Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे महाडमध्ये ब्लँकेट वाटप

महाड : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे महाड येथील गोंडाळे आदिवासीवाडीवर ब्लँकेट आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाड भाजप मंडळाच्या वतीने तालुक्यातील गोंडाळे आदिवासीवाडीवर ब्लँकेट वाटप करण्यात आले, तसेच तेथील आदिवासी मुलांना …

Read More »

काशिद समुद्रात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू

मुरूड : प्रतिनिधीमुरूडजवळील प्रसिद्ध काशिद समुद्रात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 18) घडली. पोहायला उतरलेल्या या पर्यटकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. ही बाब किनार्‍यावरील जीवरक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दोघांना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले.सुरजित नस्कर (वय 25) व पलट्टूसूत्रधार …

Read More »

झुडपात हरवले मध्य रेल्वेचे केळवली स्टेशन

खालापूर : प्रतिनिधी फलाटावर वाढलेले गवत, झाडीझुडपे, इतरत्र पसरलेला केरकचरा, भटकी कुत्री, मोकाट गुरेढोरांसह साप व विंचू यांचा वावर यामुळे मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोली मार्गावरील केळवली स्टेशनला उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.  रेल्वे व्यवस्थापन उपनगरीय प्रवाशांना मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. केळवली स्टेशनमध्ये प्रवाशांना ना …

Read More »

नेरळ दहिवली गावात दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा

कर्जत : बातमीदार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी प्रकल्पग्रस्त ठाम आहेत. भूमिपुत्र ‘दिबा’ यांच्या नावाचा आग्रह राज्य शासनाने मान्य करावा, यासाठी नेरळ-कळंब रस्त्यावरील दहिवली गावातील भवारे बंधू यांनी गणेशोत्सवामध्ये सजावट केली आहे. कर्जत तालुक्यात नेरळ दहिवली येथे भवारे कुटुंबाने गणपतीची सजावट म्हणून शेतकरी …

Read More »

खोपोली भाजप युवा मोर्चाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

खोपोली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, खोपोली भाजप युवा मोर्चाच्या वतीने शालोम एज्युकेशन या दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना शुक्रवारी (दि. 17) खाऊचे वाटप तसेच भेटवस्तू देण्यात आल्या.  भाजपचे खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, युवा मोर्चा शहराध्यक्ष अजय इंगुळकर, उपाध्यक्ष पूनित तन्ना, सरचिटणीस विनायक माडपे, कार्यकर्ते सिद्धेश पाटील, …

Read More »

महाडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरला अपघात

नऊ प्रवासी जखमी महाड : प्रतिनिधी तालुक्यातील विन्हेरे-तुळशीखिंड मार्गावरील कुर्ला गावाजवळ महाड दिशेने येणारा टेम्पो ट्रॅव्हलर बस रस्त्याकडेला पलटी झाली. या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले. खेडकडून मुंबईच्या दिशेने निघालेली टेम्पो ट्रॅव्हलर बस (एमएच-04, जेयु-6484) कुर्ला गावाजवळ आली असता एक उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने ही बस रस्त्याकडेला पलटी झाली. या …

Read More »

रायगडात मुबलक पाणीसाठा

26 धरणे ओव्हरफ्लो, दोन धरणांत 90 टक्के पाणीसाठा रोहे ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाची रायगड जिल्ह्यातील 28 पैकी 26 धरणे तुडूंब भरून वाहू लागली आहेत. तर उर्वरित दोन धरणात 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला असून ही दोन्ही धरणे भरून वाहण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे …

Read More »

सुधागडातील गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्याच्या जांभुळपाडा पोलीस दुरक्षेत्र हद्दीत पेंढारमाळ ठाकूरवाडी डोंगर परिसरात सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी गुरुवारी (दि. 16) पोलिसांनी उद्ध्वस्त केली. याबरोबर सापडलेला मुद्देमालदेखील नष्ट करण्यात आला. पाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मनोहर म्हात्रे, पोलीस नाईक कांचन भोईर व शिपाई रामसेवक …

Read More »

चणेरा येथे 41 जणांचे रक्तदान

मुरूड : प्रतिनिधी रोह्यातील दीपस्तंभ शिवशंभो सामाजिक संस्थेने  जिल्हा शासकीय रक्तकेंद्राच्या सहकार्याने चणेरे येथील कुणबी समाज हॉलमध्ये नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 41 जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन रोहा पंचायत समिती उपसभापती रामचंद्र सकपाळ यांनी केले. या वेळी चणेरा सरपंच प्रसन्ना सिनकर, संस्थेचे अध्यक्ष संतोष भोईर, तसेच …

Read More »

कर्जतमध्ये कोरोना लसीकरण शिबिर

कर्जत : बातमीदार येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने कर्जत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्री कपालेश्वर मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या शिबिरात 201 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. या वेळी कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. या लसीकरण शिबिरात उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. संगीता दळवी यांच्या मार्गदर्शखाली रूपेश लाड, पूनम जगडुळे, रूपाली कांबळे, शाहीन …

Read More »