Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

नागोठणे भाजप कार्यालयात शिवजयंती

नागोठणे : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या नागोठणे कार्यालयमध्ये शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भाजपचे रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, सरचिटणीस आनंद लाड, शिक्षण सेल तालुका अध्यक्ष अहिरे, शितल नागरे, माधुरी रावकर, निलमा राजे, सोनी पांडे, …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरे की मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे?; कोर्लईतील मालमत्तेवरून किरीट सोमय्यांची चौकशी मागणी

रेवदंडा ः प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी कोर्लईचे सरपंच, शिवसेना कार्यकर्ते म्हणतात इथे बंगले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणत आहेत की माझे बंगले आहेत. खरे कोण आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की मिसेस मुख्यमंत्री रश्मी उद्धव ठाकरे? असा सवाल करीत याबाबत चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी …

Read More »

पेण येथे रायगड जिल्हा क्रिकेट निवड चाचणी

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याचा वरिष्ठ गटाचा पुरुषांचा क्रिकेट संघ निवडण्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे 23 व 24 फेब्रुवारी रोजी पेण येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे,  अशी माहिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली. या निवड चाचणीतून निवडण्यात येणारा रायगडचा संघ महाराष्ट्र …

Read More »

खालापूर परखंदे येथे दाखले वाटप शिबिर

खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील वावोशी मंडळ कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या आदिवासीवाड्यांतील ग्रामस्थांचे जातीचे दाखले, रेशनकार्ड विभाजन आणि नवीन नाव नोंदणीसाठी परखंदे आदिवासीवाडीत घेतलेल्या शिबिराला आदिवासी बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे 200 आदिवासी बांधव सहभागी झाले होते. शिबिरात जातीच्या दाखल्यांची 57 प्रकरणे तर 69 रेशनकार्डवर नोंदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. …

Read More »

कर्जतमध्ये महिलासाठी आरोग्य तपासणी शिबिर

अभिनेत्री जुई गडकरी पालिकेच्या स्वच्छता दूत कर्जत : बातमीदार कर्जत नगर परिषद महिला बालकल्याण समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. 18) शहरातील महिलांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात रक्तगट व आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच अभिनेत्री जुई गडकरी यांची कर्जत नगर परिषदेच्या स्वच्छता दूत म्हणून निवड जाहीर करण्यात आली. कर्जत नगर …

Read More »

कर्जतमध्ये अनेक विकासकामांचे लोकार्पण

कर्जत : प्रतिनिधी शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी कर्जत नगर परिषदेने कोपरा गार्डन संकल्पना राबवली आहे. या माध्यमातून नगर परिषदेने अनेक ठिकाणी स्टॅच्यू उभारले आहेत. त्यांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि. 18) संपन्न झाला. सुवर्णा जोशी यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार सांभाळला या घटनेला शुक्रवारी तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला, त्याचे औचित्य साधून …

Read More »

महाविकास आघाडीमधील भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही

किरीट सोमय्या यांचा पेणमधील पत्रकार परिषदेत इशारा पेण : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी (दि. 18) पेण येथे पत्रकार परिषदेत दिला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी कोर्लई (ता. मुरूड) …

Read More »

वक्तृत्व स्पर्धेची सांघिक ढाल नेरळ महाविद्यालयाने जिंकली

कर्जत : बातमीदार विद्या मंदिर मंडळाच्या शांताबाई नाडकर्णी स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाने सांघिक ढाल पटकावली. नेरळ विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शांताबाई नाडकर्णी स्मृती वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या रायगड आणि ठाणे जिल्हा आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धेत अंबरनाथ, कर्जत, खालापूर तालुक्यातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी …

Read More »

पेणमध्ये दाखले वाटप, रक्तदान शिबिर

पेण : प्रतिनिधी येथील गणपतीचीवाडी येथे अमोद रामचंद्र मुंढे आणि नरेश हिरामण आंबेकर यांच्या जन्मदिनानिमित्त अष्टविनायक मित्र मंडळाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पीटल ब्लडबँकचे डॉ. गोसावी व त्यांच्या सहकार्‍यांनी रक्त संकलनाचे काम केले. या शिबिरात 36 जणांनी रक्तदान केले. तसेच मंडळनिरीक्षक प्रकाश मोकल, …

Read More »

मुरूडमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

मुरूड : प्रतिनिधी येथील तहसील कार्यालय आणि उरण नागरी संरक्षण दल उपनियंत्रक यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड पंचायत समिती सभागृहात 17 व 18 फेब्रुवारी रोजी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यांतील जीवरक्षक, नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी या शिबिरात सहभागी …

Read More »