Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

ऐन पावसाळ्यात नेरळमध्ये पाणीटंचाई

थकीत बिलामुळे महावितरणने कापली नळपाणी योजनेची वीजजोडणी कर्जत : बातमीदार लाखो रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने गुरुवारी (दि. 15) नेरळ नळपाणी योजनेची वीज जोडणी कापली आहे. त्यामुळे शुक्रवारी शहराच्या अनेक भागात पाणी पोहचले नाही. आणि ऐन पावसाळ्यात नेरळमध्ये पाणीटंचाई दिसून आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने 1998 मध्ये नेरळ गावासाठी …

Read More »

अखेर शेतकर्यांपुढे शासन नमले!

प्रस्तावित नावंढे एमआयडीसी जमीन संपादन प्रक्रिया रद्द; कृती समितीला यश खोपोली ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील नांवढे येथील होऊ घातलेल्या एमआयडीसीला स्थानिक शेतकरी व त्यांच्या कृती समितीने केलेल्या विरोधामुळे राज्य शासनाला नमते घ्यावे लागले आहे. प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन संपादनकामी शासनाकडून शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावर ज्या पेन्सिल नोंदी करण्यात आल्या होत्या, त्या आता …

Read More »

मंडळ अधिकारी लाच स्वीकारताना जेरबंद

अलिबाग : प्रतिनिधी बक्षीसपत्र जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर नावनोंदणी करण्यासाठी अडीच हजारांची लाच स्वीकारताना रोहा तालुक्यातील घोसाळे मंडळ अधिकारी राजेश जाधव याला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. यातील तक्रारदारांच्या वडिलांनी त्यांच्या मालकीची जमीन तक्रारदार यांना बक्षीसपत्र रजिस्टर करून दिली होती. त्याची सातबारा उतार्‍यावर नोंद करून प्रत उपलब्ध करून देण्यासाठी …

Read More »

म्हसळाकरानी महावितरणचे थकविले रुपये 4 कोटी 52 लक्ष 47 हजार

म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील 5073 वीज ग्राहकांनी महावितरणचे तब्बल चार कोटी 52 लाख 47 हजार थकविले असून, त्याच्या वसुलीसाठी यापुढे कोणतीही सवलत मिळणार नाही, असे महावितरणचे म्हसळा येथील उपकार्यकारी अभियंता प्रदीप पटवारी यानी सांगितले. म्हसळा तालुक्यातील आंबेत, खामगाव, मेंदडी, म्हसळा शहर या विभागातील 5776 ग्राहकांनी वीज बिलांपोटी चार कोटी 52 …

Read More »

भाजपतर्फे म्हसळा, श्रीवर्धनमध्ये अन्नधान्य वाटप

म्हसळा ़: प्रतिनिधी भाजप कोकण विकास आघाडीच्या सहकार्याने आणि श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ भाजप अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या प्रयत्नाने श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील गरीब व गरजूंना बुधवारी (दि. 14) अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव आणि रोजगाराच्या संधी नसल्यामुळेे अनेक गरीब कुटुंबे सध्या त्रस्त आहेत, हे लक्षात घेऊन श्रीवर्धन …

Read More »

रेवस-करंजा पूल काळाची गरज

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅ. ए. आर. अंतुले यांनी रेवस -रेड्डी असा कोकणासाठी सागरी  महामार्ग बांधण्याचे स्वप्न पाहिले होते. या मार्गावरील महत्वाचा टप्पा म्हणजे  रेवस-करंजा पूल. त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने हे पूल पूर्ण करण्याची घोषण केली. मात्र पूल काही बांधले गेले नाही. पुलाची घोषणा झाली की, काही दिवस …

Read More »

माथेरान म्हणजे नैसर्गिक ऑक्सिजन केंद्र -जिल्हाधिकारी

कर्जत : बातमीदारघनदाट जंगलामुळे माथेरान हे ऑक्सिजनचा खजाना असलेले केंद्र असून येथे आल्यावर मन प्रसन्न होते, असे प्रतिपादन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले.जिल्हाधिकारी निधी चौधरी या परिवारासोबत माथेरानला पर्यटनासाठी आल्या आहेत. खाजगी दौरा असूनही त्यांनी येथील बी. जे. हॉस्पिटलमधील कोविड वार्ड, ओपीडी, ऑक्सिजन यंत्रणा यांची पहाणी केली. तसेच तेथील …

Read More »

चाईल्ड लाइन,‘जाण‘कडून पूर्वाला आधार

खालापूर : प्रतिनिधी वडील गमावलेल्या आणि आई मानसिक रुग्ण असलेल्या खोपोलीतील आठ वर्षांच्या पूर्वा राहुल देवकुळे या मुलीच्या पुनर्वसनाची जबाबदारी रायगड चाईल्ड लाइन या संस्थेने घेतली आहे. तर पनवेलच्या जाण फाऊंडेशनने तिच्या संगोपन, शिक्षणाची  जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे पूर्वाच्या आयुष्याला मिळाली नवी दिशा मिळाली आहे.पूर्वा राहुल देवकुळे या अवघ्या आठ वर्षाच्या …

Read More »

पुरामुळे नांदगाव हायस्कूलचे नुकसान

मुरुड : प्रतिनिधीतालुक्यातील यशवंतनगर नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयाच्या कार्यालयासह प्रत्येक वर्गात पुराचे पाणी शिरल्यामुळे शाळेतील  वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.मुरूड तालुक्यात सोमवारी 348 मिलीमीटर त्यानंतर दुसर्‍या दिवशी मंगळवारी 204 मिलीमीटर पाऊस पडल्याने नदी व समुद्राशेजारी असणार्‍या सर्व गावांत पुराचे पाणी शिरले. नांदगाव हायस्कूलमध्ये तर प्रत्येक वर्गात …

Read More »

‘रुनाया’तर्फे लसीकरण मोहीम; नवेदर नवगावातील 500 नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लस

अलिबाग ः रामप्रहर वृत्त भारतातील सर्वांत वेगाने वाढणार्‍या मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट अप्सपैकी एक असलेल्या रुनाया समूहाने कोविडच्या संकटावर मात करण्यात सरकारच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होत अलिबाग तालुक्यातील नवेदार नवगाव गावात लसीकरण मोहीम राबविली. यामध्ये तब्बल 500 नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्यात आला. रायगड जिल्ह्यात विशेषत: अलिबाग भागात गेल्या काही आठवड्यांमध्ये कोविड …

Read More »