Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

शोतोकान कराटे असोसिएशनच्या खेळाडूंना रायगड भूषण पुरस्कार

अलिबाग : रामप्रहर वृत्त अलिबाग येथे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या चार खेळाडूंना विविध क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रविवारी (दि. 6) रायगड जिल्ह्यातील मानाचा रायगड भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया ही संस्था गेल्या 30 वर्षांपासून डॉ. मंदार पनवेलकरयांच्या अध्यक्षतेखाली मार्शल आर्टस् मधील विविध …

Read More »

विवाहितेचा छळ; महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील कांबळे तर्फे बिरवाडी येथील एका विवाहित महिलेने हुंड्यासाठी छळ केला जात असल्याची तक्रार केल्यानंतर महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात   पीडित महिलेचा पतीसह सासू-सासरे व अन्य लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे तर्फे बिरवाडी येथील चोवीस वर्षीय विवाहीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्याने तसेच माहेरुन …

Read More »

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

आरोपीला 10 वर्ष कारावास अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला येथील विशेष व अतिरिक्त सत्र न्यायालयाने 10 वर्ष कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अनिकेत अनिल वाजेकर असे आरोपीचे नाव आहे, अशी माहिती पोलीस विभागाच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाने दिली. आरोपी अनिकेत याची पीडित अल्पवयीन …

Read More »

माणगावामधून अपहरण झालेला अल्पवयीन मुलगा सापडला महाडमध्ये

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नाईटने गावातील अल्पवयीन मुलाचे बुधवारी दुपारी अपहरण अज्ञात व्यक्तीने केले होते. मात्र तो महाड एमआयडीसी पोलिसांना आढळला. माणगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याच्या आई्च्या हवाली केले. माणगाव तालुक्यातील नाईटने गावातील अंश अरविंद जाधव (वय 14) हा बुधवार (दि. 2) दुपारपासून  हरवला होता. शोध घेऊनही तो …

Read More »

महिला संधीचे सोने करतात -विनायकराव देशपांडे

खोपोलीत अ‍ॅड. मीनाताई बाम लिखित ईश्वरीइच्छा या पुस्तकाचे प्रकाशन खोपोली : प्रतिनिधी संधी मिळाली तर महिला संधीचे सोनं नक्कीच करतात, हे अ‍ॅड. मीनाताई बाम यांनी दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन विहिंप नेते विनायकराव देशपांडे यांनी शनिवारी (दि. 5) खोपोली येथे केले. विहिंप नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. मीनाताई बाम लिखित ईश्वरीइच्छा …

Read More »

युक्रेनहून परतलेल्या पेणमधील श्रध्दाच्या कुटुंबीयांनी मानले केंद्र सरकारचे आभार!

भाजपच्या वैकुंठ पाटील यांनी घेतली भेट पेण : प्रतिनिधी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमधील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील श्रद्धा किशोर पाटील ही विद्यार्थिनी शनिवारी (दि. 5)सकाळी सुखरूप आपल्या घरी पोहचली. श्रद्धाचे वडील किशोर पाटील यांनी श्रद्धा घरी सुखरूप आल्यानंतर भारत सरकारचे आणि विशेष करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. …

Read More »

महाडमध्ये आकाश पाळण्यात केस अडकून महिला गंभीर जखमी

महाड : प्रतिनिधी लहान मुलांच्या आकाश पाळण्यात डोक्याचे केस अडकल्याने एक महिला गंभीर जखमी होण्याची घटना शुक्रवारी (दि. 4) रात्री महाडच्या छबिन्यात घडली. या महिलेला अधिक उपचारासाठी मुंबईत जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पाळणाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे आकाश पाळण्यांच्या तांत्रिक तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. …

Read More »

बारावी परीक्षेच्या भीतीने रोह्यात तरुणाची आत्महत्या

धाटाव : प्रतिनिधी बारावीच्या परीक्षेला शुक्रवारी (दि. 4) राज्यात सुरुवात झाली असताना याच परीक्षेच्या भीतीने रोहे तालुक्यातील सानेगाव येथील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रवेश प्रकाश भांगरे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा नागोठणे पिंपळगाव येथील रहिवासी आहे. शिक्षणासाठी तो सानेगावमध्ये राहत होता. …

Read More »

कर्जतमध्ये शिबिरात 45 विद्यार्थ्यांचे रक्तदान

कर्जत ़: प्रतिनिधी कोंकण ज्ञानपीठ कर्जत कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने घाटकोपर मुंबई येथील समर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने घेतलेल्या शिबिरात 45 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, डॉ. सुजाता कुलकर्णी, …

Read More »

माणगाव तालुका पत्रकार संघ अध्यक्षपदी सलीम शेख

माणगाव : प्रतिनिधी येथील ज्येष्ठ पत्रकार सलीम शेख यांची गुरुवारी (दि. 3) माणगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पाचव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. माणगाव तालुका पत्रकार संघाची वार्षिक सभा गुरुवारी शासकीय विश्रामगृहात झाली. या सभेत संघाच्या नवीन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. त्यात निलेश म्हात्रे (उपाध्यक्ष), मजिद हाजिते (कार्याध्यक्ष), देवयानी मोरे (सचिव), …

Read More »