Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मुरूडमधील विहूर पूल धोकादायक; सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

मुरूड : प्रतिनिधी अतिवृष्टीमध्ये मुरूड-मुंबई रस्त्यावरील विहूर पुलाजवळ मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे या पुलावरून एकेरी वाहतूक सुरु आहे. सततच्या पावसामुळे येथील खड्डा मोठा होत आहे, मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत आहे. प्रवासी मात्र येथून जीव मुठीत धरून प्रवास करताना दिसत आहेत. मुरूड येथून मुंबईकडे जाणार्‍या महत्त्वाच्या मार्गावर …

Read More »

मुरबाड-कर्जत महामार्गावरील म्हसा येथील पुलाला भेगा

कर्जत : बातमीदार मुरबाड-कर्जत-खोपोली महामार्गावर म्हसा येथे बांधलेल्या नवीन पूलाला काही महिन्यातच भेगा पडल्या आहेत. या पुलाला काही धोका निर्माण झाल्यास हा महामार्ग बंद होऊ शकतो. दरम्यान, पुलाचे काम चांगले झाले असून नवीन पुलाला कोणताही धोका नाही, असा दावा रस्ते विकास महामंडळकडून करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गवरील वाहने कसारा-डोळखांब येथून …

Read More »

अलिबागमधील सागाव फिडरमध्ये बिघाड; पाच हजार ग्राहक अंधारात; 16 तासाने वीजपुरवठा सुरळीत

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 21) रात्री मुसळधार पावसासोबत वीजाही चमकत होत्या. अलिबाग तालुक्यातील सागाव फिडरवरील वाडगाव येथील इन्सुलेटरवर वीज पडून रात्री साडेनऊ वाजता वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पाच हजार ग्राहकांना रात्र अंधारात काढावी लागली. सोळा तासानंतर बुधवारी वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरण कर्मचार्‍यांना यश आले आहे.  अलिबाग तालुक्यातील …

Read More »

नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे; आमदार रविशेठ पाटील यांचे आवाहन

पेण : प्रतिनिधी  बर्‍याच वेळी कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करूनही अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत, हे लक्षात घेऊन पेण शहरामध्ये ठिकठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तेथे जावून नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेऊन आपले आरोग्य जपावे, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी केले. आमदार रविशेठ पाटील यांच्या पुढाकरने …

Read More »

महाविकास आघाडीत महानाराजी

गेली दोन वर्षे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण शांत होते, परंतु मागील तीन दिवसांपासून रायगडचे वातावरण तापू लागले आहे. शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी श्रीवर्धन येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्याच्या दुसर्‍याच दिवशी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनीदेखील पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. …

Read More »

राष्ट्रवादीसोबत आघाडी नकोच!

रायगडातील शिवसेना पदाधिकार्‍यांची उद्योगमंत्री सुभाष देसाईंसमोर स्पष्ट भूमिका माणगाव ः प्रतिनिधीआम्हाला कुठल्याही पक्षासोबत आघाडी करायला सांगा, पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत यापुढे जमणार नाही, अशी स्पष्ट भूमिका रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार आणि प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर बुधवारी (दि. 22) मांडली. जिल्हा परिषदेसह आगामी स्थानिक …

Read More »

अतुल झेंडे रायगडचे नवीन अप्पर पोलीस अधीक्षक

अलिबाग : प्रतिनिधी सचिन गुंजाळ यांच्या प्रशासकीय बदलीमुळे रिक्त झालेल्या रायगडच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदावर अतुल झेंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मंगळवारी (दि. 21) पदाची सूत्रे स्वीकारली. अतुल झेंडे यापूर्वी सोलापूर ग्रामीण येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून येथे कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी नाशिक आणि रायगड जिल्ह्यात माणगाव येथे …

Read More »

विवाहितेवर बलात्कारप्रकरणी चुलत सासर्याला सक्तमजुरी

माणगाव सत्र न्यायालयाचा निकाल पोलादपूर : प्रतिनिधी धनगर कुटूंबातील अल्पवयीन विवाहितेवर तिच्याच चुलत सासर्‍याने तिचे अपहरण करून वरंध घाटातील एका टपरीमध्ये तसेच एका मंदिराच्या पडवीमध्ये तीनवेळा बलात्कार केल्याचा गुन्हा 13 जानेवारी 2018 रोजी घडला होता. याप्रकरणी माणगाव सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि. 21) आरोपी चुलत सासर्‍याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि एक …

Read More »

रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाचे धुमशान

माथेरान, नेरळ परिसर जलमय कर्जत : बातमीदार गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पावसाने तालुक्यात कुठेही नुकसान नाही, मात्र नेरळ आणि माथेरान परिसर जलमय झाला.दरम्यान,नेरळ गावातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी घरात घुसले असून या पावसाने अनेकांच्या घरातील किमती साहित्याचे नुकसान …

Read More »

सुधागडातील प्रसाद भिलारेची फुटबॉल चॅम्पियन स्पर्धेत निवड

पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील खेळाडू आपल्या क्रीडा कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकत असून कळंबोशी गावचा सुपुत्र प्रसाद देविदास भिलारे याची इंडोनेशिया नेपाळ आशियाई फुटबॉल चॅम्पियन स्पर्धेत 19 वयोगटात नुकतीच निवड करण्यात आली आहे.    सध्या प्रसाद हा मिठागर फुटबॉल क्लब मुंबई या संघाकडून खेळतो आहे. फुटबॉलबरोबरच कराटेमध्येदेखील प्रसादने …

Read More »