अलिबाग : प्रतिनिधी मतदार यादीतील नाव आधार कार्डसोबत जोडण्याचा निर्णय भारत निवडणूक आयोगाने घेतला आहे. या मोहिमेची सुरुवात 1 ऑगस्टपासून केली जाणर आहे, अशी माहिती रायगडच्या निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांनी बुधवारी (दि. 27) जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मतदार याद्यांचे प्रमाणीकरण व्हावे, मतदारांची ओळख प्रस्तापित व्हावी, दुबार मतदारांची …
Read More »चौलच्या रामेश्वर पुष्करणीत पाणकावळ्यांची सैर
रेवदंडा ः प्रतिनिधी पावसाळ्यात तुडूंब भरलेल्या चौल येथील रामेश्वर पुष्करणीत दुर्मीळ पाणकावळ्यांचे आगमन झाले आहे. त्यांचे पोहणे, मासेमारीसाठी पाण्यात खोलवर डुबकी मारणे आनंददायी चित्र आहे. चौल रामेश्वर पुष्करणीत गेले काही दिवस तीन पाणकावळे सैर करताना दिसून येत आहेत. चकचकीत काळसर वर्णाचा, काळ्या पिसावर हिरवट निळसर झाक, निमुळती, चपटी व टोकाशी …
Read More »राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पेणच्या वंशला ‘रौप्य’
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील खारपाडा येथील वंश संजय घरत याने आळंदी (पुणे) येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट किक बॉक्सिंग या राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. यासोबतच त्याने खारपाड्यासह पेण तालुक्याचे नाव उंचावले आहे. वंश घरत हा रायगड जिल्हा परिषदेच्या खारपाडा येथील प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे. त्याला प्रशिक्षक रवींद्र म्हात्रे …
Read More »रायगडातील नगर परिषदांची सुधारित आरक्षण सोडत गुरुवारी
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील नऊ नगर परिषदांच्या आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित पालिका कार्यालयांमध्ये गुरुवारी (दि. 28) सोडत काढली जाणार आहे, तर हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी 29 जुलै ते 1 ऑगस्ट असा कालावधी निश्चित करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड …
Read More »शिवसेनेचे पेण विधानसभा संघटक बाळा म्हात्रे शिंदे गटात
पेण : प्रतिनिधी रायगडमधील शिवसेनेचे तीन आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत राहिल्याने रायगडमध्ये शिवसेनेत दोन गट निर्माण झाले असतानाच पेण शिवसेनेचे विधानसभा संघटक बाळा म्हात्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन अलिबाग राजमळा येथील श्रीराज निवासस्थानी आमदार दळवी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मागील महिन्यात दळवी समर्थकांनी …
Read More »तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण करणार्यास बेड्या
अलिबाग पोलिसांनी केली चिमुरड्याची सुटका अलिबाग, पेण : प्रतिनिधी अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरड्याला पळवून नेणार्या लफंग्याला अलिबाग पोलिसांनी काही तासातच मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्या तावडीतून त्या बालकाची सुटका करून त्याला आईच्या ताब्यात दिले. बाळ हातात येताच आईचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मधुकर नारायण पारधी असे आरोपीचे नाव आहे. …
Read More »पोलादपुरातील वडाचा कोंड ग्रामस्थांचे स्थलांतर
भूस्खलनाच्या धोक्यामुळे प्रशासनाकडून सतर्कता पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील चरई ग्रामपंचायत हद्दीतील वडाचा कोंड गावालगतच्या डोंगराला पडलेल्या भेगांची पाहणी केल्यानंतर प्रशासनाने शनिवरी ग्रामस्थांना तातडीने स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र आषाढातील कामिका एकादशीच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित होण्यासाठी पोलादपूरचे निवासी नायब तहसीलदार समीर देसाई आणि पोलीस कर्मचार्यांना ग्रामस्थांच्या मिन्नतवार्या कराव्या लागल्या. त्यानंतर रविवारी …
Read More »गटारीसाठी फार्महाऊस सज्ज; मांस, मद्यावर ताव मारण्यासाठी शौकीन उत्सुक
पोलिसांची राहणार नजर पेण ः प्रतिनिधी अवघ्या दोन दिवसांवर आलेली गटारी साजरी करण्यासाठी बेत आखले जाऊ लागले आहेत. याकरिता सुरक्षित मानले जाणार्या फार्महाऊसना पसंती दिली जात आहे. एकीकडे मांस, मद्यावर ताव मारण्यासाठी शौकीन उत्सुक असताना दुसरीकडे पोलिसांचीही गैरकृत्यांकडे नजर असेल. आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी गटारी साजरी केली जाते. या दिवशी …
Read More »रायगड जिल्हा कॅरम स्पर्धेत पनवेलचा सुरेश बिस्ट अजिंक्य
कर्जत ः प्रतिनिधी रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने कॅरम दिन तसेच असोसिएशनचे माजी कार्यवाह स्व. नथुराम पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वैभव राज कॅरम क्लब आयोजित जिल्हा कॅरम अजिंक्यपद व निवड स्पर्धा झाली. स्पर्धेत पुरुष खुल्या गटात पनवेलच्या सुरेश बिस्टने अजिंक्यपद पटकावले. महिला खुल्या गटात खोपोलीच्या अनिता कनोजिया तर वयस्कर गटात कर्जत …
Read More »राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाचे सुयश
रिलायन्स नागोठण्याच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पाली ः प्रतिनिधी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 49वी जलतरण व वॉटर पोलो स्पर्धा नुकतीच भुवनेश्वर (ओडिशा) येथे झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या वॉटर पोलो संघाने द्वितीय, तर मुलांच्या वॉटर पोलो संघाने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. यामध्ये नागोठण्यातील रिलायन्सच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. महाराष्ट्राच्या मुलांच्या …
Read More »