Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मुरूड नगर परिषदेची प्रभाग आरक्षण सोडत जाहीर

मुरूड : प्रतिनिधी मुरूड जंजिरा नगर परिषदच्या 2022 मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीकरिता सोमवारी (दि.13) सकाळी 11 वाजता नियंत्रण अधिकारी तथा अध्यक्ष नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व नगर परिषद मुख्याधिकारी  पंकज भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण प्रक्रिया पार पडली. मुरुड नगर परिषदेची लोकसंख्या 12 हजार 216 असून यंदा होणार्‍या निवडणुकीत 10 …

Read More »

अलिबाग नगर परिषदेत तीन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, महाड, रोहा, माथेरान, पेण, उरण या नगर परिषदांच्या कार्यालयात प्रभाग आरक्षण निश्चित करण्यासाठी सोमवारी (दि. 13)  विशेष सभांचे आयोजन करण्यात आले होते. या आरक्षणाकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले होते. विशेषतः सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने नव्याने आरक्षण कसे पडते, …

Read More »

कर्जत-कल्याण राज्यमार्गालगत मातीचा भराव, तारेचे कुंपण

ममदापूर ग्रामपंचायतीकडून गटार मोकळे करण्याच्या सूचना कर्जत  : बातमीदार तालुक्यातील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीमधून जाणार्‍या कर्जत- कल्याण राज्यमार्गालगत मातीचा भराव व तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले गटार बंद झाले आहे. दरम्यान, मातीचा भराव बाजूला करून गटार खोदून द्यावे, अशा सूचना ममदापूर ग्रामपंचायतीने संबंधित जमीन मालकाला देण्यात आल्या …

Read More »

बेशुद्धावस्थेतील तरुणीचे कर्जत रेल्वे पोलीस सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या सिंहगड एक्सप्रेसमधून प्रवास करणारी एक तरुणी बेशुद्ध झाली. हे समजल्यानंतर  कर्जत स्थानकात गाडी थांबताच रेल्वे पोलीस व सुरक्षा दलाच्या महिला कर्मचार्‍यांनी तिला सिंहगडमधून उतरवून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर उपचार करून नंतर तिला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. बदलापूर येथे राहणारी रोहिणी अशोक …

Read More »

माथेरान घाटातील दगड, चिखल काढण्याचे काम सुरू

कर्जत : प्रतिनिधी जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमधील सखाराम तुकाराम पॉईट ते अमनलॉज दरम्यानच्या रस्त्यावर पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात चिखल झाला. मात्र नगर परिषदेने यारस्त्यावरवरील चिखल तातडीने काढून टाकल्याने नागरिकांसह पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. पहिल्याच पावसात माथेरानमधील सखाराम तुकाराम पॉईट ते अमनलॉज परिसरातील रस्त्यांवर चिखल झाल्याने नागरिकांना तसेच पर्यटकाना चिखल …

Read More »

मुरूड किनारी डुएट सायकली ठरताहेत पर्यटकांचे आकर्षण

मुरूड : संजय करड मुरूड समुद्र किनारी आता डुएट सायकली आणण्यात आल्या आहेत. या सायकलवर दोन व्यक्ती विराजमान होऊन अगदी सहज रपेट मारू शकतात. सध्या या डुएट सायकली पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. एकदरा येथील चंद्रकांत शांताराम पवार यांनी डुएट सायकली मुरूड समुद्र किनारी पर्यटकांसाठी आणल्या आहेत. सुरुवातीला त्यांनी चार सायकली …

Read More »

श्रीवर्धनमध्ये तब्बल 36 तास वीजपुरवठा खंडित

स्थानिकांसह पर्यटकही त्रस्त श्रीवर्धन : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे श्रीवर्धनसह हरिहरेश्वरमधील वीजपुरवठा तब्बल 36 तास खंडित झाला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचे हाल झाले. श्रीवर्धन शहर व परिसरात शुक्रवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. या वेळी पाभरे वीज उपकेंद्रातून श्रीवर्धनकडे येणार्‍या मुख्य विद्युत वाहिनीवर विजेचे झोत पडल्यामुळे संपूर्ण म्हसळा ते …

Read More »

कर्जतचे कुणाल साळवी यांच्या चित्रांचे मुंबईत प्रदर्शन

कर्जत : बातमीदार येथील चित्रकार कुणाल साळवी यांच्या निसर्ग चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले असून, त्याला मुंबईकरांसह अनेक परदेशातील पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. जहांगीर आर्ट गॅलरीमधून कुणाल साळवे यांची चित्रे अनेकांनी खरेदी केली असून आतापर्यंत सुमारे पाच लाख रुपये या चित्रप्रदर्शनातून विकली गेली आहेत. कोकणातील …

Read More »

शेतीकामासाठी बळीराजाची लगबग सुरू

रेवदंडा : प्रतिनिधी मान्सूनपूर्व शेतीच्या कामाची लगबग सुरू असून रेवदंडा परिसरात शेताची मशागत, उखळणी तसेच धान्य पेरणीच्या कामांनी वेग घेतला आहे. मे महिना सरताच जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाची सुरूवात होते. त्यामुळे रेवदंडा परिसरातील शेतकर्‍यांच्या मान्सुनपुर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी शेतात नांगरणी, उखळणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. सोबत धान्य …

Read More »

माथेरान नागरी पतसंस्थेची निवडणूक जाहीर

कर्जत : बातमीदार ब्रिटिश काळात भाऊसाहेब राऊत आणि भाई कोतवाल यांनी स्थापन केलेल्या माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, संस्थेच्या 13 संचालकांची निवड करण्यासाठी 11 जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांच्या आदेशाने कर्जत तालुका सहकारी संस्था सहाय्यक निबंधकांनी माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचा …

Read More »