पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते सीसीटीव्ही संचाचे लोकार्पण खोपोली, खालापूर : प्रतिनिधी पूर्वी गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी खबर्यांचे जाळे असायचे. आता बदलत्या काळाप्रमाणे सीसीटीव्ही तंत्रज्ञान पोलीस विभागाकरिता अतिशय उपयुक्त ठरत असून, खालापूर येथे लोकसहभागातून सीसीटीव्ही संचाचे लोकार्पण करताना अतिशय आनंद होत आहे, अशी भावना रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी …
Read More »वृक्ष लागवड मोहिमेवर कोरोनाचा परिणाम
रोपांच्या संख्येत घट; यंदाचा लक्ष्यांक घसरला अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे यंदाच्या पावसाळ्यात वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत किमान 200 झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाकरिता जिल्ह्यातील विविध रोपवाटिकांमध्ये रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, मात्र यंदा कोरोनामुळे नवीन …
Read More »अवकाळी पावसाचा पाणीटंचाईग्रस्त भागाला आधार
कर्जत तालुक्यातील दरवर्षी जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन या वर्षी संभाव्य पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला होता, मात्र या वर्षी उन्हाळ्यात अनेकदा अवेळी पाऊस आला आणि या अवेळी पावसाने मार्च महिन्यात तळ गाठणार्या विहिरींत पाणी साचून राहत होते. दरम्यान, त्यामुळे कर्जत तालुक्यातील 19 गावे आणि 57 वाड्या पाणीटंचाईग्रस्त होत्या, मात्र …
Read More »माजी आमदार सुरेश लाड यांच्या समर्थकांकडून आमदार महेंद्र थोरवे यांचा जाहीर निषेध
कर्जतमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीमधील वाद वाढला कर्जत ः बातमीदार रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे तसेच कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांच्यावर शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेले आरोप आणि अर्वाच्च भाषेतील वक्तव्याबद्दल कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि. 29) निषेध करण्यात आला. कर्जत …
Read More »शिवभोजन केंद्रांची बिले रखडली
सुधागड तालुक्यातील केंद्रचालक हवालदिल पाली : प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांना मोफत शिवभोजन थाळी पुरवणार्या केंद्रचालकांवरच आता उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाकडून गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून मोबदला न मिळाल्याने सुधागडातील शिवभोजन केंद्रचालक हवालदिल झाले आहेत. लॉकडाऊन काळात हातावर पोट असलेले मजूर, कष्टकरी, श्रमजीवी वर्गातील गोरगरीब लोकांची उपासमार होऊ नये, …
Read More »पत्नीची हत्या, पतीला अटक
साळाव संजयनगर आदिवासीवाडीतील घटना रेवदंडा : प्रतिनिधी किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार मारल्याची घटना साळाव संजयनगर आदिवासीवाडीत घडली. या प्रकरणी रेवदंडा पोलिसांनी पतीला अटक केली आहे. संजय सुंदर वाघमारे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो साळाव (ता. मुरूड) येथील बिर्ला मंदिराच्या बाजूला असलेल्या …
Read More »जांभूळपाडा गावावरील पाणी संकट संपले
ग्रामपंचायतीने बसविला नवीन पंप पाली : रामप्रहर वृत्त पाणीपुरवठा योजनेतील पंप नादुरुस्त झाल्यामुळे जांभूळपाडा (ता. सुधागड) ग्रामस्थांवर ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट ओढवले होते, परंतु ग्रामपंचायतीने नवीन पंप बसविल्यानंतर शुक्रवारी (दि. 28) येथील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. जांभूळपाडा गावाला येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. नदीचे पाणी एका मोटार पंपाने उचलून …
Read More »पंचनामे झाले, मदतीची मात्र प्रतीक्षा
चक्रीवादळात रायगडातील घरे, आरोग्य केंद्र, शाळा इमारतींची पडझड; पाणी योजना, फळबागा, बोटी, महावितरणचे नुकसान अलिबाग : प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. वादळग्रस्तांना आता शासनाकडील मदतीची प्रतीक्षा आहे. तौक्ते चक्रीवादळचा रायगड जिल्ह्यातील …
Read More »नाकाबंदी, पोलीस कारवाईने नागरिक हैराण
खोपोली : प्रतिनिधी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून खोपोलीतील अनेक रस्ते पोलीस प्रशासनाने बॅरिगेटिंग करून बंद केले आहेत. तर बाजारपेठेकडे जाणार्या मुख्य व एकमेव रस्त्यावर पोलिसांकडून दररोज नाकाबंदी करून वाहने तपासणी केली जात आहे. यात लायसन्स नसेल किंवा बाजारात येण्यासाठी योग्य कारण नसेल तर दंडात्मक कारवाई केली जात आहे. या दररोजच्या कारवाईबाबत …
Read More »पोलादपूर एसटी बसस्थानकातील सांडपाणी वाहिनी होणार दुरुस्त
निविदा निघाली; भर पावसातही काम राहणार सुरू पोलादपूर : प्रतिनिधी येथील एसटी स्थानकातील सांडपाणी वाहिनीच्या दुरुस्तीची निविदा अखेर काढण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले सांडपाणी वाहिनी दुरुस्तीचे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, हे काम भरपावसाळ्यात करण्यात येणार असल्याने त्याचा दर्जा आणि गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होणार आहे. …
Read More »