Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मुरूडमध्ये पत्नीची हत्या करणार्या पतीला अटक

पाच दिवसांची पोलीस कोठडी मुरूड : प्रतिनिधी क्षुल्लक कारणावरून पत्नीची हत्या करून पसार झालेल्या पतीला मुरूड पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सूनावली आहे. जेवण बनवले नाही म्हणून उमेश रमेश वाघमारे (वय 26, रा. राजपुरी खोकरी, ता. मुरूड) याने 27 फेब्रूवारी रोजी पत्नीची गळा दाबून केली. …

Read More »

रोहा तालुक्यात 2026 विद्यार्थी परीक्षेस बसले; 42 जण गैरहजर

रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील रोहा, नागोठणे, कोलाड, चणेरा विभागात शुक्रवारपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. रोहा तालुक्यात शुक्रवारी 2026 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. तर 42 विद्यार्थी गैरहजर होते. रोह्यातील विद्यार्थ्यांची शुक्रवारी सकाळी 9.30 वाजल्यापासूनच पालकांसोबत परीक्षा केंद्रावर लगबग सुरू होती. पहिला इंग्रजी पेपर 10.30 ते 2 दरम्यान घेण्यात आला. तालुक्यातील …

Read More »

नागोठणे केंद्रावर 519 परीक्षार्थी

नागोठणे : प्रतिनिधी येथील अग्रवाल विद्यामंदिर परीक्षा केंद्रावर शुक्रवारपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या दीर्घ कालावधीनंतर प्रथमच ऑफलाइन परीक्षा होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर कभी ख़ुशी कभी गम पाहायला मिळत आहे. या परीक्षा केंद्रावर विविध शाखेचे एकूण 519 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांना लिखाणाचा तणाव येऊ नये, यासाठी वेळ अर्ध्या …

Read More »

बारावीची बोर्ड परीक्षा सुरू

 कर्जत तालुक्यातील 14 केंद्रांवर 2460 विद्यार्थी कर्जत : बातमीदार शुक्रवारपासून सुरु झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास जास्त मिळणार आहे. कर्जत तालुक्यात 2460 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले असून तीन मुख्य आणि 11 उपकेंद्रांवर परीक्षा सुरु झाली असल्याची माहिती कर्जत शिक्षण विभागाने दिली. आज पहिल्या पेपरसाठी आपल्या पाल्यांना घेऊन पालक मोठ्या …

Read More »

अलिबागमध्ये पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा

अलिबाग : प्रतिनिधी येथील जे. एस. एम. महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 4) मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले. परीक्षा विभाग प्रमुख प्रा. के. बी. चौगुले यांनी शैक्षणिक अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशुतोष …

Read More »

मुरूडमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

मुरूड : प्रतिनिधी शालांत परीक्षा म्हणजे भविष्यातील कर्तृत्वाची  दारे उघडून देणारा सोपान आहे. या परीक्षेत उत्तम प्राविण्य मिळविण्यासाठी वेळेला महत्त्व द्या, असे आवाहन विहूर येथील नचिकेताज हायस्कूलच्या संचालिका मुग्धा दांडेकर यांनी केले. शालांत परीक्षेतील प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांना  शुभेच्छा देण्यासाठी मुरूड तालुक्यातील विहूर येथील नचिकेताज हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुग्धा दांडेकर …

Read More »

कर्जतमध्ये अग्निशमन दलाकडून जनजागृती

कर्जत : बातमीदार आग लागली की अग्निशमन दलाची मदत मागितली जाते. अग्निशामक उपकरणे कशी वापरावीत, आपत्कालीन परिस्थितीत काय काळजी घ्यावी, यासंबंधी कर्जत नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने नुकताच शहरात ठिकठिकाणी मार्गदर्शन आणि जनजागृती केली तसेच  प्रात्यक्षिके दाखविली. एखाद्या स्थळी अचानक लागलेली आग विझवण्यासाठी कसा प्रयत्न केला पाहिजे, या बाबत कर्जत नगर …

Read More »

रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी बाईक रॅली

अलिबाग ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा वाहतूक शाखा तसेच रायगड बाईकर्स फेस्टिव्हल यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर आदी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक अशोक दुधे …

Read More »

युक्रेनमधून रायगडचे 10 विद्यार्थी सुखरूप घरी परतले

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 32 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले. यातील 10 विद्यार्थी जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत. त्यांनी रशिया विरुद्ध युक्रेन युद्धाचा थरारक अनुभव घेतला आहे. आणखी आठ विद्यार्थी रोमानियात, तर सात हंगेरीत दाखल झाले आहेत. हे विद्यार्थी शुक्रवारी (दि. 11) भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. आर्यन पाटील, अभिजीत थोरात, …

Read More »

रायगडातील चार विद्यार्थी परतले

अलिबाग, खोपोली : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेल्यापैकी रायगड जिल्ह्यातील आर्यन राजेंद्र पाटील (पेण), पूर्वा पराग पाटील (अलिबाग), सलवा मोहम्मद सलीम धनसे (खोपोली), प्रचिती दीपक पवार (पनवेल) हे चार विद्यार्थी सुखरूप घरी पोहचले. रायगड जिल्ह्यातील 32 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेले आहेत. रशियाने युक्रेनवर  केलेल्या आक्रमणामुळे निर्माण झालेल्या युध्द …

Read More »