ग्रामस्थांचे महावितरणला निवेदन पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील कानसळ गावातील जनतेला विजेसंबंधीच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावाची वाढती लोकसंख्या तसेच विजेचा वापर व उपलब्ध सामुग्रीची सांगड बसत नसल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्या अनुषंगाने कानसळ गावातील विद्युत समस्या सोडवाव्यात. मुबलक वीजपुरवठ्यासाठी थ्री फेज लाइन व डीपीची …
Read More »पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे धरण
पोलादपूर तालुक्यातील एकमेव यशस्वी धरण रानबाजिरे येथे पोलादपूर ते महाबळेश्वर महामार्गावर दिसून येते. मात्र, हे धरण पोलादपूरचे तर पाणी महाड एमआयडीसीचेच आहे, अशी परिस्थिती आजही कायम आहे. तत्कालीन लोकप्रतिनिधींमध्ये ’आधी पाणी तालुक्याचे मगच एमआयडीसीचे’ अशी आग्रही भूमिका नव्हती. त्यामुळे व्यावसायिकतेसाठी बांधलेले हे धरण पोलादपूरचे पाणी महाड एमआयडीसी वसाहतीमधील कारखान्यांना पाणी …
Read More »पेणमध्ये वसुली सरकारविरोधात भाजपचे आंदोलन
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी पेण ः प्रतिनिधी वसुली सरकारचा निषेध असो, आघाडी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत पेणमध्ये भाजपतर्फे राज्य सरकारविरोधात पेण न. प.समोरील कोतवाल चौकात निदर्शने करण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडू, गटनेते अनिरुद्ध पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, कामगार आघाडीचे …
Read More »माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे मास्कचे वाटप
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे सामाजिक बांधिलकी जपत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्या अनुषंगाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता शहरात जुने स्टँड येथे रविवारी (दि. 21) सायंकाळी माजी नगराध्यक्ष योगिता चव्हाण, राजिपचे माजी सभापती ज्ञानदेव पवार, यशस्वी उद्योजक विजयशेठ मेथा यांच्या हस्ते 500 मास्कचे वाटप करण्यात आले. …
Read More »सराईत वाहनचोर जेरबंद : कर्जत गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई
कर्जत ः प्रतिनिधी, बातमीदार कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथून मोटरसायकल, रिक्षा चोरणार्या चोरास कर्जत पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जेरबंद केले आहे. त्याने तीन लाख 70 हजार रुपयांची पाच वाहने चोरली होती. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत वाढत्या चोर्यांना प्रतिबंध करण्याकरिता रविवारी (दि. 21) कर्जत पोलीस ठाणे गुन्हे प्रगटीकरण पथक कर्जत शहरात …
Read More »योग्य प्रसिद्धी आणि नियोजनाअभावी फणसाड अभयारण्याकडे पर्यटकांची पाठ
मुरूड ः प्रतिनिधी रायगडातील कोकण किनारपट्टीवर हिरव्यागार झाडांच्या कुशीत वसलेले एक घनदाट जंगल अर्थात फणसाड अभयारण्य होय. मुंबईपासून 160 किमी अंतरावर पनवेल, पेण व अलिबाग मार्गावरील विस्तीर्ण असे फणसाड अभयारण्य म्हणजे निसर्गाचे एक वरदानच आहे, मात्र फणसाड अभयारण्याची योग्य ती प्रसिद्धी न केल्याने महसुलात प्रचंड घट झाली. तसेच सुविधांचा अभाव …
Read More »गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी म्हसळ्यात भाजपकडून निवेदन
म्हसळा : प्रतिनिधी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केल्या गंभीर आरोपांवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशा आशयाचे पत्र म्हसळा भाजपच्या वतीने पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेखी पत्राद्वारे दरमहा रुपये 100 कोटी वसूल करून देण्याबाबतचे आरोप केले …
Read More »पाणीबचतीचे महत्त्व घरोघरी पोहचवावे -डॉ. किरण पाटील
अलिबाग ः प्रतिनिधी पाणी बचतीचे महत्त्व घरोघरी पोहचविण्यासाठी गावागावांत विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सोमवारी (दि. 22) जलदिनानिमित्त आयाजित कार्यक्रमात केले. रायगड जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातर्फे सोमवारी जिल्हा परिषदेच्या सुरबा नाना टिपणीस सभागृहात डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीत …
Read More »पारदर्शक चौकशीसाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आमदार रविशेठ पाटील यांची मागणी
पेण ः प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटींची वसुली करण्याची मागणी केल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने राज्याच्या गृहमंत्र्यांवर असे आरोप केल्याने राज्याची प्रतिमा मलीन झाली आहे. या आरोपाची पारदर्शकपणे चौकशी होण्याकरिता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, …
Read More »पाताळगंगा नदीपुलावरील वाहतूक पर्यायी मार्गाने मार्गस्थ करण्याचे आदेश
अलिबाग ः जिमाका जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील खालापूर पथकर स्थानकाजवळील पेण ते खालापूर राज्य मार्ग क्र. 108 (खालापूर कनेक्टर)वरील पाताळगंगा नदीवरील अस्तित्वातील पुलावरील वाहतूक 22 मार्च ते 7 मे या कालावधीदरम्यान पर्यायी मार्गाने मार्गस्थ करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत. पेण ते खालापूर ते राष्ट्रीय महामार्ग क्र. …
Read More »