खोपोली : प्रतिनिधी येथील स्वामी विवेकानंद विद्यालय येथे यंदाची दहावीची परीक्षा होणार असून, पन्नास वर्षांपेक्षा अधिककाळाच्या प्रतीक्षेनंतर खालापूरात परीक्षा केंद्र मिळाले आहे. खालापूर हे तालुक्याचे ठिकाण असून, शहरात स्वामी विवेकानंद विद्यालय ही पन्नास वर्षे जुनी शाळा आहे. तेथे ग्रामीण भागातील, खेडोपाड्यातील मुले शिक्षणासाठी येतात. या शाळेची पटसंख्या सहाशेच्या तर दहावी …
Read More »राजेश गाणार ‘भाजप श्री 2022’चा मानकरी
मुरूड ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष मुरूडच्या वतीने रायगड जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा मुरूड येथील हिंदू बोर्डिंगच्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राजेश चंद्रकांत गाणार (स्थानिक गुन्हा अन्वेषण अलिबाग) अंतिम विजेता ठरला. त्याला भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या हस्ते …
Read More »खोपोलीत टी-20 क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ
अलिबाग ः प्रतिनिधी खोपोली क्रिकेट असोसिएशन आयोजित टी-20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेला रविवारी (दि. 13) खोपोली येथील डीपी रोडवरील भव्य क्रीडांगणावर पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या हस्ते उद्घाटन करून प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामवंत 16 संघांनी सहभाग घेतला आहे. उद्घाटन समारंभास खोपोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत साबळे, सरचिटणीस …
Read More »महाडमध्ये बँकेत बनावट सोन ठेवून अपहार; 18 जणांवर गुन्हा दाखल
महाड ः प्रतिनिधी सोनाराशी संगमत करून आरोपींनी महाड येथील कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँकेत बनावट सोन ठेवून घेतलेल्या कर्जापैकी 17 लाख 45 हजारांचा अपहार केला. या प्रकरणी 18 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महाडमधील अनेक बँकामध्ये अशा प्रकारचे अपहार झाले असून प्रतिष्ठित लोक यांत गुंतल्याची चर्चा आहे. महाडमधील …
Read More »कर्जतच्या कराटेपटूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश
कर्जत ः बातमीदार आठव्या रेन्बो कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कर्जतच्या कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत राज्याच्या वेगवेगळ्या भागातून एकूण 530 स्पर्धक काता, कुमिते (फाईट) आणि वेपन्स प्रकारात सहभागी झाले होते. स्पर्धेतील काता प्रकारामध्ये कर्जतमधील भूषण बडेकर, आशुतोष ताम्हाणे, ध्रुव परदेसी, ऋतुजा मरले, आयुश देशमुख, तन्वी बडेकर, कबीर वारंगे …
Read More »कर्जतच्या रामदास लोभी यांचे दुबईत चित्रप्रदर्शन
कर्जत : प्रतिनिधी तालुक्याच्या दुर्गम भागात असलेल्या बिड बुद्रुक गावातील उदयोन्मुख चित्रकार रामदास शंकर लोभी यांचे ’जॉय ऑफ बिईंग’ हे चित्रप्रदर्शन दुबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या सभागृहात 19 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. भारतीय कला, संस्कृति आणि उत्सव यांचे महत्त्व पटवून देणारी रामदास लोभी यांची चित्रे मनाला मोहून टाकणारी आहेत. त्यांचे …
Read More »पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांचा सत्कार
पाली : प्रतिनिधी ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकताच लिव्हींग लिजंट हा पुरस्कार मिळाला तसेच डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांना डिलिट पदवी मिळाली आहे. त्याबद्दल लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. संजय सोनावणे यांनी रेवदंडा येथे जाऊन त्या दोघांचा सत्कार केला व आशीर्वाद घेतले. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीदेखील लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानच्या …
Read More »पोलादपूरमध्ये दिशा ग्रुपच्या स्पर्धेत श्रुती गोळे, प्रेमा मेस्त्री अव्वल
पोलादपूर : प्रतिनिधी येथील दिशा सांस्कृतिक ग्रुपतर्फे गुरूवारी सायंकाळी कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत श्रुती गोळे हिने मिस पोलादपूर तर प्रेमा मेस्त्री यांनी मिसेस पोलादपूर किताब पटकावला. स्पर्धेच्या सुरूवातीस राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. स्पर्धेतील रॅम्पवॉकमध्ये सहभागी स्पर्धकांनी विविध आकर्षक पेहेरावांसह पदलालित्य दाखविले. …
Read More »महाड तहसील कार्यालयाला वॉटर कुलर भेट
महाड : प्रतिनिधी येथील तहसील कार्यालयात येणार्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी याकरिता अंजुमन दर्द मंदाने या सामाजिक संस्थेने वॉटरकुलर भेट दिला आहे. महापुरामध्ये महाडमधील विविध शासकीय कार्यालयांचे मोठे नुकसान झाले. तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची गैरसोय निर्माण झाली होती. महाडमधील अंजुमन दर्द मंदाने या सामाजिक संस्थेतर्फे तहसील कार्यालयाच्या आवारात वॉटरकुलर …
Read More »बोरघाटात कुरियर गाडीला आग
खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर खोपोली एक्झिट दरम्यान मुंबईला जाणार्या कुरियर गाडीला शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी आग लागली. आगीचे वृत्त समजताच बोरघाट पोलीस, आयबी यंत्रणा, देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
Read More »