अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात होळीचा सण पारंपारीक आणि साध्या पदधतीने साजरा करण्यात आला. रविवारी होळीचे दहन केल्यानंतर सोमवारी सर्वत्र धुळवड साजरी करण्यात आली. या दोन्ही उत्सवांवर कोरोनाचे सावट पहायला मिळाले. कोरोनाच्या संकटाने पुन्हा डोके वर काढल्याने होळीबरोबरच धुळवडीच्या रंगाचा बेरंग झाला. रविवारी जिल्ह्यात प्रत्येक गावच्या प्रथेप्रमाणे होळी साजरी करण्यात …
Read More »आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन
आमदार प्रवीण दरेकर यांची उपस्थिती पोलादपूर ः प्रतिनिधीकेंद्रात व राज्यात भाजपच सत्तेचा खरा दावेदार असून, खेडोपाडी दुर्गम भागांमध्येही विकासाची मानसिकता असलेला हा एकमेव पक्ष आहे, असे प्रतिपादन भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी (दि. 29) येथे केले. पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बुद्रुक येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.पोलादपूर …
Read More »सुधागडात होळीतील हजारो पोळ्या आदिवासींच्या मुखी
पाली ः प्रतिनिधीसण-उत्सव साजरे करताना सेवाभाव व सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश ‘अंनिस’ने आपल्या कृतीतून दिला आहे. सुधागडात होळीत जाणार्या शेकडो पोळ्या आदिवासी गोरगरिबांच्या मुखी घालण्याचे काम या ठिकाणी करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही ’होळी करू लहान, पोळी करू दान’ असे आवाहन एक संघर्ष समाजसेवेसाठी व महाराष्ट्र अंनिसने केले होते. त्यानुसार पालीतील …
Read More »राष्ट्रीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंची सुवर्ण कामगिरी
पाली ः प्रतिनिधीइंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनतर्फे इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम, पोलो ग्राऊंड, श्रीनगर काश्मीर येथे पार पडलेल्या सीनियर राष्ट्रीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी रेगू इव्हेंटमध्ये चमकदार कामगिरी केली. पालीतील अनुज सरनाईक तसेच विशाल मोरे, ओमकार अभंग यांनी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तसेच स्टँडिंग (फाइट) या इव्हेंटमध्ये अंशुल कांबळे व …
Read More »सुधागडातील हातोंड पंचक्रोषीत भीषण वणवा; लाखोंचे नुकसान, वृक्षसंपदा जळून भस्मसात
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात हातोंड पंचक्रोशीत अग्नीप्रलय झाला असून 48 तासांहूनही अधिक काळ अग्नी तांडव सुरूच होता. दोन दिवस सुरू असलेला हा अग्नी तांडव शनिवार (दि. 27) पर्यंत सुरूच होता. या अग्नी प्रलयात सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नसली तरी हजारो झाडे जळून खाक झाली आहेत. नलावडे फार्ममधील 20 …
Read More »उल्हास नदीतून पाणीउपसा; नायब तहसीलदारांकडून पाहणी
कर्जत ः बातमीदार नेरळजवळील दहिवली ग्रामपंचायत तर्फे वरेडी येथे लबधी गार्डन्स लिमिटेड या बांधकाम व्यावसायिकाकडून उल्हास नदीलगत गृहसंकुल प्रकल्प उभारले आहे. या गृहप्रकल्पासाठी शेजारून वाहणार्या उल्हास नदीच्या पात्रात वीज पंप लावून पाणी घेतले आहे. दरम्यान, कर्जतचे निवासी नायब तहसीलदार यांच्याकडून त्या जागेची स्थळ पाहणी करण्यात आली. दहिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत लब्धी …
Read More »समाज घडविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र या -आ. रविशेठ पाटील
पेण : प्रतिनिधी रस्ता व पाण्याच्या प्रश्नांसाठी राजकारण नको, समाज घडविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून एकसंगी व्हा, असे आवाहन माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी शिर्की येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले. आमदार रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून बोरी बायपास हायवे ते बोरी-शिकी, शिर्की-मसद ते शिर्की चाळ …
Read More »रंग, पिचकार्या व्यावसायिकांचा बेरंग; कोरोनाच्या संकटामुळे विक्री घटली
पाली ः प्रतिनिधी कोरोनाचे संकट अजूनही घोंगावत असून, नव्या वर्षात तरकोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे हंगामी व्यवसाय करणार्या व्यावसायिकांचे पुन्हा एकदा कंबरडे मोडले आहे. यंदा होळी व धूलिवंदनवर कोरोनाचे सावट आहे. परिणामी रंग, पिचकारी आदी विकणार्या व्यावसायिकांचा बेरंग झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेकांनी रंग व पिचकार्या खरेदीसाठी …
Read More »रवींद्रनाथ ओव्हाळ यांचे उपोषण स्थगित
परिवहन मंडळाकडून लेखी आश्वासन पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र व तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीतील बसस्थानकाच्या नूतनीकरणासह इतर मागण्यांसाठी रिपाइं रायगड जिल्हा सचिव रवींद्रनाथ ओव्हाळ पाली बसस्थानकात सोमवारी (दि. 22) दुपारपासून आमरण उपोषणास बसले होते. याची दखल घेत परिवहन मंडळाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शुक्रवारी (दि. 26) दुपारी पाचव्या दिवशी …
Read More »प्रवाशांच्या सोयीसाठी वाशी बसच्या वेळेत बदल
भाजपच्या पाठपुराव्याला यश खोपोली ः प्रतिनिधी नवी मुंबईत विद्यार्थी महाविद्यालयात तसेच कामानिमित्त नोकरदार प्रवाशांना दररोज सकाळी नवी मुंबई महापालिकेची पहिली बस 7.20 वाजता असल्यामुळे पुढे पोहचण्यास विलंब होतो. त्यामुळे सकाळी 6 वाजता पहिली बस सुरू करण्याचे निवेदनपत्र खोपोली भाजपने आमदार गणेश नाईक, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप युवा मोर्चा …
Read More »