Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पेणमध्ये नगर परिषदेची धडक कारवाई

नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुकानदारांना दणका पेण ः प्रतिनिधी येथील नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने धडक कारवाई करीत शहरातील 11नंतर उघड्या असणार्‍या दुकानदारांवर 10 हजार रुपये दंड व कोविड काळ संपेपर्यंत दुकान सील अशी कारवाई केली, तसेच दुकानात आढळलेल्या ग्राहकांकडूनही 500 रुपयेप्रमाणे दंडवसुली करण्यात आली आहे. कोरोनाच्या महामारीने जगावर संकट आले …

Read More »

‘रेमडेसिवीर’चे रायगडात दुष्परिणाम

एचसीएल 21013 बॅचचा वापर थांबवण्याचे आदेश अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोरोना रुग्णांवर दुष्परिणाम (साइड इफेक्ट) होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून वितरीत करण्यात आलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या एचसीएल 21013 वापर तत्काळ थांबविण्याचे आदेश अन्न औषध प्रशासनाने जारी केले आहेत.राज्यात कोरोना परिस्थिती बिकट असताना …

Read More »

रोह्यातील रोठ बुद्रुक गावात जंतुनाशक फवारणी

‘क्लॅरिअंट’ची सामाजिक बांधिलकी रोहे : प्रतिनिधी कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील क्लॅरिअंट केमिकल्स इंडिया लिमिटेड या उद्योगसमूहाच्या वतीने परिसरात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून क्लॅरिअंटकडून कारखान्यालगतच्या रोठ बुद्रुक गावाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. रोठ बुद्रुक गावामध्ये काही कोरोना बाधित आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सरपंच नितीन वारंगे …

Read More »

सुधागडात कोरोनाविषयी जनजागृती

प्रभातफेरी व रंजक गाण्यांतून प्रबोधन पाली ़: प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात कोरोनाने शिरकाव केला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेच, शिवाय रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत आहेत. तालुक्यातील अडुळसे गाव आणि परिसरातील सात वाड्यांवर गुरुवारी (दि. 29) कोरोना विषयक जनजागृती …

Read More »

मानवतेचे निशाण मिरवू महाराष्ट्र दिनी!

महाराष्ट्राच्या वर्धापन दिनाला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्याने या काळात अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या मागणीसाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले. तेव्हा कुठे 1 मे 1960 रोजी मराठी भाषिकांचे राज्य देशाच्या नकाशावर अस्तित्वात आले. हुतात्म्यांचे बलिदान विसरून महाराष्ट्र दिन चिरायू होऊ शकत नाही हे जरी खरे …

Read More »

कर्जत रेल्वे स्थानकातील फलाटाची उंची वाढविणार; प्रवाशांना दिलासा

कर्जत : प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि लोकल किंवा लांबपल्ल्याची गाडी यांच्यामधील अंतर जास्त असल्याने गाडी पकडताना एखाद्या प्रवाशाचा अपघात होऊ शकतो. याबाबत पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर फलाट क्रमांक तीनची उंची लवकरच वाढविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. कर्जत रेल्वे स्थानकात एकूण चार …

Read More »

रोहा बाजारपेठेत नागरिकांची गर्दी, काही दुकानेही उघडी

रोहे ः प्रतिनिधी कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र रोहा शहरात गुरूवारी (दि. 29) अत्यावश्यक सेवेच्या निमित्ताने नागरिकांची खरेदीसाठी गर्दी उसळली होती. महत्वाचे म्हणजे कडक निर्बंध लागू असतानाही अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त रोह्यातील अन्य काही दुकाने गुरूवारी दिवसभर उघडी ठेवून व्यापारी व्यवसाय करताना दिसले.देशात, राज्यात कोरोनाचे रूग्ण …

Read More »

लसीकरणासाठी नागरिकांची दमछाक; सुधागडात मध्यरात्रीपासून प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर गर्दी

पाली : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लसीकरण मोहीम राबविली जात आहे, मात्र नियोजना अभावी सुधागड तालुक्यात लस मिळविता मिळविता नागरिकांची पुरती दमछाक होत असल्याने रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याचे संतापाने बोलले जात आहे. सुधागड तालुक्यात पाली व जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केले जात आहे. पहिल्या आलेल्या 80 लोकांना टोकन …

Read More »

सीएफआयतर्फे विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य

पेण : प्रतिनिधी चिल्ड्रन्स फ्यूचर इंडिया (सीएफआय) तर्फे प्रकल्प प्रमुख डॉ. किशोर देशमुख यांच्या पुढाकाराने प्रतिपालीत 89 विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी चालू शैक्षणिक वर्षात सहा लाख 65 हजार रुपयांचे अर्थसहाय्य वाटप करण्यात आले. सीएफआय ही संस्था मुलांना उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त करत आहे. संस्थेने आतापर्यंत आठ हजाराहून अधिक प्रतिपालीत विद्यार्थ्यांना मदत केली …

Read More »

लॉकडाऊनमुळे श्रीवर्धनमधील बुरूड व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर

श्रीवर्धन : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या संकटामुळे अनेक व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावरती असल्याचे पाहायला मिळत आहे. सतत होत असलेल्या लॉकडाऊनमुळे श्रीवर्धन तालुक्यातील बुरूड व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. बुरुड समाजाने वीणलेल्या टोपल्या, परड्या, रोवळ्या, सुपे, कोंबड्यांचे खुराडे, भाताचे कणगे याला मोठी मागणी असते. रोवळीचा उपयोग प्रामुख्याने लग्न समारंभामध्ये तांदूळ धुण्यासाठी केला …

Read More »