Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

‘मराठी भाषा जपली तरच आपल्या संस्कृतीची जपणूक होईल’

कर्जत : प्रतिनिधी आपली मायबोली मराठी भाषा आपण जपली तरच आपल्या संस्कृतीची जपणूक होईल, असे प्रतिपादन इतिहास संशोधक व व्याख्याते सागर सुर्वे यांनी कर्जतमध्ये केले. कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाने सेमिनार हॉलमध्ये मराठी राजभाषा दिनाचे आयोजन केले होते. सागर सुर्वे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. …

Read More »

क्षुल्लक कारणावरून मुरूडमध्ये पत्नीचा खून

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीमधील खोकरी येथे राहणार्‍या एका आदिवासी व्यक्तीने जेवण बनविले नाही याचा मनात राग ठेवत आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी पती उमेश रमेश वाघमारे (वय 26) याच्यावर मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजपुरी खोकरी परिसरात अब्दुल रहिमान यांचा …

Read More »

मुंबई-पुणे महामार्गावर दोन अपघात दोघांचा मृत्यू, 22 जण जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि. 1) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये  दोन जणांचा मृत्यू, तर 22 जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा सहारा सिटी येथून लग्न मंडपाचे साहित्य घेऊन निघालेला आयशर टेम्पो खंडाळा घाटात अंडा पॉइंटजवळ सुरक्षा कठडा तोडून खाली पडला. या वेळी टेम्पोच्या टपावर बसलेले 22 …

Read More »

प्रेमात अडसर ठरत असल्याने काटा काढण्याचा प्रयत्न; चौघांना अटक

अलिबाग : प्रतिनिधी माणगाव येथील मेडिकल दुकानदारावरील गोळीबार हा प्रेमप्रकरणातून झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले. प्रेयसीचा भाऊ प्रेमात अडसर ठरतो म्हणून त्याचा काटा काढण्यासाठी सुपारी देऊन त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांचा अन्य एक साथीदार फरार आहे. त्याचा …

Read More »

भाजप नेते वैकुंठ पाटील यांना जामीन मंजूर

अलिबाग ः प्रतिनिधी भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्यासह अन्य दोन जणांना अलिबाग सत्र न्यायालयाने पोक्सो प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांचे पुत्र तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्यासह तिघांना पोक्सो गुन्ह्यातील प्रत सोशल मीडियावर व्हायरल केल्याबाबत अलिबाग सत्र न्यायालयाने तंत्रज्ञान …

Read More »

मुरूडमध्ये ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा

मुरूड : प्रतिनिधी मराठी आपल्या संस्कारांची भाषा आहे. ग्लोबल युगात मराठी भाषेचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी मराठी माणसाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुरूड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांनी येथे केले. मराठी राजभाषा दिनानिमित्त वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण बोलत होते. मराठी आपल्या …

Read More »

कर्जतमध्ये साखळी पुस्तक योजना

कर्जत ़: बातमीदार मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथसंग्रहालय आणि विश्व हिंदू परिषद कर्जत प्रखंड यांच्या संयुक्त प्रयत्नाने रविवारी तालुक्यातील 16 आदिवासी पाड्यांवर हुतात्मा नाग्यादादा कातकरी साखळी पुस्तक योजना सुरू करण्यात आली असून पुस्तकांच्या एका संचाचे वाचन झाल्यानंतर दुसरा संच आयोजक देणार आहेत. वाडी-वस्तीत राहणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये …

Read More »

मराठी भाषेचा आदर करा -सचिन मयेकर

कर्जत : प्रतिनिधी सध्याच्या काळात इंग्रजीची गरज आहे, मात्र आपल्या मायबोलीला दुर्लक्षित करून चालणार नाही. आपल्या मराठी भाषेचा आपण कायम आदर ठेवला पाहिजे. आपली मुले इंग्रजी शाळेत शिकत असली तरी घरी शक्यतो मराठी भाषेचा वापर करा, असे आवाहन राज्य परिवहन महांडळाचे रायगड विभागीय भांडार अधिकारी सचिन मयेकर यांनी कर्जत येथे …

Read More »

महाड पालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले!

विकासाचा विचार घेऊन महाड नगरपालिकेतील मतदारांनी वेळोवेळी मतदान केले आहे. शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा एक अपवाद वगळता महाड नगरपालिकेत महाडचे शिल्पकार कै. अण्णासाहेब सावंत व त्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार कै. माणिकराव जगताप यांचीच एकहाती सत्ता राहिली आहे. सध्या महाड नगरपालिकेची मुदत संपली असून प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. बहुदा येत्या एप्रिलमध्ये महाड …

Read More »

पनवेल-कर्जत रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरण कामाला वेग; नवीन मार्गिकेचे काम 2024मध्ये करण्याचे उद्दिष्ट

कर्जत : बातमीदार पनवेल-कर्जत या 29 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर दुसरी मार्गिका टाकण्याचे काम मध्य रेल्वेकडून सुरु आहे. हे दुहेरीकरणाचे काम 2024मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे 2024पासून या रेल्वे मार्गावर उपनगरीय प्रवासी सेवा सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत-पनवेल या रेल्वे प्रकल्पाची सुरुवात कोकण रेल्वे बरोबरच …

Read More »