अलिबाग : प्रतिनिधी 30 वर्षांपूर्वी मी अलिबागला आलो. इथे स्थायिक झालो. इथे येऊन मला जी शांतता मिळते ती जगात कुठेच मिळत नाही. अलिबागकर असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. ते कणकेश्वर फाटा येथे सुशोभीकरण सोहळ्यात बोलत होते. अलिबाग-मांडवा रस्त्यावरील कणकेश्वर फाटा …
Read More »मुरूडमध्ये भाजपतर्फे रविवारी भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील हिंदू बोर्डिंग येथील भव्य पटांगणावर भारतीय जनता पक्षातर्फे रविवारी (दि. 13) सायंकाळी 6.30 वाजता शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी तीन वेळा मिस्टर इंडिया व सहा वेळा महाराष्ट्र श्री किताब पटकावणारा शरीरसौष्ठवपटू सुनील जाधव मुख्य आकर्षण असणार आहे. या स्पर्धेस भाजप प्रदेश सरचिटणीस …
Read More »रायगडात मास्क कारवाई न करण्याचा आदेश मागे
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मास्क न लावणार्यावर कायदेशीर कारवाई केसेस बंद करण्याचा निर्णय रायगड पोलिसांनी मागे घेतला आहे. त्यामुळे मास्क न लावता फिरल्यास आता पुन्हा नागरिकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्हा सुरक्षा विभागाने काढलेल्या पत्रामुळे जिल्ह्यात गैरसमज निर्माण झाला होता. त्यामुळे काढलेले पत्र मागे घेत असल्याचे जिल्हा …
Read More »गावठी कट्टा विक्रीस घेऊन जाणार्या त्रिकुटाला अटक
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कर्जत येथे कारवाई अलिबाग, नेरळ : प्रतिनिधी, बातमीदार गावठी कट्टा विक्रीस घेऊन जाणार्या कर्जतमधील तीन जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे. रवींद्र आनंद वैद्य (वय 35), सौरभ सुनील नवले (वय 26), सुनील त्र्यंबक वाठोरे (वय 36, सर्व रा. कर्जत) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची …
Read More »विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देणार्या एलएईएस शाळेची मान्यता रद्द करावी
सम्यक विद्यार्थी परिषदेची मागणी कर्जत : बातमीदार शाळेची फी न भरल्यामुळे एलएइएस शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणार्या नेरळ येथील एलएइएस शाळेवर कारवाई करावी आणि त्यांची मान्यता रद्द करावी, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे राज्य उपाध्यक्ष अॅड. कैलास मोरे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. कोविड …
Read More »महाड, कर्जत, रोह्यात भाजपचा विजयी जल्लोष
महाड : प्रतिनिधी चार राज्यांतील विजयानंतर देशभरात भाजपचा विजयी जल्लोष होत असताना, महाडमध्येदेखील भाजपने विजयी जल्लोष साजरा केला. भाजप जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा विधानसभा …
Read More »विधवा महिलांना मिळवून दिले आर्थिक सहाय्य
भाजपच्या शर्मिला सत्वेंची सामाजिक बांधिलकी माणगाव : प्रतिनिधी भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा शर्मिला सत्वे यांच्या प्रयत्नाने माणगाव तालुक्यातील ज्योती महादेव खाडे (रा. बामणोली), सावित्री रोंगु काटकर (रा. खांदाड) पार्वती चंदर हिलम या विधवा महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून प्रत्येकी 20 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळाले आहे. या महिलांना जिल्हाधिकारी …
Read More »महाडमध्ये आढळल्या एकच नंबरच्या 500 रुपयांच्या दोन नोटा
महाड : प्रतिनिधी शहरामधील दोन दुकानांमधून एकाच नंबरच्या पाचशे रुपयांच्या दोन नोटा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या छबिना उत्सवात बनावट नोटांचा वापर झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे. महाडमधील एका हॉटेल व्यावसायिकाकडे आलेली पाचशे रुपयाची नोट बनावट असल्याचा संशय आल्याने तो समोरच असलेल्या एका पानटपरीवर नोट दाखवण्यास …
Read More »बॅडमिंटन स्पर्धेत अलिबागच्या सुजल-युग यांना विजेतेपद
म्हसळा ः प्रतिनिधी म्हसळा बॅडमिंटन क्लबच्या यजमानपदाखाली ज्युनिअर दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा तालुका क्रीडा संकुलात नुकतीच झाली. 17 वर्षांखालील मुलांच्या या स्पर्धेत अलिबाग येथील सुजल गट्टे आणि युग सोनी यांनी विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत म्हसळा, श्रीवर्धनसह जिल्ह्यातील महाड, रोहा, अलिबाग व अन्य तालुक्यांतून 32 संघ सहभागी झाले होते. म्हसळा येथील युसुफ अष्टीकर …
Read More »युक्रेनहून रायगडातील 31 विद्यार्थी परतले
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 32 विद्यार्थील युक्रेनमध्ये अडकलेले होते. यातील 31 विद्यार्थी रायगडात परतले असून, उर्वरीत एक विद्यार्थीही परतीच्या मार्गावर आहे. तो पोलंडमध्ये दाखल झाला आहे. जिल्ह्यातील 32 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेले होते. रशियन फौजांच्या आक्रमणामुळे हे सर्व विद्यार्थी युक्रेनमधील अडकून पडले. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत …
Read More »