Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

अदानी प्रकल्पाला शेतकर्यांचा विरोध

जनसुनावणीत शेतकरी आक्रमक अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील शहाबाज-शहापूर येथे येऊ घातलेल्या अदानी प्रकल्पाची जनसुनावणी सोमवारी (दि. 18) प्रचंड गदारोळामध्ये पार पडली. या सुनावणीत शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकर्‍यांनी या सुनावणीमध्ये अदानी प्रकल्पाला आपला तीव्र विरोध दर्शविला. अदानी प्रकल्पाची जनसुनावणी ही पांडवादेवी येथील जयमंगल सभागृहात घेण्यात आली. जनसुनावणीसाठी अध्यक्ष म्हणून …

Read More »

अलिबागच्या पांढर्या कांद्याची निर्यात नाही

अलिबाग : प्रतिनिधी भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यामुळे अलिबागच्या पांढर्‍या कांद्याच्या निर्यातीसाठी प्रयत्न सुरु झाले होते. मात्र यावर्षी उत्पादन कमी असल्याने अलिबागच्या पांढर्‍या कांद्याची निर्यात होऊ शकली नाही. रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते मात्र रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळता फारशी पिकं घेतली जात नाहीत. रायगड …

Read More »

कोमसाप तळा शाखेचा वर्धापनदिन उत्साहात

माणगाव : प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप)तळा शाखेचा सातवा वर्धापनदिन सोमवारी (दि. 18)  इंदापूर येथील एस. एस. निकम इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मान्यवर कविंनी आपल्या कविता सादर केल्या.. कोमसापचे तळा शाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के यांनी प्रास्ताविकात मागील सात वर्षात राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. आणि कवी …

Read More »

खालापूर शहरातील मुख्य रस्त्याची दुरावस्था

खोपोली : प्रतिनिधी शहरातील मुख्य रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे पायी चालणेदेखील अवघड बनले असून, या प्रश्नावर सर्व राजकीय पक्ष मूग गिळून असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग  अधिकारी सुस्त झाले आहेत. खालापूर शहरातून जाणारा मुख्य रस्ता जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि वणवे-निंबोडे मार्गे सावरोली-खारपाडा राज्यमार्गाला जोडला गेला आहे. खालापूर शिरवलीवाडी ते वणवे गाव या …

Read More »

कालव्याला पाणी सोडा, अन्यथा आंदोलन अमित घाग यांचा इशारा

रोहा पाटबंधारे विभागाच्या कारभाराविरोधात भाजप आक्रमक धाटाव : प्रतिनिधी कोलाड ते भुवनेश्वर आणि कोलाड ते पडम या  डाव्या, उजव्या कालव्यांना त्वरीत पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने रोहा पाटबंधारे विभागाकडे सोमवारी (दि. 18) निवेदनाद्वारे करण्यात आली. शेती आणि पिण्यासाठी या दोन्ही कालव्यांना तातडीने पाणी सोडले नाही तर …

Read More »

अंगारक चतुर्थीसाठी बल्लाळेश्वरनगरी सज्ज

कडेकोट पोलीस बंदोबस्त : देवस्थानकडून सुयोग्य नियोजन   पाली : प्रतिनिधी राज्यात कोरोनाची लाट ओसरली आहे. शासन निर्बंध शिथिल होऊन धार्मिक स्थळे व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. अष्टविनायकाचे प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीत भाविक व गणेशभक्तांची गर्दी उसळत आहे. कोरोनातील निर्बंध उठल्यानंतरची पहिली अंगारकी संकष्टी मंगळवारी (दि.19) आहे. त्यासाठी  …

Read More »

पाछापूर पंचशीलनगरात सोलर नळपाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथील दुर्गम दुर्लक्षित  व डोंगर कड्या कपारीत वसलेल्या शेकडो आदिवासी वाड्यापाड्या गावांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न केले जाताहेत. प्रशासनाला याकामी स्वदेश फाउंडेशनची मोलाची साथ लाभली आहे. बौद्ध विकास मंडळ पाछापूर पंचशीलनगरात सोलर नळपाणी पुरवठा योजनेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. …

Read More »

श्रीवर्धनमध्ये उष्मा वाढला

नागरिक हैराण; पर्यटकांकडून वातानुकूलित खोल्यांना पसंती श्रीवर्धन : प्रतिनिधी मागील आठ दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यामध्ये पारा मोठ्या प्रमाणावर चढलेला पाहायला मिळत आहे. हवेत उष्म्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ढगाळ वातावरण व हवेतील वाढलेली सापेक्ष आर्द्रता यामुळे वातावरणात एक प्रकारचा धुरकट रंग पाहायला मिळत आहे. दमट हवामानामुळे घाम येण्याचा प्रकारदेखील …

Read More »

रायगड जिल्ह्यात ई-लर्निंग संकल्पनेलाच सुरुंग

इंटरनेट, वीज कनेक्शनअभावी डिजिटल शाळांपुढे समस्यांचा डोंगर अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 95 टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. एकूण 2 हजार 621 शाळांपैकी केवळ 2 हजार 37 शाळा डिजिटल झाल्या आहेत. मात्र, यातील अनेक शाळा शाळा अतिदुर्गम भागात असल्याने इंटरनेट सुविधा, वीज कनेक्शनचा अभाव यामुळे ई लर्निंग संकल्पनेलाच …

Read More »

पिकांवरील अमरवेल शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी

महाड तालुक्यातील अनेक भागात भातपिक घेतल्यानंतर त्याच शेतजमिनीत कडधान्यांची पूरकशेती केली जाते. येथील भातपिकांचे उत्पादन मोठे नसले तरी कडधान्याला मात्र बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने येथील शेतकरी कडधान्य पिक घेतात. मागणी आणि दर उत्तम असला तरी शेतकरी कडधान्याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात अमरवेल पसरत असून अमरवेलचा हा विळखा …

Read More »