Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पेण शहरात श्री सदस्यांनी गोळा केला 62 टन कचरा

पेण : प्रतिनिधी महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे मंगळवारी पेण शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी तालुक्यातील पेण, दादर वरवणे, सापोली, हनुमानपाडा, वरसई, धावटे, वाशीनाका, रावे, वडखळ, आंबिवली, जिते, शिर्की या 15 बैठकांतील 1034 श्री सदस्यांनी 62 टन सुका व …

Read More »

गुरव समाजातील तरुणांनी उद्योजक बनावे -बंडू खंडागळे

पेण : प्रतिनिधी समाजातील तरुणांनी उद्योजक बनावे, त्यासाठी त्यांना संघटनेच्या वतीने मदत करण्यात येईल, अशी ग्वाही गुरव समाज ठाणे-रायगड-मुंबई या संस्थेचे अध्यक्ष बंडू खंडागळे यांनी पेण येथे दिली. गुरव समाज ठाणे-रायगड-मुंबई या संस्थेची सभा पेण पी. के. रिसॉर्ट येथे झाली. त्यावेळी बंडू खंडागळे बोलत होेते. समाज संघटनेत आता युवा पिढीला …

Read More »

अलिबाग प्रेस असोसिएशनचे तेजस्विनी पुरस्कार जाहीर

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने दिल्या जाणार्‍या तेजस्विनी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. वर्षा राजेंद्र साखरकर (अलिबाग), सपना अमोल जाधव (पेण), स्नेहा गणेश कोदू, (अलिबाग), श्रुती संतोष अडीत (कर्जत), रेखा प्रभाकर मोरे (अलिबाग) यांची यंदाच्या तेजस्विनी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. समाजात आदर्शवत काम करणार्‍या आणि प्रसिध्दीच्या झोतात …

Read More »

युक्रेनमधील युद्धाचा थरारक अनुभव; अलिबागमधील तरुणी सुखरूप घरी परतली

अलिबाग : प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेली अलिबाग तालुक्यातील धेरंड येथील पूर्वा पाटील पाच दिवसांच्या खडतर प्रवासानंतर मंगळवारी (दि. 2) सुखरूप घरी पोहचली. तिच्या स्वागतासाठी तिचे कुटुंबीय, नातेवाइक, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. पूर्वा वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेली होती. तिथे ती विनित्सा शहरात वास्तव्याला होती. रशियाने केलेल्या …

Read More »

कर्जतमध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा

कर्जत : बातमीदार तालुक्यातील ताडवाडी येथील आदिवासी महिलेवर 4 फेब्रुवारी रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.  या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तसेच आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी आदिवासी सह्याद्री ठाकूर-कातकरी समाज उन्नती सामाजिक संस्थेने सोमवारी (दि. 28) कर्जत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.  ताडवाडी येथे बिगर आदिवासी …

Read More »

कृष्णा कोबनाक यांची नियुक्ती

श्रीवर्धन : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष कोकण विकास आघाडीच्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी ज्येष्ठ भाजप नेते कृष्णा कोबनाक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी कोबनाक यांना नियुक्ती पत्र प्रदान केले. नवनियुक्तीबद्दल कोबनाक यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Read More »

चौकमध्ये विद्यार्थी शुभचिंतन सोहळा

चौक : रामप्रहर वृत्त विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिर शाळेच्या एसएससी परीक्षेमध्ये प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा नुकताच संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र शहा यांच्या अध्यक्षतेखाली झाला. परीक्षेला सामोरे जात असताना आपल्या ध्येयापासून जराही विचलित होऊ नका. जोमाने अभ्यास करा. यश तुमचेच आहे. आमच्या कंपनीकडून …

Read More »

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वच्छता मोहीम; रेवदंड्यात 53 टन कचर्‍याचे संकलन

अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (दि. 1) स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत रस्ते, परिसर व समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला. या वेळी तब्बल 53 टन कचर्‍याचे संकलन करण्यात आले. भारताचे स्वच्छता दूत पद्मश्री डॉ. …

Read More »

खोपोली भाजप व्यापारी सेलतर्फे पाणपोईची सुविधा

खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या खोपोली शहर व्यापारी सेल तर्फे बाजारपेठेत पाणपोई उभारण्यात आली आहे. या पाणपोईचे लोकार्पण माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र साटम यांच्या हस्ते करण्यात आले. खोपोली बाजारपेठेत खरेदीसाठी परिसरातील खेडेगावातून आलेल्या ग्रामस्थांना पिण्याची पाण्याची सोय नव्हती. भाजपच्या वतीने व्यापारी सेलचे कीर्ती ओसवाल यांच्या सहयोगाने …

Read More »

भाजपशिवाय पर्याय नाही -अ‍ॅड. महेश मोहिते; मुरूडमधील बहुसंख्य तरुणांचा जाहीर पक्षप्रवेश

मुरूड : प्रतिनिधी भाजप हा जगातील सर्वांत मोठा व शक्तिशाली पक्ष आहे. जनतेला आता विश्वास पटला आहे की, भाजपच विकास करू शकतो. आगामी काळात भाजपशिवाय पर्याय असणार नाही, हे पक्के ठावूक असल्यानेच या पक्षात पक्ष प्रवेश करणार्‍यांची संख्या वाढत असल्याचे प्रतिपादन भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी सोमवारी …

Read More »