Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कळंब आऊट पोस्ट चौकीत महापूजा

कर्जत : बातमीदार नेरळ पोलीस ठाण्याच्या कळंब आऊट पोस्ट पोलीस चौकीत मंगळवारी महाशिवरात्री निमित्त महापूजा आयोजित केली होती. दिवसभर भजन, हरिपाठ, कीर्तन माध्यमातून समाजप्रबोधन करण्यात आले. कळंब येथील पोलीस चौकीत ग्रामीण भागात असून कळंब चौकी अंतर्गत सुमारे 60 गावे येतात. नेरळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजेंद्र तेंडुलकर, कर्जत पोलीस स्टेशनच्या …

Read More »

रायगडात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात

अलिबाग : प्रतिनिधी हिंदु धर्मातील सण उत्सवात महत्वाचे स्थान असणारी महाशिवरात्र रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 1) मोठ्या उत्साहात साजरी झाली. जिल्ह्यात सर्वत्र बमबम भोलेचा गजर सुरू होता. हर हर महादेवाच्या नामघोषाने शिवमंदिरे दणाणून गेली होती. ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी सकाळपासूनच शिवभक्तांची मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी …

Read More »

नेरळमध्ये भरवस्तीत दोन घरांमध्ये चोरी

कर्जत : बातमीदार नेरळ शहरातील राम मंदिर व गंगानगर या भर नागरी वस्तीमधील दोन घरातील किमती वस्तू घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला. नेरळच्या जुन्या बाजारपेठेतील राम मंदिराजवळ राहणारे हर्षद माणिकलाल शहा यांच्या घरी सायंकाळी सातच्या सुमारास चोरी झाली. घरातील तीन कपाटे फोडून चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेले आहेत. …

Read More »

सुधागड कलमवाडीतील पाणी योजनेचे लोकार्पण

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील कलमवाडी येथे स्वदेश फाउंडेशन व लोकवर्गणीतून नळ पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली आहे. या योजनेचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. या योजनेमुळे कलमवाडीतील ग्रामस्थांना नळाद्वारे शुद्धपाणी थेट घरापर्यंत मिळाले आहे. या पाणीपुरवठा योजनेमुळे कलमवाडी ग्रामस्थांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागली आहे. तहसीलदार दिलीप …

Read More »

महाडच्या विरेश्वर देवस्थानाला पर्यटनाचा दर्जा मिळवून देणार

 विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची ग्वाही महाड : प्रतिनिधी शिवकालीन जागृत देवस्थान असलेल्या महाडच्या विरेश्वर मंदिराला पर्यटनाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी येथे केले. महाडचे ग्रामदैवत विरेश्वर देवस्थानच्या छबिना उत्सवाला शिवरात्रीपासून प्रारंभ झाला आहे. या मंदिराचा छबिना उत्सव कोकणात प्रसिद्ध आहे. …

Read More »

पोलादपुरात श्रीसदस्यांची स्वच्छता मोहीम

पोलादपूर : प्रतिनिधी स्व. नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी दिनानिमित्त श्रीसदस्यांनी संपूर्ण पोलादपूर शहरात स्वच्छता मोहीम राबविली. हे काम स्तुत्यच आहे, असे  मत पोलादपूरच्या तहसीलदार दिप्ती देसाई यांनी मंगळवारी व्यक्त केले. पोलादपूर तालुक्यातील श्रीसदस्यांनी मंगळवारी सकाळपासून सुरू केलेल्या शहर स्वच्छता मोहिमेचा समारोप तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झाला. त्यावेळी तहसीलदार देसाई बोलत होत्या. श्रीसदस्य …

Read More »

माणगाव झाले चकाचक; 34 टन कचरा जमा

माणगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र भुषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंगळवारी श्री सदस्यांनी माणगावात स्वच्छता अभियान राबविले. या अभियानामध्ये 34 टन कचरा गोळा करून तो डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात आला. माणगाव तहसील कार्यालयापासून सकाळी 7.30 वाजता या स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली. शासकीय, निमशासकीय कार्यालय परिसर, सार्वजनिक ठिकाणे,रस्त्याच्या दुतर्फा तसेच …

Read More »

पेण शहरात श्री सदस्यांनी गोळा केला 62 टन कचरा

पेण : प्रतिनिधी महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे मंगळवारी पेण शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी तालुक्यातील पेण, दादर वरवणे, सापोली, हनुमानपाडा, वरसई, धावटे, वाशीनाका, रावे, वडखळ, आंबिवली, जिते, शिर्की या 15 बैठकांतील 1034 श्री सदस्यांनी 62 टन सुका व …

Read More »

गुरव समाजातील तरुणांनी उद्योजक बनावे -बंडू खंडागळे

पेण : प्रतिनिधी समाजातील तरुणांनी उद्योजक बनावे, त्यासाठी त्यांना संघटनेच्या वतीने मदत करण्यात येईल, अशी ग्वाही गुरव समाज ठाणे-रायगड-मुंबई या संस्थेचे अध्यक्ष बंडू खंडागळे यांनी पेण येथे दिली. गुरव समाज ठाणे-रायगड-मुंबई या संस्थेची सभा पेण पी. के. रिसॉर्ट येथे झाली. त्यावेळी बंडू खंडागळे बोलत होेते. समाज संघटनेत आता युवा पिढीला …

Read More »

अलिबाग प्रेस असोसिएशनचे तेजस्विनी पुरस्कार जाहीर

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने दिल्या जाणार्‍या तेजस्विनी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. वर्षा राजेंद्र साखरकर (अलिबाग), सपना अमोल जाधव (पेण), स्नेहा गणेश कोदू, (अलिबाग), श्रुती संतोष अडीत (कर्जत), रेखा प्रभाकर मोरे (अलिबाग) यांची यंदाच्या तेजस्विनी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. समाजात आदर्शवत काम करणार्‍या आणि प्रसिध्दीच्या झोतात …

Read More »