गावात सॅनिटायझर फवारणी; रुग्णांच्या कुटुंबीयांना मदत उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत बांधपाडा (खोपटे) हद्दीत कोविड 19च्या रुग्णात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रथम संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली, तसेच गावातील रुग्णांना धीर देत, त्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत म्हणून ग्रामपंचायतीने मोफत किराणा सामान व धान्य वितरण करण्यास सुरुवात …
Read More »जांभिवली गावातील आदिवासींना अन्नधान्य वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप पनवेल-उरण विभाग उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष व रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश सदाशिव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त जांभिवली येथील आदिवासीवाडीत अन्नधान्य वाटप करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात गोरगरीबांना मदत करण्याच्या उद्देशाने व वाढदिवसाचे औचित्य साधून राकेश गायकवाड यांनी त्यांच्या मित्र व परिवारासमवेत जांभिवली येथील आदिवासींना अन्नधान्य …
Read More »पाण्याची फुटलेली पाइपलाइन त्वरीत बदला
नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील सेक्टर 1एसमध्ये असलेली पाण्याची फुटलेली पाइपलाइन त्वरित बदलण्यात यावी अथवा दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांनी केली आहे. यासंदर्भातील पत्र त्यांनी सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाकडे व एमजीपीच्या (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) नवीन पनवेलमधील …
Read More »मुस्लिम बांधवाने केले हिंदु बांधवाचे अंतिम संस्कार
ऐक्याचे अनोखे प्रतिक पनवेल : वार्ताहर एक मुस्लीम बांधव हिंदू बांधवाच्या मदतीला धावून जात अंतिम संस्कार हिंदू पद्धतीने करून एक अनोखे ऐक्याचे प्रतिक पनवेलकरांसाठी त्याने दाखवून दिले आहे. पनवेल येथे राहणारे व खारघर येथे व्यवसाय करणारे सैय्यद खान लकी (रा. तवा हॉटेल, हिरानंदानी, खारघर) यांना व खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ …
Read More »‘क्रांतिज्योत’तर्फे परिचारिकांचा सन्मान
पनवेल : वार्ताहर पनवेलमधील नेहमीच महिलांसाठी कार्यरत असणारी एकमेव संस्था ती म्हणजे क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशन होय. महिलांना न्याय आणि सन्मान मिळवून देणारी ही संस्था आहे. संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष रुपाली शिंदे यांनी जागतिक परिचारिका दिनानिमित्त फाऊंडेशनतर्फे परिचारिकांना सन्मानित केले. कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमध्ये परिचारिका आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. …
Read More »नगरसेविका सीता पाटील यांच्याकडून खांदा कॉलनी मास्क व धान्यवाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त वाढत्या कोरोनामुळे राज्यात कडक निर्बंध लागू आहेत. त्यामूळे सर्व सामान्य लोकांचे नागरिकांचे हाल होत आहेत. ह्या परिस्थितीत खांदा कॉलनी परिसरातील प्रभाग 15 मधील भाजप ओबीसी महिला मोर्चा उत्तर रायगड अध्यक्ष तथा नगरसेविका सीता पाटील यांनी प्रभाग 15 मधील रहिवाशांना मास्कचे वाटप केले. या वेळी प्रभागातील गरीब …
Read More »सराईत मोबाइल चोर गजाआड
पनवेल : वार्ताहर रेल्वेतून प्रवाश्यांचे मोबाइल चोरणार्या सराईत मोबाइल चोरट्यास वाशी रेल्वे पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून 41,500 रुपयांचे तीन मोबाइल हस्तगत केले आहेत. मोहम्मद आजम इस्राईल शाह उर्फ मुन्ना (वय 22) असे याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मुंबईतील नागपाडा येथील मदनपुरा येथील रहिवाशी आहे. वाशी रेल्वे …
Read More »मोटरसायकल, रिक्षा, लॅपटॉप व मोबाइल चोरणारी मुले ताब्यात
लाखोंचा मुद्देमाल जप्त पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात गेल्या काही दिवसापासून रिक्षा, लॅपटॉप तसेच मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना (विशिष्ट परिस्थितीत गुन्ह्याचे कृत्य करणारी मुले) ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत तीन लाख आठ …
Read More »पनवेल महानगरपालिकेने ओलांडला एक लाख कोविड लसीकरणाचा टप्पा
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेने एक लाख कोविड लसीकरणाचा टप्पा ओलांडला असून आत्तापर्यंत एक लाख एक हजार 75 लसींचे डोस नागरिकांना देण्यात आले आहे. आजपर्यंत 76 हजार 755 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी 10 हजार 877, पहिल्या फळीतील कर्मचारी 7 हजार 66, ज्येष्ठ नागरिक 34,327, कोमॉर्बिड 19 …
Read More »कोरोना रुग्णांसाठी ‘दिशा’दूत; नातेवाइकांना हॉस्पिटलमधील बेड्सबाबत माहिती देण्याचा उपक्रम
पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या दुसर्याला लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे बेड उपलब्ध होणे दुरापास्त झाले आहे. ऑक्सिजन अतिदक्षता विभाग, त्याचबरोबर व्हेंटिलेटर याच्या शोधार्थ नातेवाइकांना वणवण करावी लागते. त्यांची गैरसोय दूर व्हावी म्हणून त्यांना बेडबाबत माहिती उपलब्ध व्हावी, तसेच रुग्णालयाचे संपर्क क्रमांक मिळावेत या उद्देशाने कामोठे येथील दिशा मंचच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper