रेवदंडा : प्रतिनिधी मान्सूनपूर्व शेतीच्या कामाची लगबग सुरू असून रेवदंडा परिसरात शेताची मशागत, उखळणी तसेच धान्य पेरणीच्या कामांनी वेग घेतला आहे. मे महिना सरताच जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाची सुरूवात होते. त्यामुळे रेवदंडा परिसरातील शेतकर्यांच्या मान्सुनपुर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी शेतात नांगरणी, उखळणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. सोबत धान्य …
Read More »माथेरान नागरी पतसंस्थेची निवडणूक जाहीर
कर्जत : बातमीदार ब्रिटिश काळात भाऊसाहेब राऊत आणि भाई कोतवाल यांनी स्थापन केलेल्या माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, संस्थेच्या 13 संचालकांची निवड करण्यासाठी 11 जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांच्या आदेशाने कर्जत तालुका सहकारी संस्था सहाय्यक निबंधकांनी माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचा …
Read More »खालापुरात शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने!
नियोजित रॉकिंग बॉम्बे बेव्हरेज कारखान्याच्या जनसुनावणीदरम्यान संघर्ष खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील प्रस्तावित मे. रॉकिंग बॉम्बे बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या शुक्रवारी (दि. 10) झालेल्या जनसुनावणीदरम्यान शिवसेना व राष्ट्रवादी आमने-सामने उभे ठाकल्याचे चित्र पहायला मिळाले. धान्यापासून इथेनॉल व एक्स्ट्रा अल्कोहॉल उत्पादन करणार्या बहुचर्चित मे. रॉकिंग बॉम्बे बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी खालापूर …
Read More »खालापुरात महिलेची हत्या, आरोपी 24 तासांत जेरबंद
खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील रानसई बोरीची मळशी जंगल भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. या प्रकरणी खालापूर पोलिसांनी आरोपीला 24 तासांत जेरबंद केले आहे. रानसई बोरीची मळशी जंगल भागात 6 जून रोजी एका अनोळखी महिलेचा जातीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या शवविच्छेदन अहवालात मुंबईच्या जे. जे. …
Read More »भाजपच्या विजयाचा रायगड जिल्ह्यात जल्लोष
महाड : प्रतिनिधी राज्यसभेच्या तिन जागा जिंकून भाजपने इतिहास घडविला आहे. या विजयाचा सर्वत्र जल्लोष होत असताना महाड, माणगावमध्येही शनिवारी (दि. 11)आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडीक यांचा विजय झाला. अत्यंत करेक्ट कार्यक्रम करुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »रायगड जिल्ह्यातील नगर परिषद आरक्षण, सोडत सोमवारी होणार जाहीर
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी आरक्षण व सोडत येत्या सोमवारी (दि. 13) काढण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशातील निर्णयानुसार आरक्षण ठरविण्याचा कार्यक्रम देणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हा प्रशासनाने तसा कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगाने रायगड …
Read More »पहिल्याच पावसात बत्ती झाली गुल!
मुरूडमध्ये 14 तास वीज गायब; नागरिकांचे हाल मुरूड : प्रतिनिधी मान्सूनचे आगमन झाले आणि पहिल्या पावसात महावितरणने वीज गायब केली. मुरूडमध्ये तब्ब्ल 14 तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले. मुरूडमध्ये शुक्रवारी (दि. 10) रात्री तुरळक पाऊस पडला. पावसाचे प्रमाण कमी असले तरी महावितरणने बत्ती गुल केली. शुक्रवारी रात्री 9 …
Read More »रोह्यातील डोलवहाळ धरणात बुडून पर्यटकाचा मृत्यू
धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील कोलाडनाजीक पुई येथील डोलवहाळ धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय पर्यटकाचा शुक्रवारी (दि. 10) बुडून मृत्यू झाला. कोलाड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद असिफ अब्दुल रहमान खान (वय 21, रा. तळेगाव, जि. पुणे) हा शुक्रवारी त्याची मावशी मोमीन खातून, मावस भाऊ एयाज खान व अय्यज खान, …
Read More »अलिबागेतील बुद्धिबळपटू साई बलकवडेचा सत्कार
अलिबाग : प्रतिनिधी पुणे येथे झालेल्या ओपन बुद्धिबळ स्पर्धेत अलिबागमधील आरसीएफ शाळेतील 15 वर्षीय विद्यार्थी साई दीपक बलकवडे याने द्वितीय क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते साईचा सत्कार केला. या वेळी सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, प्राथमिक शिक्षण अधिकारी …
Read More »सुकी मासळी खातेय ‘भाव’; दरात 30 ते 40 टक्क्यांनी वाढ
सुधागड : प्रतिनिधी वरुणराजाचे आगमन झाले असून तो सक्रिय होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अगोटीची खरेदी अंतिम जोरात आहे. यामध्ये सुक्या मासळीचीही बेगमी केली जात आहे. मागणी अधिक व आवक कमी असल्याने मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात सुक्या मासळीचे भाव तब्बल 30 ते 40 टक्क्यांनी वधारले आहेत. …
Read More »