Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

द्रुतगती मार्गावर कंटेनरची कारला धडक; एक ठार

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील अफकॉन कंपनीजवळ गुरुवारी (दि. 8) दुपारी 3.45  वाजण्याच्या सुमारास कंटेनरने इर्टिगा कारला पाठीमागून ठोकर दिली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला. द्रुतगती मार्गावरून गुरुवारी दुपारी कंटेनर पुणे ते मुंबई असा जात होता. बोरघाटातील अफकॉन कंपनीजवळ ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला …

Read More »

सामाजिक एकतेचे प्रतिक रोह्यातील भुवनेश्वरचा राजा

रोहे : प्रतिनिधी गेली कित्येक वर्षे विविथ जाती, धर्माच्या लोकांना सोबत घेत सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आजही रोहा तालुक्यातील भुवनेश्वर राजाच्या गणेशोत्सवातून जोपासली आहे. कामगार चळवळीतून उभे भुवनेश्वर येथील गणेशेात्सव मंडळ उभे राहिले आहे. निरलॉन कॉलनीमध्ये गणरायाची स्थापना करण्यात येते. या वर्षी रामायणातील कुंभकर्णाचे चलचित्र मंडळाने साकरले आहे.रक्तदान शिबिरासह अनेक सामाजिक, …

Read More »

पेण तालुक्यात पावसाचा धुमाकूळ ; वीज कोसळून घराचे नुकसान

पेण : प्रतिनिधी       गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी (दि. 7) सायंकाळी विजेच्या गडगडाटासह हजेरी लावून पेणकरांना भांबावून सोडले. मुसळधार पावसामुळे शहरातील सर्व गटारे तुडुंब भरून वाहू लागली. अनेक दुकानांमध्ये व घरांमध्ये गटारांचे पाणी शिरले. एसटी स्थानकाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. नदीकिनारी असल्या घरांमध्येसुद्धा पाणी …

Read More »

म्हसळ्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस 

म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा शहरासह संपूर्ण तालुक्यातील विविध भागांत बुधवारी संध्याकाळी ढगफुटीसदृष्य पाऊस पडला. दुपारी आकाशांत ढगांची जमवाजमव झाली, त्यानंतर जोरदार वारा, विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस कोसळत होता. या वेळी महावितरणची बत्ती गुल झाल्याने बहुतांश भागात अंधाराचे सावट पसरले होते. अचानक …

Read More »

रोह्यातील डॉ. देशमुख महाविद्यालयाला राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यापीठ स्तरीय सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

रोहे : प्रतिनिधी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रोहे येथील डॉ.चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाला मुबंई विद्यापीठ स्तरीय राष्ट्रीय सेवा योजना सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शिक्षक दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील फिरोजशहा मेहता भवनात झालेल्या  कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते डॉ. …

Read More »

प्रधानमंत्री आदि आदर्श ग्रामविकास योजना… रायगड जिल्ह्यातील 88 गावांची निवड

अलिबाग : प्रतिनिधी अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या असलेल्या गावांचा एकात्मिक, आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आदि आदर्श ग्रामविकास ही योजना प्रस्तावित केली आहे. राज्यातील ज्या गावांमध्ये किमान 500 व 50 टक्के इतकी आदिवासी समाजाची लोकसंख्या आहे, अशा महाराष्ट्रातील एकूण तीन हजार 605 गावांची निवड केंद्र शासनाने या योजनेकरिता …

Read More »

जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींमध्ये 13 ऑक्टोबरला निवडणूक

अलिबाग : प्रतिनिधी राज्यातील एक हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे.  त्यात रायगड जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील वेश्वी, नवेदर नवगाव, कोप्रोली, कर्जत तालुक्यातील पोटल, पाली तर्फे कोतवाल खलाटी, खालापूर तालुक्यातील चौक, आसरे, लोधीवली, तूपगाव, पनवेल तालुक्यातील …

Read More »

जलवाहतुकीमुळे पर्यटक, प्रवाशांना दिलासा

गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा मांडवा पूर्ववत बोटसेवेला प्रतिसाद उरण : रामप्रहर वृत्त पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील जलवाहतूक सेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली. गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा, गेट वे ते एलिफंटा सेवा पूर्ववत झाली असून पर्यटक आणि प्रवाशांसाठी ही बाब दिलासादायक ठरली …

Read More »

गणेशभक्तांचा परतीचा प्रवास होणार सुखकर 

7 ते 12 सप्टेंबरदरम्यान पनवेल-चिपळूण डेमू विशेष रेल्वेगाड्या धावणार रोहे : प्रतिनिधी गणेशोत्सवात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पनवेल ते चिपळूण दरम्यान डेमू विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेश भक्तांचा परतीचा प्रवास सुखकारक होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागच्या वतीने देण्यात आली. मध्य …

Read More »

पालीत भटक्या कुत्र्यांची दहशत

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील पाली शहरात भटक्या व पिसाळलेल्या जखमी कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. पालीतील हटाळेश्वर चौक, बाजारपेठ, एसटी बसस्थानक, बँक ऑफ इंडियाजवळ तसेच सर्व आळ्यांमधील विशेषत: कचरा कुंड्यांजवळ मोकाट कुत्र्यांचा झुंडीत वावर असतो. एखादा पादचारी किंवा दुचाकी वाहन …

Read More »