवारी (दि. 6) गुढीपाडवा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. गुढीपाडवा जल्लोष 2019 या पारंपरिक कार्यक्रमास अनेक नामांकित संस्थांनी आर्थिक पाठिंबा दिला आहे. अपोलो हॉस्पिटल, निसर्ग निर्माण डेव्हलपर्स, अॅरोहेड सर्व्हिसेस आणि कॉप्स सिक्युरिटी सर्व्हिसेस यांसारख्या संस्थांनी प्रायोजक म्हणून हातभार लावला आहे. खारघर …
Read More »तिघा भामट्यांकडून फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पनवेल : बातमीदार शहरातील एका 56 वर्षीय इसमाकडून इन्शुरन्ससाठी घेतलेले पैसे इन्शुरन्स कंपनीत न भरता तब्बल 21 लाखांची फसवणूक केली आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रमेश नारायण गायकवाड हे महात्मा फुले रोड, पनवेल येथे राहत असून त्यांचा रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. 2007 मध्ये दीपक शेळके …
Read More »प्रवीण गोंधळी यांचा वाढदिवस
गव्हाण ः स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे अकाऊंटंट प्रवीण गोंधळी यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रवीण गोंधळी यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Read More »सायन-पनवेल टोलनाका कंत्राटदाराला हटविले
पनवेल ः बातमीदार सायन-पनवेल महामार्गावरील टोलनाका हस्तांतरणाचा तिढा अखेर सुटला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला कायदेशीरपणे हस्तांतरण करण्यास अडथळे आणणार्या डी. आर. सर्व्हिसेस या कंत्राटदाराला मंगळवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ’बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर रुंदीकरण करून काँक्रिटीकरण केलेला सायन-पनवेल टोलनाका सुरू झाल्यापासूनच वादात आहे. …
Read More »पाणी वाचविण्यासाठी जनहित याचिका दाखल करणार
अधिकार्यांच्या दुर्लक्षाने लाखो लिटर पाणी वाया पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत पाणीटंचाई असताना नवीन पनवेलमधील सेक्टर 15मधील शांतिवन असोसिएशनच्या बाजूने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची गेलेली पाण्याची पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटलेली असल्याने त्या लाइनमधून 24 तासांत हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे 35 वर्षांपूर्वीच्या बिल्डिंगला धोका होऊ शकतो. त्याबाबत तक्रार …
Read More »वावंजे गावाजवळ महिलेची हत्या
पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यातील वावंजे गावाजवळील हाजीमलंगच्या पायथ्याशी एका अनोळखी महिलेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 असून, तिचा गळा ओढणीने आवळून, तसेच तीला गंभीर जखमा करून मारण्यात आले असल्याचे पोलिसांनी …
Read More »पेंधर गावात ‘देव घरा आयला’ नाट्यप्रयोगास रसिकांचा उदंड प्रतिसाद
चिरनेर : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील पेंधर येथे श्री विठ्ठल- रखुमाई उत्सव सोहळ्यानिमित्त नवी मुंबईतील नाट्य कलाकारांच्या अभिनयाने सजलेला आणि जयभवानी थिएटर्स प्रस्तुत, देव घरा आयला या आगरी-कोळी बोली भाषेतील नाट्यप्रयोग सादर झाला. त्यास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पनवेल तालुक्यातील पेंधर गावामध्ये नवी मुंबईतील नाट्य कलाकरांनी जय भवानी थिएटर्सच्या बॅनरखाली यानित्तिाने …
Read More »ग्रंथालय प्रमाणपत्र प्रशिक्षण
उरण : रामप्रहर वृत्त येथील कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात ग्रंथालय प्रमाणपत्र प्रशिक्षण देण्यात येत आहे. महाविद्यालयातील महिला विकास कक्ष, व्यवसाय मार्गदर्शन सेल, तसेच रायगड जिल्हा वाचनालय संघ व गोपाळकृष्ण वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल ते 15 जून या कालावधीत शासन मान्यताप्राप्त हे प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्ग विद्यार्थ्यांसाठी …
Read More »सोसायटीतील रहिवाशांची समस्या झाली दूर , नगरसेवक संजय भोपी यांचे प्रयत्न यशस्वी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्र 15, खांदा कॉलनीतील सेक्टर 7मधील श्रीजी संघ सोसायटीतील नागरिकांना सोसायटीच्या आवारातील ट्रान्सफार्मरमुळे जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागत होते. गेली 13 वर्षे एमएसईबीकडे सोसायटीतील पदाधिकारी ट्रान्सफार्मर शिप्टींगसाठी पाठपुरावा करत होते, परंतु एमएसईबी प्रशासन प्रतिसाद देत नव्हते, तसेच कामास दिरंगाई करीत होते. …
Read More »‘त्या’ खुनाचा उलगडा करण्याचे पोलिसांपुढे आव्हान
पनवेेल : वार्ताहर पनवेलजवळील पळस्पे ते जेएनपीटी या एनएच 4 बी महामार्गावर डोंबाळे कॉलेजसमोर असलेल्या पुलाखाली 15 दिवसांपूर्वी एका इसमाचा अज्ञात कारणावरून अज्ञात आरोपींनी खून केला होता. या खुनाचा अद्यापही उलगडा न झाल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोेद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक (गुन्हे) निशिकांत विश्वकार व त्यांचे पथके …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper