Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जत पाली वसाहतीमध्ये महिलेवर जीवघेणा हल्ला

कर्जत : बातमीदार तालुक्यातील पाली वसाहतीमधील घरात घुसून एका तरुणाने विवाहितेवर चाकूच्या सहाय्याने सहा वार केले. आरोपी डोंबिवली येथील असून नेरळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिकसळ (ता. कर्जत) गावाच्या पाठिमागे पाली वसाहत असून, तेथील समृद्धीहिल या गृहसंकुलातील बिल्डींग नंबर आठमध्ये लिला विनोद जैयस्वाल (वय 27) …

Read More »

पोलादपूर नगरपंचायत निवडणूक लांबणीवर

पोलादपूर : प्रतिनिधी कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक अनिश्चित काळासाठी लांबणीवर जाण्याची चिन्हे दिसून आल्याने इच्छुकांची बाशिंगं गुडघ्यावरून खाली उतरली आहेत. पोलादपूर नगरपंचायतीच्या पहिल्या बॉडीचा कार्यकाळ संपल्याने तेथे नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकाची मुदत संपुष्टात येऊन पुढील प्रशासकीय कार्यकाळ सुरू झाला आहे. दरम्यान, दुसर्‍या पंचवार्षिक  निवडणुकीसाठी  मतदारांची अंतिम यादी …

Read More »

किसान क्रेडीट कार्ड योजनेत रायगड अव्वल

अलिबाग ः प्रतिनिधी सावकारी जाचातून मच्छीमारांची मुक्तता व्हावी आणि बँकेशी नाते जडावे यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेत रायगड जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या योजनेला रायगडातील मच्छीमारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार 1002 मच्छीमारांना चार कोटी 38 लाख रुपयांची कर्ज वितरित करण्यात आली आहेत. किसान क्रेडीट कार्ड …

Read More »

नागोठण्यात महाशिवरात्रीवर कोरोनाचे सावट

नागोठणे : प्रतिनिधी येथील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या अखत्यारीतील रामेश्वर मंदिरात गुरुवारी (दि. 11) महाशिवरात्रीचा उत्सव कोरोनाचे नियम पाळून भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. गुरुवारी पहाटे गणेशमहाराज सहस्रबुद्धे यांच्या पौरोहित्याखाली समाजाचे हर्षल दुर्वे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन करण्यात आले. कोरोनाच्या संभाव्य संकटामुळे मंदिराचा गाभारा भाविकांसाठी दिवसभर बंद ठेवण्यात आल्यामुळे भाविकांना …

Read More »

राज्यस्तरीय संमेलनात फणसाड अभयारण्याची चमकदार कामगिरी

वनमजूर प्रदीप बागवे यांचा विशेष सत्कार मुरुड : प्रतिनिधी वनविभागाच्या शहापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय वन्यजीव संमेलनात येथील वनमजूर प्रदीप बागवे यांनी फणसाड अभयारण्यातील जैवविविधता, वन्यजीव संपदा व पर्यटन विकासावर उत्कृष्ठ माहिती सादर केली. त्याची दखल घेवून या राज्यस्तरीय संमेलनात प्रदीप बागवे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. वनविभागाच्या शहापूर येथील वनप्रशिक्षण …

Read More »

बिर्ला कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप

चौक : रामप्रहर वृत्त           पाताळगंगा औद्योगीक वसाहतीमधील बिर्ला कार्बन इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या वतीने चौक (ता. खालपूर) येथील सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिर आणि सारंग येथील विद्या मंदिर या शाळांमधील विद्यार्थ्यांना नुकताच सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. चौक येथील विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख यांच्या …

Read More »

सुधागड तालुक्यातील खेमवाडीत वणवा

जैवविविधतेसह वृक्षसंपदा जळून खाक पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील खेमवाडी परिसरात लागलेल्या वणव्यात पेंढा, शेतातील राब जळून खाक झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले, शिवाय वृक्षसंपदेला या वनव्याचा मोठा फटका बसला आहे. आदिवासी बांधव व कार्यकर्त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून हा वणवा नियंत्रणात आणला. सुधागड तालुक्यातील जंगलभाग, माळरान, डोंगर पठारावर वणवे लागण्याचे …

Read More »

कर्जतमध्ये ट्रक उलटला

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार चौक- मुरबाड रस्त्यावरील चारफाट्यानजिकच्या  रेल्वे पुलाच्या चढणीवर एक लोखंडी सळया भरलेला ट्रक पलटी झाला आणि अडकला. अन्यथा खाली राहणार्‍या घरातील रहिवाश्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता. या अपघातात ट्रकची पुढची काच फुटल्याने चालक सुरक्षितपणे बाहेर आला. ही घटना रात्री दीडच्या सुमारास घडली. लोखंडी सळ्या भरलेला ट्रक …

Read More »

कर्जतमध्ये नवीन नऊ पॉझिटिव्ह

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यात कोरोनाचा जोर कमी-जास्त होत आहे.  गुरूवारी (दि. 11) नवीन नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर बुधवारी दोन कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यामुळे दोन दिवसात 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यात चिंताजनक वातावरण झाले आहे. कर्जत तालुक्यात आजपर्यंत 1949 कोरोना रुग्ण सापडले असून त्यापैकी 1829 जणांनी …

Read More »

महिलांना हीन वागणूक देणार्या हरियाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांचा खोपोलीत भाजपतर्फे निषेध

अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन खोपोली : प्रतिनिधी जागतिक महिला दिनी महिला आमदारांना वेठबिगार्‍यासारखी वागणूक देणारे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाकडून उत्तर रायगड अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 12) खोपोलीत आंदोलन करण्यात आले. भाजप महिला मोर्चाच्या खोपोली शहर अध्यक्ष शोभा काटे, …

Read More »