Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

खालापूर पोलीस ठाण्याने घेतली पाच गावे दत्तक

खालापूर : प्रतिनिधी कोरोनाकाळात विशेष दक्षता घेण्यासाठी खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल विभूते यांनी पाच गावे दत्तक घेऊन नवा उपक्रम सुरू केला असून, त्याचा शुभारंभ बुधवारी (दि. 28) माडप गावापासून करण्यात आला. कोरोनाला अटकाव करण्याच्या हेतुने खालापूर पोलीस ठाण्याने तालुक्यातील माडप, नारंगी, भिलवले,   शिरवलीवाडी आणि केळवली ही गावे दत्तक घेतली …

Read More »

पेण येथे 800 खाटांचे कोविड सेंटर

आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रयत्नांना यश; चार रुग्णवाहिकाही देणार पेण : प्रतिनिधी कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन   आमदार रविशेठ पाटील यांनी पेण तालुक्यासाठी मोठे कोविड सेंटर उभारण्याकरिता चाचपणी केली होती. त्याला यश आले असून जेएसडब्ल्यू कंपनीच्या ट्रामा सेंटरमध्ये 800 खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात  येणार असून चार रुग्णवाहिकाही देणार …

Read More »

कर्जत जलशुद्धिकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामांचा शुभारंभ

कर्जत : प्रतिनिधी कर्जत नगर परिषद पाणीपुरवठा योजनेतील जलशुद्धिकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ कोरोना विषयक नियमांचे पालन करून ठराविक लोकांच्या उपस्थित करण्यात आला. कर्जत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेतील जलशुद्धिकरण केंद्राला सुमारे 18-20 वर्षांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे या केंद्रात दुरुस्ती व सुधारात्मक कामे करणे गरजेचे होते. त्यापैकी इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल …

Read More »

लॉकडाऊन काळात जपली जातेय वाळवण संस्कृती लॉकडाऊन काळात जपली जातेय वाळवण संस्कृती

पाली : प्रतिनिधी कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र कडकडीत उन्हात सुधागड तालुक्यात वाळवण संस्कृती मोठ्या प्रमाणावर टिकवली जात आहे. सध्या बहुतांश घरात पापड, कुरडया, चिकोड्या, शेवया, फेण्या, सांडगे यासारख्या वाळवणाच्या पदार्थांसह लोणची व मसाले तयार केले जातांना दिसत आहे, मात्र त्यासाठी मात्र शेजारी व …

Read More »

आरआयए लसीकरण केंद्राचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनाही द्यावा

भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग यांची मागणी धाटाव : प्रतिनिधी येथील एमआयडीसीमधील रोहा इंडस्ट्रीयल असोसिएशन (आरआयए) सभागृहात कामगारांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. तेथे पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरिकांनाही लसीकरणाचा लाभ मिळावा, अशी मागणी भाजप युवामोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांनी केली आहे. रोहे शहरात लस घेण्यासाठी होणारी …

Read More »

बीड खुर्दमधील महिलांची पाण्यासाठी वणवण; सरपंचांना घातले साकडे

खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील बीडखुर्द गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी (दि. 27) ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन, आमचा पाण्यासाठीचा वनवास कधी संपणार?, अशी विचारणा केली. या वेळी आजपासून गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती सरपंच कविता पाटील यांनी दिली. …

Read More »

कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर पोलिसांचा बडगा; 25 दिवसांत 20 हजार जणांवर कारवाई, 50 लाखांची दंडवसुली

अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलिसांनी आताकारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली. गेल्या 25 दिवसात करोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्‍या 20 हजार जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या बेजबाबदार नागरिकांकडून तब्बल 50 लाख रुपयांचा दंडही वसूल केला आहे.रायगड जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. करोनाबाधितांची संख्या एक लाखांवर पोहोचली आहे. …

Read More »

सुधागडातील रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; आमदार रविशेठ पाटील यांच्या पाठपुराव्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा प्रतिसाद

पाली, पेण : प्रतिनिधी आमदार रविशेठ पाटील यांच्या पाठपुराव्याने केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून पेण विधानसभा मतदार संघातील रस्त्यासाठी भरीव निधी उपलब्ध झाला आहे. पेण तालुक्यातील वाशी-वढाव-काळेश्री रस्त्याकरिता 4.86 कोटी व सुधागड तालुक्यातील उद्धर-कुंभारघर-महागाव-चंदरगाव-हातोंड-गोंदाव रस्त्यासाठी 6.76 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार रविशेठ पाटील यांनी नुकताच नवी …

Read More »

कोरोना संकटात पाणीटंचाईच्या झळा

रायगडात 157 गावे, वाड्यांना टँकरने जलपुरवठा अलिबाग ः प्रतिनिधीकोरोना संकटात रायगड जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील 157 गावे आणि वाड्यांमधील 16 हजार 855 नागरिकांना 27 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.रायगड जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल, मे महिन्यामध्ये पाणीटंचाई निर्माण होत असते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने नियोजन …

Read More »

गटार स्वच्छतेबाबत पोशीर ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ

कर्जत : बातमीदार तालुक्यातील पोशीर गावामधील प्रकाश भाऊ राणे यांच्या घरासमोरील सार्वजनिक गटाराची गेल्या अनेक महिन्यांपासून साफसफाई करण्यात आलेली नाही. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नेरळ-कळंब रस्त्यालगत पोशीर गावात प्रकाश भाऊ राणे यांचे घर आहे. या घराला लागून सार्वजनिक गटार आहे. मात्र या गटारांची स्वच्छता …

Read More »