पाली ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागात विळे भागाड औद्योगिक क्षेत्रात असलेल्या आंतरराष्ट्रीय पास्को कंपनीतील भंगाराचा वाद उफाळून आला आहे. यावरून रविवारी (दि. 2) रोहा तालुक्यातील सुतारवाडीत हाणामारी होऊन अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोस्को कंपनीतून निघणारे भंगार कोण घेणार यावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद सुरू …
Read More »कार अपघातात तरुणाचा मृत्यू
महाड ः प्रतिनिधी महाड-रायगड महामार्गावर रविवारी (दि. 2) तेटघर गावच्या हद्दीत भरधाव वेगाने कार चालवत असताना ती पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज राजेंद्र शिंदे (30, रा. कांबळे तर्फे बिरवाडी) हा तरुण त्याच्या ताब्यातील कारने (एमएच 06 बीयू 6048) नातेगावाहून महाडच्या दिशेने …
Read More »लॉकडाऊन काळात खवय्यांची सुक्या मासळीला पसंती
पाली ः प्रतिनिधी राज्यात सर्वत्र लॉकडाऊन लागू झाला आहे. त्यामुळे मासळीची कमी आवक, मासळीचा दुष्काळ त्याबरोबरच भाववाढीमुळे मासळी खवय्यांचा हिरमोड झाला आहे. परिणामी खवय्ये सुक्या मासळीला पसंती देताना दिसत आहेत. सुक्या मासळीचे भावदेखील स्थिर असल्याने खवय्ये आनंदात आहेत. ओली मासळी तुलनेने प्रचंड महाग झाल्याने खवय्यांना सुक्या मासळीवरच समाधान मानावे लागत …
Read More »माथेरानमध्ये माल वाहतुकीसाठी जखमी घोड्यांचा वापर; संबंधितांविरोधात कारवाईची मागणी
कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या संकटकाळात अनेक ठिकाणी माणुसकीची जिवंत उदाहरणे पाहायला मिळाली. मदतीसाठी अनेक हात सरसावताना दिसले, मात्र माथेरानमध्ये जखमी व आजारी घोड्यांनादेखील माल वाहतूक करण्यासाठी जुंपले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथे माणुसकीदेखील ओशाळली आहे. दरम्यान, प्रशासनाने मुक्या प्राण्यांवर असे अमानुष अत्याचार करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी …
Read More »पारले येथे कंटेनरला आग
पोलादपूर ः प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वर रविवारी (दि. 2) सकाळी वीकेण्ड लॉकडाऊनमुळे तुरळक वाहतूक सुरू असताना पारले मराठी शाळेजवळील उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडजवळ एका कंटेनरला अचानक आग लागली. आग लागल्यानंतर कंटेनर भर रस्त्यावर उभा करून चालकाने पलायन केले होते, मात्र आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असताना पोलादपूर पोलिसांना कंटेनरचालकालाही …
Read More »उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण बंद
कर्जत ः प्रतिनिधी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आल्यानंतर तेथे लसीकरणासाठी नागरिकांची दररोजच गर्दी होत होती. हे उपजिल्हा रुग्णालय शहराच्या मधोमध असल्याने ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांसाठी सोयीचे होते, मात्र तेथील लसीकरण केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कर्जत शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय होणार असून लसीकरणासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातील …
Read More »पाच गुंठ्यांत भेंडीचे भरघोस उत्पादन
उद्धरच्या शेतकर्याची किमया पाली ः प्रतिनिधी कोरोनाचे भयावह संकट आणि त्यायोगे वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी उद्यमशील तरुणांनी आपली पावले कृषी क्षेत्राकडे वळवली आहेत. सुधागड तालुक्यातील उद्धर येथील तरुण प्रयोगशील शेतकरी तुषार केळकर याने सेंद्रिय आणि रासायनिक पद्धतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. अवघ्या पाच गुंठ्यांतून तो भेंडीचे बंपर उत्पादन मिळवत आहे. …
Read More »आदिवासी महिलांवर बलात्कार करणार्यास जन्मठेप
माणगाव सत्र न्यायालयाचा निकाल म्हसळा : प्रतिनिधी आंब्याच्या बागेमध्ये राखणदारीचे काम करणार्या दोन आदिवासी महिलांवर बलात्कार करणार्या मुन्ना पठाण याला माणगाव येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी युनूस उर्फ मुन्ना अब्दुल अजीज पठाण (रा. पाभरे) याच्या आंब्याच्या बागेमध्ये पीडित फिर्यादी व तिची बहीण या आदिवासी समाजाच्या महिला राखणदारीच्या …
Read More »कर्जत रेल्वेस्थानकातील शेडचे काम पूर्ण
ऊन-पावसापासून प्रवाशांचा बचाव कर्जत ः प्रतिनिधी कर्जत रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक एकवरील कल्याण दिशेकडील सुरू असलेले शेडचे काम अखेर पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी पाठपुरावा करणार्या पंकज ओसवाल यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि कर्जतकर प्रवाशांची उन्हाळा व पावसाळ्यातील त्रासातून सुटका झाली आहे. कर्जत रेल्वेस्थानकावर शेडचे काम कित्येक दिवसांपासून सुरू होते. …
Read More »श्रीवर्धन बाजारपेठेत जत्रेसारखी गर्दी
सामाजिक अंतराच्या नियमाची होते पायमल्ली श्रीवर्धन ः प्रतिनिधी राज्य शासनाने संपूर्ण राज्यभर कडक निर्बंध लावून लॉकडाउन जाहीर केला आहे. फक्त सकाळी 7 ते 11 या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किराणा, भाजी, चिकन, मटण, मच्छी इत्यादी दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. दिवसभर फक्त औषधांची दुकाने, रुग्णालये व दवाखाने इत्यादी …
Read More »