Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश स्वामी यांची खालापूर न्यायालयास भेट

खोपोली : प्रतिनिधी वकीलांनी जास्तीत जास्त दावे मध्यस्थीच्या माध्यमातून मिटवावेत, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश स्वामी यांनी खालापूर येथे केले. लोक अदालत व कायदेशीर मार्गदर्शन याकरिता अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश स्वामी यांनी अलीकडेच खालापूर न्यायालयास भेट दिली. त्यावेळी खालापूर बार असोसिएशनने आयोजित केलेल्या वकिलांच्या सभेत न्या. स्वामी मार्गदर्शन करीत होेते. 12 …

Read More »

नसरापूर येथे बचतगटांसाठी मार्गदर्शन

कर्जत : बातमीदार आदित्य दृष्टी सामाजिक विकास प्रतिष्ठित मार्फत   कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायत कार्यालयात बचतगट सक्षम आणि स्वावलंबी होण्यासाठी महिलांना  मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात प्रशिक्षक सुवर्णा चव्हाण यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सरपंच प्रमिला मोहिते, उपसरपंच दीपा कोळंबे, योगिता कोळंबे, कविता हिलम, ज्ञानगंगा ग्रामसंघाच्या हर्षदा थोरवे, सारिका …

Read More »

मिळखतखार-मळा रस्त्याला ग्रामस्थांचा विरोध

जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील मिळखतखार-मळा या रस्त्याचा विषय गेली काही दिवस माध्यम-समाजमाध्यमातून चर्चेला आला आहे. मात्र काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन सादर करून विरोधी भूमिका मांडली आहे. मिळखतखार-मळा या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने तेथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणी साठी काही …

Read More »

किल्ले रायगड परिसरात डोंगरउतारावर भूसंपादन करण्यास स्थानिकांचा आक्षेप

महाड उपविभागीय अधिकार्‍यांना ग्रामस्थांचे निवेदन महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडावर आणि परिसरात रायगड प्राधिकरण आणि शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत, मात्र या विकासकामांसाठी डोंगर उतारावरील जमिनी संपादित करण्याचा डाव स्थानिक प्रशासन आणि जमीन विक्रेत्यांनी रचला असून त्याला रायगडवाडी, हिरकणीवाडीमधील ग्रामस्थांनी आक्षेप घेत अशा जमिनी संपादित केल्या जावू …

Read More »

कर्जत तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा

18 गावे, 57 आदिवासीवाड्यांसाठी आराखडा तयार कर्जत : बातमीदार तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यात पाणीटंचाई जाणवू लागली असून तेथील ग्रामस्थांनच पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दरम्यान, येत्या उन्हाळ्यात 18 गावे आणि 57 आदिवासी वाड्यांना पाणीटंचाई भासेल असे गृहीत धरून कर्जत तालुका पाणीपुरवठा कृती आरखडा तयार करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील …

Read More »

मंत्री मलिक यांचा राजीनामा घ्या

भाजपची मागणी; अलिबाग, रोहा, मुरूड, खोपोलीत निदर्शने; निवेदन सादर अलिबाग : प्रतिनिधी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेले राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नबाब मलिक यांचा अलिबाग तालुका भाजपतर्फे गुरुवारी (दि. 24) निषेध करण्यात आला. मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या वेळी करण्यात आली. भाजपचे अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

एक्स्प्रेस वेवर अपघातात एक ठार, सहा जण जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी हद्दीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. द्राक्ष भरलेला टेम्पो मुंबईकडे चालला असताना त्याचा टायर निकामी झाला. त्यामुळे टेम्पोमधील तीनजण खाली उतरले असता मागून येणार्‍या प्रवासी बसने …

Read More »

कर्नाटकमधील कार्यकर्त्याच्या हत्येचा कर्जतमध्ये निषेध

कर्जत : बातमीदार समान गणवेशासाठी भगव्या शालेचे आंदोलन उभे करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्षा (वय 26) यांची कर्नाटकातील शिमोगा शहरात जिहादी विचारधारेच्या लोकांकडून हत्या करण्यात आली होती. बजरंग दलाच्या वतीने कर्जत येथे बुधवारी (दि. 23) या हत्येचा निषेध करण्यात आला. हर्षा यांनी कर्नाटकात समान गणवेशासाठी भगव्या शालेचे मोठे आंदोलन उभे …

Read More »

मेंढपाळ कोकणात दाखल

पाली : प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ व त्यांचे तांडे  कोकणातील सह्याद्री पर्वताच्या पट्ट्यात दाखल झाले आहेत. पाली-खोपोली राज्य महामार्ग, पेण-अलिबाग मार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आता शेळ्या व मेंढ्यांचे कळप दिसू लागले आहेत. धनगर समाज बहुतांश ठिकाणी स्थिरावला असला तरी आजही मेंढपाळ गावोगावी आपला कबिला घेऊन भटकंती करताना दिसतोय. मान्सूनचा पाऊस …

Read More »

खालापूर तहसील कार्यालयात शुकशुकाट

खोपोली : प्रतिनिधी नवीन पेन्शन योजना रद्द करा इतर आर्थिक सेवा विषयक प्रश्न तात्काळ सोडवा, यासह विविध मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे खालापूर तहसील कार्यालयात बुधवारी (दि. 23)चिटपाखरूदेखील नव्हते. सरकारी निमसरकारी कर्मचार्‍यांनी लाक्षणीक संपाचा इशारा दिला होता, बुधवारी खालापूर तहसील कार्यालयाच्या आवारात कर्मचार्‍यांनी काम बंद करून घोषणा दिल्या. कर्मचारी संपावर …

Read More »