Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगडात महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा

केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा -अश्विनी पाटील खोपोलीत खरेदीसाठी आलेल्या महिलांचे भाजपतर्फे स्वागत खोपोली : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून  खोपोलीतील दीपक चौकात सोमवारी खरेदीला आलेल्या महिलांचे भाजप महिला मोर्चातर्फे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यामुळे खरेदीला आलेल्या महिलांनाही आश्चर्याचा धक्का बसला व त्यांनी भाजप महिला मोर्चाचे आभार मानले. …

Read More »

रोहा येथे विविध सामाजिक उपक्रम

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरंपच नितीन वारांगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रोठ बुद्रुक गावामध्ये वृक्षारोपण व मास्कवाटप करण्यात आले. तसेच तळाघर हायस्कूल येथील गरीब व गरजुंना विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमास सरंपच नितीन वारांगे, दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तथा …

Read More »

चार हजार रोपांची लागवड करण्याचा उपक्रम

खोपोली : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे असलेल्या टाटा स्टील बीएसएल प्लांटने टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांच्या 182 व्या जयंती वर्षानिमित्त समाजोपयोगी उपक्रम आयोजित करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. भारतात उद्योजकतेचा पाया ज्यांनी रचला असे महान, द्रष्टे उद्योगपती जमशेदजी नसरवानजी टाटा यांना खोपोलीच्या टाटा स्टील बीएसएलचे एक्झिक्युटिव्ह …

Read More »

खालापुरात भाजपची आढावा बैठक

  आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; गरपंचायत निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी खोपोली : प्रतिनिधी नगरपंचायत खालापूर निवडणूकिसाठी भारतीय जनता पक्ष खालापूरची आढावा बैठक शनिवारी (दि. 6) झाली. या बैठकीला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. खालापूर नगरपंचायतीचा पाच वर्षांचा कालावधी 24 जानेवारीला पूर्ण झाला आहे, परंतु …

Read More »

माणगावच्या शालेय मंत्रिमंडळाची स्पर्धेत दखल

ऑनलाइन निवडणूक उपक्रमाचा ‘डायट‘कडून गौरव माणगाव : प्रतिनिधी पनवेल येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेने शिक्षकांसाठी घेतलेल्या यशोगाथा या शैक्षणिक उपक्रमात भाले (ता. माणगाव) येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक  संतोष बापट यांनी सादर केलेल्या ’इव्हीएम मशीनद्वारे शालेय मंत्रिमंडळ ऑनलाइन इलेक्शन’ या उपक्रमाचे विशेष कौतुक झाले. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेने (डायट) मागील दोन …

Read More »

मुरूड नांदगाव येथे भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर

अलिबाग : प्रतिनिधी ऐरोली नवी मुंबई येथील जय हिंद अकादमी या संस्थेने नांदगाव (ता. मुरूड) येथील लक्ष्मी फॉरेस्ट कॅम्पिंग येथे घेतलेल्या तीन दिवसांच्या भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरात 15 पुरुष आणि तीन महिला सहभागी झाल्या होत्या. मुरुड येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रसाद चौलकर यांनी आयोजित केलेल्या या शिबिरात एन. एस. जी ब्लॅककॅट कमांडो …

Read More »

देवपाडा-वंजारपाडा रस्त्याची दुरवस्था

कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेरळ देवपाडा – वंजारपाडा रस्त्याची पुरती वाट लागली आहे. हा रस्ता खड्ड्यात हरवला आहे. पुढे चिंचवाडी हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झाल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. नेरळ -वंजारपाडा मार्गे देवपाडा, चिंचवाडी या गावांना जोडणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुमारे 10 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याकडे …

Read More »

चौक गावानजीक पोल्ट्रीचा कचरा उघड्यावर

खोपोली : प्रतिनिधी कोरोना आणि बर्ड फ्लू संसर्गाच्या भीतीने नागरिक आधीच त्रस्त आहेत. मात्र चौक (ता. खालापूर) गावाच्या हद्दीत पोल्ट्रीचा  शिल्लक कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात प्रंचड दुर्गंधी पसरली असून, रोगराईची शक्यता वाढली आहे. मुंबई – पुणे महामार्गावर खालापूर तालुक्यातील चौक गाव वसलेल आहे. मोठी बाजारपेठ म्हणून चौक गाव विकसित …

Read More »

कर्जत खांडस येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

नेरळ पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार तालुक्यातील खांडस गावातील एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड आणि नंतर लैगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, विधी संघर्षग्रस्त 16 वर्षीय बालक फरार आहे. खांडस गावातील अल्पवयीन मुलीची आई …

Read More »

सेंद्रिय पद्धतीने हळदीचे बंपर पीक

सुधागड तालुक्यातील तरुण शेतकर्‍याची किमया पाली ः प्रतिनिधीमनात जिद्द, कष्ट उपसण्याची तयारी व धमक असेल, तर परिस्थिती कोणतीही असो त्यावर मात करून स्वतःला सिद्ध करता येते हे सुधागड तालुक्यातील दिनेश बुरुमकर ह्या होतकरू तरुणाने दाखवून दिले आहे. पिंपळोली येथील प्रयोगशील तरुण शेतकरी दिनेश यांनी अथक मेहनतीच्या जोरावर हळदीच्या पिकाची सेंद्रिय …

Read More »