कर्जत : बातमीदार मुक्या प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बेकरेवाडीमधील आदिवासी ग्रामस्थांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला आहे, त्यात साचून राहिलेल्या पाण्यामुळे ग्रामस्थ आनंदले आहेत. कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगर रांगेत बेकरेवाडी ही आदिवासीवाडी असून, वन विभागाच्या दळी भूखंडावर वसलेल्या या आदिवासी वाडीमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते आणि त्याचा फटका माणसापासून …
Read More »कशेडी घाटात व्हॅन दरीत कोसळली; चौघे प्रवासी सुदैवाने बचावले
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील धामणदिवी गावाच्या हद्दीतील एका तीव्र वळणावर चालाकाचा ताबा सुटल्याने ओमनी व्हॅन 100 फूट खोल दरीमध्ये कोसळली. सुदैवाने व्हॅनमधील चारही प्रवासी बचावले आहेत. चालक गणेश पर्वती गाडे (वय 35) हा त्याच्या ताब्यातील ओमनी व्हॅन (एमएच-12,क्यूएफ-9338) घेऊन शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी खेड येथून …
Read More »खंडाळा घाटात दोन अपघात
चार गंभीर तर आठजण किरकोळ जखमी खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी (दि. 19) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चारजण गंभीर जखमी तर आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. एक्सप्रेस वेवरून चाललेल्या ट्रकला पाठिमागून आलेल्या कारने शनिवारी सकाळी सात वाजता धडक दिली. या अपघातात कारमधील तिघेजण जखमी झाले असून त्यातील …
Read More »नुकसानभरपाई न मिळाल्याने रोह्यातील अनेक शाळा अडचणीत
धाटाव : प्रतिनिधी निसर्ग चक्रिवादळाच्या तडाख्याने झालेल्या पडझडीची डागडूजी न झाल्याने रोहा तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळांना सध्या अडचणीचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे. निसर्ग चक्रिवादळात रोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 198प्राथमिक शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळात काही शाळांच्या छपरावरील पत्रे उडून गेले, तर काही शाळांचे दारे, खिडक्या …
Read More »शाळांमधील शिपाई पदे रद्द करण्याच्या भूमिकेचा रायगडातील संघटनेकडून निषेध
शिक्षकेतर कर्मचार्यांचे शिक्षणाधिकार्यांना निवेदन अलिबाग : प्रतिनिधी राज्याच्या शाळांमधील शिपाई संवर्गातील पदे रद्द करून ती कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून जोरदार विरोध होत आहे. रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघाने शुक्रवारी (दि. 18) शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी निवेदन …
Read More »अलिबागमध्ये ईमेज कॅलेंडर प्रकाशन सोहळा
अलिबाग : प्रतिनिधी अलिबागमधील वृत्तपत्र छायाचित्रकार यांच्या इमेज कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी (दि. 18) येथील हाटेल गुरुप्रसाद येथे आयोजित करण्यात आला. अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत इमेज कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा झाला. या वेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, जिल्हा माहिती अधिकारी …
Read More »रायगडाची वाटचाल एचआयव्ही मुक्तीकडे
संसर्गाचे प्रमाण घटले अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याची एचआयव्ही मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. जिल्ह्यात 2014-15 मध्ये एचआयव्ही संसर्गित रुग्णाची संख्या 417 (0. 68 टक्के) इतके होते. त्यात घट होऊन नोव्हेंबर 2020 पर्यंत हीच संख्या 160 (0. 3 टक्के) पर्यंत खाली आली आहे. एचआयव्ही संसर्गित गरोदर मातांच्या संख्येतही घट होत …
Read More »कुपोषणमुक्तीसाठी प्रशासन, स्वयंसेवी संस्थांचा हातात हात
अलिबाग : प्रतिनिधी – रायगडच्या दक्षिण भागातील सात तालुक्यांमधील कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था हातात हात घालून पुढे सरसावल्या आहेत. रायगड जि. प.चा एकात्मिक बालविकास विभाग, स्वदेस फाऊंडेशन आणि भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना (आयएपी) यांच्यात एक सामंजस्य करार झाला असून दक्षिण रायगड कुपोषणमुक्त करण्याचा निर्धार यानिमित्ताने करण्यात आला. …
Read More »रेवदंडा बायपासलगत कचर्याचे साम्राज्य
कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी रेवदंडा : प्रतिनिधी – रेवदंडा बायपासलगत कचर्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, तेथून ये-जा करणे धोकादायक बनले आहे. हा कचरा टाकणार्यांवर ग्रामपंचायतीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. रेवदंडा बायपास रस्त्यालगत रेवदंडा व चौल ग्रामपंचायतींनी संयुक्तपणे ‘येथे कचरा टाकू नये, कचरा टाकणार्यांवर कारवाई करण्यात येईल‘ …
Read More »अर्धवट कालवा सफाईमुळे शेतकरी संकटात
पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे माणगावमधील भातपीक धोक्यात माणगाव : सलीम शेख – काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ बंधार्याचे पाणी डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला सोडण्यात येते, मात्र यंदा या कालव्याच्या सफाईची कामे अद्यापही पूर्ण झाली नाहीत. कालव्याला पाणी सोडले नसल्याने रब्बी हंगामातील भातपीक धोक्यात येईल या भीतीने माणगाव तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. …
Read More »