Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

अपघातात तरुणाचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्त दुचाकीवरुन जाताना रस्त्याच्या बाजूला धडक बसल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. विपुल नाईक असे या तरुणाचे नाव असून तो शहरातील ब्रिज खालील रस्त्यावरुन मोटरसायकलने जात असताना विजय सेल्स समोरील रस्त्यातील बाजूला गाडीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात तो गंभीररित्या जखमी तो मयत झाला आहे. या …

Read More »

नवी मुंबईत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; नियमांचे उल्लंघन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरातील एपीएमसीतील बाजारपेठ गजबजली असून, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे वारंवार आवाहन करूनही नागरिक बाजारपेठांमध्ये गर्दी करत असल्याचे चित्र बाजारपेठांत दिसत आहे. विविध रंगाचे आकाश कंदील, देशी …

Read More »

उरणमध्ये दिवाळीनिमित्त विविध स्पर्धा

उरण : वार्ताहर उरण शहरातील बोरी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने दिवाळी निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे नंदन पानसरे, सुरेश साळुंखे यांनी दिली. स्पर्धा बोरी गावं मर्यादित असेल. स्पर्धेचे दिनांक रविवारी (दि.15) सायंकाळी 4 वाजता असेल. या स्पर्धांमध्ये किल्ला बनविण्याच्या स्पर्धेत स्पर्धकांनी रायगड किल्याची प्रतिकृती तयार …

Read More »

आंतरराष्ट्रीय वेबिनार उत्साहात

पनवेल : वार्ताहर भारती विद्यापीठ व्यवस्थापन आणि संशोधन महाविद्यालयाच्या मानव संसाधन क्लब आणि एबीएलई, नवी मुंबई ह्यांनी संयुक्तरित्या  कोविड आणि कोविड नंतरच्या मानव संसाधन रणनीती ह्या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले. आयोजित वेबिनारची सुरुवात राष्ट्रगीतापासून करण्यात आली. ह्या वेबिनारसाठी रिलैअन्स डिजिटल ह्या कंपनीचे ज्येष्ठ उपाअध्यक्ष अ‍ॅण्ड मानव संसाधन प्रमुख …

Read More »

कर्नाळा अभयारण्यात पक्षी संमेलन रंगले

पनवेल ः वार्ताहर राज्यात 5 ते 12 नोव्हेंबरदरम्यान प्रथमच पक्षी सप्ताह आयोजित केला जात आहे. त्यानिमित्ताने सोमवारी (दि. 9) पनवेलजवळील कर्नाळा अभयारण्यातही पक्षी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे वन्यजीव विभागांतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी कर्नाळा पक्षी अभयारण्य यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आले होते. पक्षी संमेलनास वनविभाग अलिबाग, सामाजिक वनीकरण पनवेल, …

Read More »

भिंगारी येथील पाइपलाइनचे काम सुरू; भाजपला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीमधील भिंगारी कांदेवाडी परिसरामधील पाण्याची पाइपलाइन काही ठिकाणी फुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. या संदर्भात भाजप नगरसेवकांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, या पाइपलाइनचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांची पाणीटंचाईच्या समस्येतून लवकरच सुटका होणार आहे. माजी उपमहापौर व …

Read More »

खांदा कॉलनीतील बंद लाईट सुरू करा! भाजप नगरसेवक आक्रमक; सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांची घेतली भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी विभागात आसुडगाव सेक्टर 3, 4, 5 सहित खांदा कॉलनीमधील रस्ते व गार्डनच्या लाईट बंद आहे. या संदर्भात भाजपच्या नगरसेवकांनी बुधवारी (दि. 11) बेलापूर येथील रायगड भवनमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये भाजप तर्फे बंद असलेल्या लाईट त्वरित चालू कराव्या अन्यथा आम्ही दिवाळी …

Read More »

रायगडात 98 नवे कोरोना पॉझिटिव्ह; एक जणाचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटत असून, बुधवारी (दि. 11) नव्या 98 रुग्णांची आणि एक जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 125 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 52 व ग्रामीण 14) तालुक्यातील 66, माणगाव नऊ, खालापूर सात, महाड पाच, रोहा चार, कर्जत व …

Read More »

‘रामप्रहर’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

पनवेल : दै. रामप्रहरच्या दिवाळी अंकाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी प्रकाशन करण्यात आले. या वेळी महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, ‘रामप्रहर’चे मुख्य संपादक देवदास मटाले, मार्केटिंग व्यवस्थापक दादाराम मिसाळ, …

Read More »

कर्नाळा पक्षी अभयारण्य आजपासून पर्यटकांसाठी खुले

पनवेल : कर्नाळा पक्षी अभयारण्य सात महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार व वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार नियम व अटी-शर्तींचे पालन करून अभयारण्य 12 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.

Read More »