Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

वाकण-खोपोली मार्गावरील पुलांचे काम अपुर्णावस्थेत

पावसाळ्यात यंदाही वाहणार पाली पुलावरून पाणी पाली : प्रतिनिधी वाकण-पाली-खोपोली राज्यमहामार्गावर जांभूळपाडा, भालगूल व पाली येथील नदीवरील पुलांची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे अजूनही अपूर्ण आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पालीतील अंबा नदी पुलावरून पाणी जाऊन वाहतूक खोळंबणार आहे. पावसाळ्यापूर्वी येथील पाली अंबा नदीवरील पुलाच्या एका मार्गिकेचे कामे पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे …

Read More »

म्हसळ्यात भरवस्तीत आले भेकर

वनविभागाच्या सर्तकतेने जखमी भेकराला मिळाले जीवदान म्हसळा : प्रतिनिधी शहरातील भरवस्तीमधील दुकानाच्या बंद शटरला संध्याकाळच्या सुमारास एका भेकराने जोरदार धडक जोरदार धडक दिल्याने ते जखमी झाले. त्याचे वृत्त समजताच म्हसळयाचे वनपाल तत्काळ घटनास्थळी पोहचले त्यांनी पशुधन पर्यवेक्षकांच्या माध्यमातून उपचार करून जखमी भेकराला जिवदान दिले. म्हसळा तालुक्यात वनविभागाचे क्षेत्र फार मोठे …

Read More »

रायगडातील चार घाट धोकादायक; पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन प्रवास

महाड ः रामप्रहर वृत्त वर्दळीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले रायगड जिल्ह्यातील कशेडी, ताम्हिणी, वरंध-वाघजाई व आंबेनळी घाट सातत्याने धोकादायक ठरत आहेत. पावसाळ्यात वाहनचालक व प्रवाशांना जीव मुठीत धरून या घाटातून प्रवास करावा लागतो. सतत कोसळणार्‍या दरडी व भूस्खलनामुळे घाटात वाहतूक ठप्प होण्याचे प्रकारही वारंवार होत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट, माणगाव-पुणे …

Read More »

बोर्ली खाडीपात्रातील कांदळवनतोड

अवैध भरावामुळे पूरसदृश्य स्थिती; ग्रामस्थ आक्रमक रेवदंडा : प्रतिनिधी बोर्ली खाडीपात्रातील कांदळवन तोडून अवैध भराव करण्यात आला आहे. त्यामुळे  पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत बोर्ली ग्रामस्थांनी एकत्रीत येऊन आक्रमक भुमिका घेतली असून पावसाळ्यात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी धनदांडग्यांसह प्रशासनाची राहील असा इशारा त्यांनी दिला आहे. बोर्ली खाडीपात्रातील …

Read More »

पावसाळी पर्यटनासाठी खोपोली सज्ज

परिसर पर्यटकांनी बहरणार खोपोली : प्रतिनिधी पावसाच्या आगमनानंतर खोपोली परिसरातील निसर्ग बहरण्यास सुरुवात झाली आहे. सह्याद्री पर्वताच्या हिरव्या  चादरीबरोबरच पांढर्‍या शुभ्र पाण्याचे आकर्षक धबधबे सक्रीय होत आहेत. खंडाळा घाट परिसर हिरवाईने सजत आहे. दाट धुके व रिमझिम पाऊस हे खोपोली परिसराचे खास आकर्षण असून, याच निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले …

Read More »

शॉर्टसर्किटमुळे अलिबागमध्ये इमारतीत आग

अलिबाग : प्रतिनिधी शहरातील ब्राम्हण आळीमधील दत्त मंदिराजवळील  लक्ष्मीव्हीला इमारतीमधील एका निवासी सदनिकेमध्ये रविवारी (दि. 26) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत सदनिकेतील साहित्य जवळून खाक झाले. सुदैवाने घरी कोणी नसल्याने जीवितहानी टळली. आगीचे वृत्त समजताच अलिबाग नगरपालिकेचे बंब आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. तत्पुर्वी लक्ष्मीव्हीला …

Read More »

सहा कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त

एका महिलेसह सहा जणांना अटक   माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कडापूर गावाच्या हद्दीत माणगाव पोलिसांनी शनिवारी (दि. 25) दुपारी सुमारे पाच कोटी 80 लाख रुपये किमतीची पाच किलो 800 ग्राम वजनाची व्हेल माशाची उलटी हस्तगत केली असून, या प्रकरणी एका महिलेसह सहाजणांना सापळा रचून पकडले आहे. …

Read More »

आमदार भरत गोगावलेंच्या समर्थनार्थ महाडमध्ये शिवसेना पदाधिकारी एकवटले

स्थानिक स्तरावर वाढता पाठिंबा महाड : प्रतिनिधी शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध केलेल्या बंडामध्ये महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले हेही सहभागी झाले आहेत. त्यांच्या समर्थक पदाधिकार्‍यांनी शनिवारी (दि. 25) घेतलेल्या बैठकीत आमचा पाठिंबा भरतशेठलाच, असा एकमुखी निर्धार केला. शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या शिवनेरी निवासस्थानी पदाधिकार्‍यांची …

Read More »

आषाढी वारी ः रिंगण सोहळ्यातील सुवर्णध्वजाचा मान मुरूडच्या भोपळे दिंडीला

मुरूड : प्रतिनिधी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शनासाठी वारकरी आळंदीहून माउलींच्या पालखीसोबत प्रस्थान करतात. या वारीत श्रीवर्धन आणि मुरूड तालुक्यातील 300 वारकरी  (भोपळे दिंडी क्र.14) दरवर्षी सहभागी होतात. वारीतील रिंगण सोहळ्यात धावणार्‍या घोड्यावरील सुवर्णध्वजाचा मान मुरूड येथील भोपळे दिंडीचा आहे. झेंडकरी देविदास महाराज लोखंडे, दिंडीचे अध्यक्ष माऊली महाराज लोखंडे, भाई मिठागारी, अनंता …

Read More »

फणसाड अभयारण्यात शिकारीस आलेल्या सात जणांना पकडले

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात वन्यजीवांची शिकार करण्यासाठी आलेल्या सात जणांना पकडण्यात आले आहे. या सर्वांना मुरूड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुरूडपासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या फणसाड  अभयारण्यात  विविध वन्यजीव आणि वृक्षसंपदा आहे. येथे रात्रीच्या समयी वन्यजीवांची …

Read More »