Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

कोरोना रोखण्यासाठी भाजप कार्यरत

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नाने प्रतिबंधात्मक फवारणी पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी प्रभाग क्रमांक 18 परिसरासाठी अ‍ॅण्टी कोरोना फवारणी तसेच तेथील रहिवाशांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी जास्त लांब जाण्याची आवश्यकता पडू नये, यासाठी जनसंपर्क कार्यालयाजवळ भाजीपाला विक्री केंद्र सुरू …

Read More »

उलका फिशेरीजचे गोरखशेठ रोखले यांच्याकडून शासकीय रुग्णालयास किट

पनवेल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी उलका फिशेरीजचे गोरखशेठ रोखले यांच्याकडून शासकीय रुग्णालयास तीन व्हेंटिलेटर, चार फ्रिज, 15 सीरीन पंप, एक एबीजी मशीन, 175 पीपी किट देण्यात आले. याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

Read More »

अन्नदान पुरवठा मदत केंद्राचा 2300 लोकांनी घेतला लाभ

उरण : प्रतिनिधी उरणमध्ये तहसीलदारांच्या अधिपत्याखाली अन्नदान पुरवठा मदत केंद्रात सोमवारी मजूर, झोपडपट्टीवासीय गरीब गरजू आणि गावाकडे निघालेल्या अशा सुमारे 2300 लोकांना 2500 क्विंटल धान्य वाटप करण्यात आल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे. उरण तालुकास्तरीय सनियंत्रण समितीच्या माध्यमातून तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, उरण …

Read More »

आदिवासींना धान्य वाटप

पनवेल : प्रतिनिधी पनवेलचे सहायक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे आणि खारघरच्या शाश्वत फाउंडेशनच्या वतीने नऊ आदिवासी वाड्यांवर आठ दिवस पुरेल एव्हढे धान्य वाटप करण्यात आले. जीवनावश्यक वस्तूंचे 275 किट मोठ्या गोण्या भरून आदिवासी वाडीवर नेण्यात आले. यामध्ये कर्नाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या दहा आदिवाशी वाड्यांवर सामानाचे वाटप करण्यात आले. पनवेल तालुका पोलीस …

Read More »

भाजपच्या शेखर तांडेल यांच्याकडून मदत

उरण : वार्ताहर आमदार महेश बालदी मित्र मंडळाचे  युवा नेते  तथा नवघरचे माजी सरपंच शेखर प्रकाश तांडेल यांच्या वतीने सोमवारी (दि. 30)  नवघर गावाजवळील झोपडपट्टीत धान्य वाटप करण्यात आले.  या वेळी उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, उरण नागरी  संवक्षण दलाचे सहायक उपनिरीक्षक एम. के. म्हात्रे यांच्या उपस्थीतीत धान्य वाटपाचा कार्यक्रम झाला. …

Read More »

रायगडात दोन डॉक्टरांचे राजीनामे

जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार; कोरोना कक्षात लावली होती ड्यूटी अलिबाग : प्रतिनिधी एकीकडे संपूर्ण देश कोरोना विरुद्ध लढत आहे. अशा परिस्थितीत रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत.  डॉ. आरसरे आणि डॉ. हिवरे अशी दोघांची नावे  आहेत. त्यांनी आपले राजीनामे रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द केले आहेत. राजीनामे देण्याआधी डॉक्टर, …

Read More »

दारूची वाहतूक करणार्यांवर कारवाई

पनवेल : वार्ताहर – पनवेल परिसरातून दारूची वाहतूक करणार्‍या वाहनांवर पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. 30) पळस्पे नाकाबंदी चेक पोस्ट, पनवेल या ठिकाणी हुंडाई एसेंट कार (क्र.एमएच 03/सीएच 2827) या गाडीतून शागिर छोटू खान(29, रा. लोटस …

Read More »

उरणमध्ये अन्नदान पुरवठा मदत केंद्र कार्यान्वित

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर – उरण तालुकास्तरीय सनियंत्रण समितीच्या माध्यमातून तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, उनपचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, गटविकास अधिकारी निलम गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उरणमध्ये तहसिलदारांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान पुरवठा मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. सरकारच्या लॉकडाऊन आदेशामुळे जे उद्योग व्यवसाय प्रभावीत झालेले तसेच बेरोजगार बेघर व्यक्ती …

Read More »

उरण तालुक्यात पूर्णत: शुकशुकाट

कोरोनाचे 29 संशयित विलगीकरण कक्षात; एकही बाधित नाही उरण : प्रतिनिधी – 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये कलम 144 संचारबंदी लागू करण्यात आली असून, उरण शहरात व तालुक्यातील रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट पसरला असून, हॉस्पिटलसारख्या अत्यावश्यक सेवेसाठी काही प्रमाणात पायी चालत व क्वचित वाहनातून रुग्ण जाताना दिसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकंदरीत …

Read More »

‘कफ’च्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर – पनवेल येथील सिटिझन्स युनिटी फोरम अर्थात कफ या संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कफ नगरमधील बिरमोळे हॉस्पिटल येथे हे शिबिर झाले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे निकष पाळत हे शिबिर झाल्यामुळे कफचे विशेष कौतुक होत आहे. पनवेलच्या सामाजिक क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव …

Read More »