जनजीवन विस्कळीत; वीजपुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधार पाली : प्रतिनिधी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवीत सुधागड तालुक्यात बुधवारी (दि. 7) सायंकाळी वादळी वार्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तासनतास कोसळणार्या या पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने काहीसा गारवा दिला. सर्वत्र ढग दाटून …
Read More »माणगावात चाकरमान्यांकडून ‘रेल रोको’
पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर गाडी सोडली माणगाव ः प्रतिनिधी या वर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले होते. त्यामुळे सोमवारी गौरी-गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मंगळवारी (दि. 6) चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले. माणगांव रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने गर्दी व रेल्वेचे दार न उघडल्याने अनेकांना आरक्षण असूनही रेल्वेमध्ये …
Read More »साई विभागातील ग्रामस्थ शिवसेना शिंदे गटात दाखल
माणगाव ः प्रतिनिधी साई विभागातील साई कोंड, विहुले व काकल गावातील तसेच आमडोशी व सुरव गाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्ते मंगळवारी (दि. 6) शिंदे गटाचे मुख्य प्रतोद तथा आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत. या वेळी शिवसेना नेते अॅड. राजीव …
Read More »पेणमधील बेकरीवर कारवाईचे आदेश
पेण ः प्रतिनिधी पेण शहरातील एका बेकरीमध्ये बनविण्यात आलेल्या पावामध्ये उंदराची विष्ठा आढळल्याची घटना घडली. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बेकर्यांची पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश औषधे प्रशासनाचे अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी दिले आहेत.पेण येथील अरविंद गुरव हे एका हॉटेलमध्ये सकाळी नाष्टा करण्यासाठी गेले असता तेथील पावामध्ये त्यांना उंदराची विष्टा आढळली. …
Read More »मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर माडप बोगद्याजवळ पुन्हा अपघात; दोघे ठार, 10 जण जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांची मालिका सुरू असून मंगळवारी (दि. 6) पहाटे माडप बोगद्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव इको कारने धडक दिली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी जागीच ठार, तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक्स्प्रेस वेवर …
Read More »गणेशोत्सवात ढोल-ताशा, ध्वज पथकांची धूम
तरुण, लहानग्यांमध्ये संचारला उत्साह पाली : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या काळात सुधागड तालुक्यात ढोल-ताशा या पारंपरिक वादनाची मोठी क्रेझ पहायला मिळत आहे. कोरोना काळात दोन वर्षे निर्बंध होते मात्र आता सर्व निर्बंध हटल्याने गणेशोत्सवात ढोल-ताशा-ध्वज पथकाला अधिक पसंती आहे. गणेशोत्सवात आपल्या ताल व लयबद्ध वादनाने हे ढोलताशा पथक सगळ्यांच आकर्षित करीत आहेत. …
Read More »म्हसळ्यातील पर्जन्यमापक केंद्र सदोष ठिकाणी; शेतकर्यांना बसतोय फटका
म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील देहेन आणि म्हसळा येथील पर्जन्यमापक यंत्रे सदोष व तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या ठिकाणी बसविण्यात आल्याने पावसाची नोंद प्रकारे होत नाही. त्यामुळे नियोजन चुकत असल्याचे म्हसळा तालुक्यातील शेतकर्यांचे म्हणणे आहे. जिल्हा नियोजन व विकास परिषदेकडून नाविन्यपुर्ण बाब म्हणून मंडळ निहाय पर्जन्यमापक यंत्रे बसविण्याचा निर्णय 2013 साली झाला. त्यानुसार म्हसळा …
Read More »द्रुतगती मार्गावर दोन अपघात
आपत्कालीन यंत्रणा कर्मचारी, पोलिसांसह प्रवासी जखमी खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पुणे लेनवर रविवारी (दि. 4) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दोन वेगवेगळे अपघात झाले. किमी 28 जवळ खाजगी प्रवासी बस उलटून पहिला अपघात घडला. या अपघातात बसमधील सहा प्रवासी जखमी झाल, तर दुसरा अपघात किमी 27/800 येथे घडला. त्यात …
Read More »मुरूडमध्ये विधवा महिलांना मिळणार सन्मानाची वागणूक
कुणबी समाजाचा पुढाकार; एकमताने ठराव मंजूर मुरूड ः प्रतिनिधी कुणबी समाजोन्नती संघ मुरूड जंजिरा विभागातील नांदले, चिंचघर, उसडी-चाफेगाव, जमृतखार, सावली, मिठागर या गावांतील समाज बांधवांची सालाबादप्रमाणे गौरी गणपती सण व 75व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संयुक्त सभा नुकतीच झाली. विधवा प्रथा बंद करून अशा महिलांना सनान्माची वागणूक देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात …
Read More »पुढच्या वर्षी लवकर या!
गौरी गणपतीला भक्तगणांकडून भावपूर्ण निरोप अलिबाग ः प्रतिनिधी लाडक्या गणेशाची पाच दिवस मनोभावे पूजा-अर्चा केल्यानंतर रायगडकरांनी सोमवारी (दि. 5) त्याला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. गणपतींसोबत गौरींचेही वाजतगाजत विसर्जन करण्यात आले. सायंकाळी गणेश विसर्जन मिरवणुका विसर्जनस्थळी निघाल्या. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. विसर्जन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी …
Read More »