उरण : रामप्रहर वृत्त येथील उरण ते अलिबाग या सागरी मार्गावरील उरण मधील करंजा ते अलिबागच्या रेवस या दोन बंदरा दरम्यान रो-रो सेवा सुरू करण्यासाठी पाच वर्षांपूर्वीच करंजा जेट्टीची उभारणी करण्यात आली आहे. या मार्गाला जोडणार्या अलिबागमधील रेवस जेट्टीचे काम सुरू असल्याने करंजा जेट्टीचे कामास धीम्यागतीने सुरू असल्याचे मेरिटाईम बोर्डाच्या …
Read More »विकासकामांतील स्टीलचोरीच्या घटनांमध्ये वाढ
पोलादपूर तालुक्यात चौपदरीकरणासोबतच विविध विकासकामांची रेलचेल सुरू आहे. असे असले तरीदेखील या विकासकामांसाठी वापरण्यात येणार्या सामानाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कारण विविध कामांसाठी वापरण्यात येणारे सामान हे त्याच ठिकाणी उघड्यावर ठेवले जाते. त्यामुळे या सामान चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेक चोरीच्या घटनांबाबत पोलीस स्थानकात तक्रारी दाखल …
Read More »रोहा रेल्वे पोलिसांचे ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’
फलाटावर सापडलेल्या बालकास केले पालकांच्या स्वाधीन रोहे : प्रतिनिधी येथील रेल्वे पोलीस चौकीमधील अधिकारी व कर्मचार्यांनी नुकताच ऑपरेशन ’ नन्हे फरिश्ते ’ अंतर्गत फलाटावर सापडलेल्या बालकास त्याच्या पालकांकडे सुपूर्द केले. रेल्वे सुरक्षा बला तर्फे रेल्वेच्या मालमत्ता रक्षणासह प्रवशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध अभियान राबविण्यात येतात. रोहा रेल्वे पोलिसांचे मुख्य आरक्षक बी. …
Read More »महाडमध्ये पशुवैद्यकीय दवाखाने असून नसल्यासारखे, औषधांचीही वानवा
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यात सध्या एकही अधिकारी व कर्मचारी कार्यरत नसल्याने तालुक्यातील पाळीव जनावरांच्या निरोगी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दवाखान्यांकडे डॉक्टर फिरकत नसल्याने दवाखान्यातील औषधांचेदेखील नुकसान झाले आहे. त्यामुळे या पशुवैद्यकीय दवाखान्यांत अधिकारी व कर्मचार्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात, अशी मागणी महाड तालुक्यातील पशूधन पालकांकडून केली …
Read More »कर्जतमध्ये डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ; नगर परिषदेकडून सर्वेक्षण सुरू
कर्जत : बातमीदार नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या कंटेनर सर्व्हेमध्ये कर्जत शहरात डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळून आले. त्यामुळे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक सर्व भागात फिरून नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करीत आहे. दरम्यान, नगर परिषदेतर्फे शहरात औषध फवारणी सुरु करण्यात आहे. शहरात डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळत असल्याची माहिती कर्जत उपजिल्हा रुग्णालयाकडून नगर परिषदेला देण्यात …
Read More »बाप्पाच्या दर्शनासाठी महडमध्ये भक्तांचा महापूर
खोपोली : प्रतिनिधी गणेशोत्सवानंतर लगेच आलेल्या अंगारक योग निमित्ताने अष्टविनायक क्षेत्र महड येथे वरदविनायकाच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. 13) भक्तांनी गर्दी केली होती. पहाटे महाआरती झाल्यापासून लागलेल्या भाविकांच्या रांगा रात्री उशिरापर्यंत कायम राहिल्या. अंगारकी चतुर्थीनिमित्त महड मंदिर सभामंडपात विविध फुले वापरून साकारलेली आकर्षक रांगोळी, फुलांची आरास व मन प्रसन्न होईल अशी …
Read More »रायगडात ठिकठिकाणी साखरचौथ गणपतीची प्रतिष्ठापना
पेण : प्रतिनिधी गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर मंगळवारी (दि. 13) पहिल्या संकष्टी चतुर्थीला पेण तालुक्यात ठिकठिकाणी सार्वजनिक आणि घरगुती साखरचौथ गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पेणमध्ये मोठ्या उत्साहात साखरचौथ गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून मंगळवारी सकाळी मिरवणुकीने सारखचौथ गणपतीचे आगमन होऊन विधीपूर्वक श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे मंडळातर्फे आयोजन …
Read More »रायगड जिल्हा परिषदेचा कारभार होतोय हायटेक
घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी डिजिटल कर प्रणाली कार्यान्वित अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेचा कारभार हायटेक होत असून जिल्हा परिषदेने डिजिटल कर प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामुळे ग्रामपंचायतींना घरपट्टी तसेच पाणीपट्टी वसुली करणे तसेच त्याची नोंद ठेवणे सुलभ झाले आहे. ही प्रणाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या …
Read More »ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेल्या सर्व्हेच्या सनद वाटपास खालापूर तालुक्यातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाचे अधीक्षक सचिन इंगळी यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यात ड्रोनद्वारे झालेल्या गावठाण भूमापन सर्व्हेच्या सनद वाटप कार्यक्रमास तालुक्यातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेंतर्गत महाराष्ट्रातील सर्व गावाचे गावठाण सर्वेक्षण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्यांतर्गत घेण्यात आला. त्यानुसार भूमी अभिलेख विभागाच्या …
Read More »अलिबागमध्ये वाहतूक कोंडी
अलिबाग : प्रतिनिधी शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. एसटी डेपोसमोर तर कायमच वाहतूक कोंडी होत असते. त्याचप्रमाणे ब्राह्मण आळीतील दत्तमंदिरा समोरील वळणारदेखील वाहतूक कोंडी पहायला मिळते. अलिबाग शहरातील पूर्वीच्या अरुंद रस्त्याचे आता बर्यापैकी रुंदीकरण झाले आहे. त्याबरोबरच वाहनांची संख्यादेखील वाढली आहे. दुचाकी, चारचाकी वाहने आणि अवजड वाहनेदेखील रुंद-अरुंद रस्त्यावरून …
Read More »