आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष प्रशिक्षण विभागाच्या वतीने आयोजित पनवेल परिसरातील मंडलनिहाय प्रशिक्षण वर्गांचा रविवारी (दि. 22) समारोप झाला. या दोन दिवसीय उपक्रमामध्ये विविध विषयांवर विचारविनिमय करून आगामी काळातील वाटचालीबद्दल दिशा ठरविण्यात आली. अखेरच्या सत्रात उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »‘सायबर क्राईम रोखण्यासाठी सतर्कता महत्त्वाची’
पनवेल : वार्ताहर सायबर गुन्हेगारी वाढत चालली आहे. वेगवेगळ्या मार्गाने लोकांची फसवणूक होत आहे. हे सर्व मोबाइल, ई-मेल, व्हॉट्सअॅप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे. हे टाळण्यासाठी सर्वांनी सतर्कता बाळगणे व आपले सर्व व्यवहार गोपनीयतेने करणे गरजेचे असल्याचे मत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी व्यक्त केले. परिमंडळ …
Read More »रायगड जिल्ह्यात 85 नवे कोरोना रुग्ण
पनवेल ः रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 21) नवे 85 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 80 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 59 व ग्रामीण सात) तालुक्यातील 66, अलिबाग पाच, कर्जत व पेण प्रत्येकी चार आणि खालापूर, माणगाव, रोहा, सुधागड, श्रीवर्धन व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सुदैवाने दिवसभरात …
Read More »पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सय्यद अकबर यांची फेरनिवड
पनवेल : वार्ताहर – पनवेल प्रेस क्लबची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 21) संस्थापक विजय कडू, संतोष घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी नवीन कार्यकारिणीची जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी साप्ताहिक कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांची चौथ्यांदा, तर राज भंडारी यांची सरचिटणीसपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे. याशिवाय …
Read More »भाजपच्या मंडलनिहाय प्रशिक्षण वर्गांचे उद्घाटन; मान्यवरांकडून मार्गदर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रशिक्षण विभागाच्या वतीने मंडलनिहाय प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पनवेल शहरसाठी आयोजित वर्गाचे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल ग्रामीण व खारघर मंडलांच्या वर्गाचे आमदार महेश बालदी आणि कामोठे मंडलसाठी आयोजित वर्गाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते …
Read More »राज्यातील सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तशैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 20वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण …
Read More »खांदा वसाहत परिसरातून तिघांना अग्नीशस्त्रासह अटक
पनवेल : वार्ताहर खांदा वसाहत परिसरातून तीन व्यक्तींना अग्नीशस्त्रासह नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने गजआड केले असून त्यांच्याकडून जवळपास एक लाख पाच हजार 600 रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. पनवेल परिसरातील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये विनापरवाना बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळगणार्या व्यक्तींविरूध्द विशेष मोहीम राबवुन कारवाई करण्याची मोहीम …
Read More »करंजाडे येथे पाण्याचा पंप कार्यन्वित
भाजपचे किरण मुंबईकर यांच्या प्रयत्नांना यश पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे नोड मधील सेक्टर 2 येथे सिडकोच्या जलकुंभामध्ये एकूण 4 पंप 75 एचपीचे असून, काही दिवसांपुर्वी तिसरा एचपी पंप बंद पडला होता. ही बाब भाजपचे पनवेल तालुका चिटणीस किरण मुंबईकर यांनी सिडकोच्या निदर्शनास आणून दिली. तसेच पंपावर मोटार बसविण्यात येण्याची …
Read More »सोनसाखळी चोरणारी टोळी जेरबंद
पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात तसेच नवी मुंबईत सोनसाखळी चोरीप्रकरणी धुमाकूळ घालणार्या एका सराईत गुन्हेगारी टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाला यश आले असून त्यांच्यामुळे 20 पेक्षा जास्त गुन्हे उघडकीस आले आहेत. पनवेलसह नवी मुंबई परिसरातील सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ वाढला होता. याबाबत गुन्हे शाखा युनिट 2चे वरिष्ठ पोलीस …
Read More »रायगडात 126 नवे कोरोना रुग्ण
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 19) नवे 126 कोरोना पॉझिटिव्ह व एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. तर 159 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 85 व ग्रामीण 17) तालुक्यातील 102, अलिबाग आठ, रोहा सहा, खालापूर, पेण, माणगाव येथे प्रत्येकी दोन, उरण, कर्जत, श्रीवर्धन, महाड तालुक्यातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper