कर्जत : बातमीदार नेरळ जवळील ममदापूर गावातील वरच्या आळीमधील एका घरात रविवारी (दि. 20) सायंकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात संपूर्ण घराचे नुकसान झाले. सुदैवाने घरात असलेल्या सीताबाई रामा डांगरे या आजी थोडक्यात बचावल्या. ममदापूर गावात सीताबाई रामा डांगरे यांचे घर आहे. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सीताबाई जेवण बनवत …
Read More »पत्रकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण; आरोपीला अटक, पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
अलिबाग : प्रतिनिधी नेरळ येथील पत्रकार अजय गायकवाड यांच्यावर हल्ला करणार्याला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने सोमवारी (दि. 21) अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षणिक उपोषण करण्यात आले. पत्रकारांच्या शिष्टमंडळाने रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांची भेट घेतली. आरोपीला ताब्यात घेतले आहे, त्याला न्यायालयात हजर केले जाईल. न्यायालयाच्या …
Read More »शिक्षक पतपेढीत आरटीजीएस, एनईएफटी सुविधा
अलिबाग : प्रतिनिधी शिवजयंतीचे औचित्य साधत रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अलिबाग येथील मुख्यालयात शनिवारी आरटीजीएस आणि एनईएफटी सुविधा सुरू करण्यात आल्या. याचा लाभ पतसंस्थेच्या सभासद ग्राहकांना होणार असून व्यवहार करणे अधिक सुलभ होणार आहे. एखाद्या सभासदाचा मुलगा, मुलगी शिक्षणासाठी परदेशी अथवा इतर ठिकाणी असेल किंवा सभासद व त्याचा …
Read More »रोह्यात 85 जणांचे रक्तदान
रोहे : प्रतिनिधी रोहा-मुरुड क्षत्रिय मराठा समाज आणि वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त वतीने येथील भाटे सार्वजनिक वाचनालयात रविवारी (दि. 20) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 85 जणांनी रक्तदान केले. क्षत्रिय मराठा समाज अध्यक्ष काशीनाथ सावंत, सेक्रेटरी संदिप सावंत, सकल मराठा समाज तालुकाध्यक्ष अप्पा देशमुख, मराठा समाज …
Read More »घोटाळेबाज शिशिर धारकर यांना पेण पालिकेबाबत बोलण्याचा अधिकार नाही
भाजप नगरसेवक आणि पदाधिकार्यांचे प्रत्युत्तर पेण : प्रतिनिधी माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी पेणमधील नागरिक आणि पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना देशोधडीला लावले आहे. त्यांना पेण पालिकेबाबत बोलण्याचा अधिकार नाही तसेच त्यांचे आमदार रविशेठ पाटील यांच्याबाबत बालिश आणि बेताल वक्तव्य भाजप कदापि सहन करणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर देले जाईल, …
Read More »पैशाचा उपयोग जनसेवेसेसाठी केला पाहिजे -डॉ. तात्याराव लहाने
मुरूड : प्रतिनिधी जेव्हा आपण दुसर्यांच्या कामी येतो, तेव्हा त्यांचे आशीर्वाद आपणास मिळत असतात. पैशाचा उपयोग जनसेवेसाठी झाला तर लोकांचे आशीर्वाद मिळून आपला निश्चितच फायदा होतो, असे प्रतिपादन ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी मुरूड येथे केले. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी मुरूड येथील संजवनी आरोग्य सेवा संस्थेस भेट …
Read More »मयूर शेळके शिव पुरस्काराने सन्मानित
कर्जत : बातमीदार तालुक्यातील चांधई ग्रामस्थ आणि हुतात्मा हिराजी पाटील तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी लहान चांधई येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी शूरवीर मयूर शेळके यांना शिव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इतिहास संशोधक शिवश्री वसंत कोळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान चांधई येथे गेल्या 16 वर्षापासून शिवजयंती साजरी …
Read More »उल्हास नदीतील गाळ काढा; निर्मल जल अभियान कार्यकर्त्यांची मागणी
कर्जत : बातमीदार बारा महिने वाहणार्या कर्जतमधील उल्हास नदीला कचरा, गाळ यामुळे विद्रुप स्वरूप आले आहे. नदीतील गाळ काढण्याची मागणी उल्हास नदी निर्मल जल अभियानाच्या कार्यकर्त्यांनी कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या वर्षी उल्हास नदीला आलेल्या पुराचे पाणी कर्जत शहरात घुसले होते. त्यामुळे शहरातील कोतवाल नगर, मुद्रे, …
Read More »महापुरानंतर महाडमधील पहिला मजला रिकामा
22 जुलै रोजी आलेल्या महापुरामध्ये महाड शहर आणि तालुक्यातील अनेक गावांचे अतोनात नुकसान झाले होते. शहरातील पुराच्या पाण्याची पातळी कधी नव्हे ती जवळपास 20 फुटापर्यंत पोहोचली. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान महाडकर नागरिकांना सहन करावे लागले होते. या महापुरानंतर महाड शहर पुन्हा उभे राहते की, नाही प्रश्न होता. मात्र मोठ्या …
Read More »महाडमध्ये महिलांची क्रिकेट स्पर्धा
महाड : प्रतिनिधी येथील क्रिकेट कट्टा ग्रुपच्या वतीने खास महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत स्टार क्रिकेट संघाने विजेतेपद पटकाविले, तर झेडपी संघ उपविजेता ठरला. महिलांना सांघिक खेळांमधून संधी मिळावी यासाठी क्रिकेट कट्टा ग्रुपची स्थापना करून या ग्रुपच्या वतीने रविवारी (दि. 20) महाडमध्ये महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात …
Read More »