Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मुरूड पोस्ट ऑफिसमधील आधारकार्ड मशिन सुरू

मुरूड : प्रतिनिधी येथील पोस्ट ऑफिसमधील आधारकार्ड बनवण्याच्या मशिनचा वापर केला जात नव्हता. ही मशिन धूळ खात पडल्यामुळे लोकांना आधारकार्डची सुविधा मिळत नव्हती. त्याबाबतचे वृत्त ‘दै. राम प्रहर‘मध्ये 25 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होताच टपाल विभागाला खडबडून जाग आली. त्यांनी मुरूड पोस्ट ऑफिसमधील बंद असलेली अधारकार्ड मशिन गुरुवार (दि. 10)पासून सुरू …

Read More »

‘रिलायन्स’विरोधात महिला आक्रमक

प्रकल्पग्रस्तांच्या ठिय्या आंदोलनाचा 15वा दिवस नागोठणे : प्रतिनिधी येथील रिलायन्स कंपनीविरोधात प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून, आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी आता रणरागिणीचा अवतार धारण केला आहे. डोळे झाकून बसलेल्या रिलायन्स व्यवस्थापनाबाबत त्या जाहीर निषेध करीत आहेत. आपल्या न्याय्य मागण्यांची तड लावण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली रिलायन्स कंपनीच्या …

Read More »

रायगडात 59 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 10) नव्या 59 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 77 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 39 व ग्रामीण 5) तालुक्यातील 44, खालापूर तीन, अलिबाग, माणगाव व सुधागड तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि उरण, कर्जत, पेण, मुरूड, रोहा व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी …

Read More »

नेरळमधील महिला पोलीस कर्मचारी लाचप्रकरणी अटक

कर्जत : बातमीदार नेरळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करू नये म्हणून आरोपी यांच्याकडून 40 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.नेरळ मधील मुस्लिम महिला विवाह होऊन मुंबई सासरी गेल्यानंतर तेथे सासरच्या मंडळीकडून झालेला छळ याचा गुन्हा नेरळ पोलीस ठाण्यात दाखल आहे.दरम्यान,या गुन्ह्यातील …

Read More »

रायगडातील 124 सरपंचपदे अनुसूचित जमातीसाठी राखीव

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील एकूण 809 ग्रामपंचायतींपैकी 33 ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी, तर 124 ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 218 सरपंचपद आरक्षित आहेत. 434 ग्रामपंचायत सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी असून, त्यातील 217 पदे महिलांसाठी राखीव आहेत. ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तालुकानिहाय जिल्ह्यातील …

Read More »

रायगडच्या समुद्रकिनारी निळ्या रंगाच्या लाटा

अलिबाग : रत्नागिरीपाठोपाठ आता रायगडच्या समुद्रकिनारीही रात्रीच्या सुमारास चमकणार्‍या निळ्या लाटांचा नजारा अनुभवायला मिळतो आहे. अलिबागजवळच्या नागाव किनारी बुधवारी रात्रीच्या सुमारास निळ्या रंगाच्या लाटा पहायला मिळाल्या. किनार्‍यावर फिरायला गेलेल्या काही तरुणांनी या लाटा पाहिल्या आणि मोबाइलमध्ये टिपल्या. लाटा  उजळून टाकणारे हे जीव आहेत प्लवंग. त्यांचे शास्त्रीय नाव नॉकटिल्युका. समुद्राच्या पाण्याबरोबर …

Read More »

कर्जतच्या शेतकर्‍याने पिकवले साडेतीन किलोचे रताळे

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील लाखरन गावामधील एका शेतकर्‍याने रताळ्याचे पीक घेतले असून त्यापैकी एका रताळ्याचे वजन तब्बल साडेतीन किलो आहे. लाखरन येथील प्रगतशील शेतकरी सूर्यकांत किसन भासे हे आपल्या शेतीवर विविध प्रयोग करीत असतात. यापूर्वी त्यांनी केळी, हळद, आले, भुईमूग आदी अपारंपारिक पिके घेऊन, ही पिके आपल्याकडे होत नाहीत, हे …

Read More »

मुरूडमध्ये पाऊस; पिकाला धोका

मुरूड : प्रतिनिधी         तालुक्यात बुधवारी (दि. 9) अचानक 15 ते 20 मिनिटे पाऊस पडल्याने कडधान्य व आंबा पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या अवकाळी पावसाने स्थानीक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात भात पीक घेतल्यानतंर मुरूड तालुक्यातील शेतकरी वाल, चवळी, मुग, मटकी, हरभरे अशा कडधान्य पिकांचे तसेच सफेद कांद्याचे उत्पादन …

Read More »

किल्ले रायगड परिसरात उत्खनन

अतिउच्च दाबाच्या वीज टॉवरलादेखील धोका महाड : प्रतिनिधीनिसर्गसंपन्न व ऐतिहासिक रायगड परिसरात गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांसाठी उत्खनन होत आहे. सध्या रायगड संवर्धनाचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारा दगड याच परिसरातून घेतला जात असून, त्याकरिता नेवाळी वाडीच्या हद्दीत उत्खनन केले जात आहे. याचा धोका रायगड परिसरातील नैसर्गिक सौंदर्याला आणि …

Read More »

‘रिलायन्स’विरोधात पावसातही ठिय्या आंदोलन

नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे परिसरात बुधवारी (दि. 9) रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. तरीही येथील रिलायन्स कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असेलेले ठिय्या आंदोलन आठशे ते हजार आंदोलनकर्त्यांनी पावसात भिजूनही चालू ठेवले. निर्णय मिळाल्याशिवाय येथून उठायचेच नाही हा त्यांनी दृढनिश्चय केला असला तरी शासन आणि रिलायन्स व्यवस्थापन यांना पाझर फुटणार तरी कधी, …

Read More »