Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

शेडुंग टोल नाक्यावर कर्जतच्या वाहनांना सूट

भाजपच्या प्रयत्नांना यश कर्जत : बातमीदार, प्रतिनिधीमुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेडुंग टोल नाका येथे कर्जत तालुक्यातील वाहनांना टोल भरावा लागत होता. त्याविरुद्ध भाजप किसान मोर्चाचे कोकण संघटक सुनील गोगटे यांनी आवाज उठविला होता. याबाबत त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर आयआरबी प्रशासन जागे झाले असून, त्यांनी कर्जतच्या वाहनांना टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय …

Read More »

खोपोलीत पाण्यासाठी संतप्त महिलांचा पालिकेवर धडक मोर्चा

खोपोली : प्रतिनिधी  नगरपालिका हद्दीतील लौजी गावात गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या महिलांनी सोमवारी (दि. 21) रिकाम्या भांड्यांसह नगरपालिका कार्यालयावर धडक दिल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. विशेषत: नगरपालिकेच्या पाणीपुरवठा खात्याच्या गलथान कारभारामुळे आम्हाला पाणी मिळत नाही, असा संतप्त महिलांचा सूर होता. अपुरा पाणीपुरवठा, अनेकदा पाण्यामध्ये किडे सापडणे असे प्रकार …

Read More »

खालापुरात चार टन गोमांस जप्त; त्रिकूट अटकेत

खालापूर : प्रतिनिधीगोवंशीय प्राण्याची कत्तल करून हे मांस विक्रीसाठी मुंबईत घेऊन जाणारा टेम्पो रविवारी (दि. 20) पहाटेच्या सुमारास खालापूर पोलिसांनी पकडला असून, तब्बल चार लाख रुपये किमतीचे चार टन मांस आणि त्याची वाहतूक करणारा टेम्पो असा एकूण साडेसात लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.या प्रकरणी मुस्ताक मोहमद हनिफ सय्यद (28, …

Read More »

वरसोली येथील मूकबधिर विद्यालयाचे काम रखडले

निधी उपलब्ध असूनही अलिबागमध्ये शासकीय अनास्था अलिबाग : प्रतिनिधीसामाजिक न्याय विभागाच्या आयुक्तांची परवानगी मिळत नसल्याने निधी उपलब्ध असूनही अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील शासकीय मूकबधिर विद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम रखडले आहे. सध्या ही शाळा भाड्याच्या जागेत चालविली जात आहे.रायगड जिल्ह्यातील मूकबधिर मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी अलिबाग तालुक्यातील वरसोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत …

Read More »

अलिबागच्या वरसोली येथील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त उत्सव

अलिबाग : प्रतिनिधी मार्गशीर्ष महिन्यात येणार्‍या षष्ठीला चंपाषष्ठी म्हणून संबोधले जाते. या दिवशी खंडोबाचा उत्सव साजरा होतो. रविवारी चंपाषष्ठीच्या निमित्ताने सर्वत्र खंडोबाचा उत्सव साजरा झाला. अलिबागेतील वरसोली कोळीवाडा येथे प्रतिजेजुरी म्हणून नावारुपाला आलेल्या खंडोबा मंदिरातही जय मल्हारचा आवाज घुमला. वरसोली कोळीवाड्यात आंग्रेकालीन खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीचा उत्सव साजरा करण्याची फार जुनी …

Read More »

माणगावात गुलाबी थंडी

कडधान्य शेतीला पूरक हवामानामुळे शेतकरी समाधानी माणगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून माणगाव तालुक्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. डिसेंबर महिना सुरू झाला तरी थंडीच्या मोसमाची प्रतीक्षा करणार्‍या माणगावकरांना गेल्या काही दिवसांत थंड हवेचा अनुभव येऊ लागला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबलेल्या पावसाने ऋतुचक्र पूर्णपणे बदलले होते. ऑक्टोबर महिन्यात पावसाळ्यासारखे …

Read More »

’सुदर्शन’कडून आदिवासींना शेळ्यांचे वाटप

धाटाव : प्रतिनिधी ’उपजीविका विकास’ उपक्रमाअंतर्गत येथील सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीजकडून रोहा तालुक्यातील धाटाव आदिवासीमधील 11 कुटुंबांना 80 शेळ्यांचे वाटप करण्यात आले.  कार्यक्रमाच्या सुरूवातीला लाभार्थ्यांचे प्रशिक्षण शिबिर  घेण्यात आले. या शिबिरात शेळीपालन व्यवस्थापन, शेळ्यांच्या विविध जाती, त्यांचा आहार, आजार आणि उपचारपद्धती याची माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रत्येकी दोन शेळ्या, चार कोकरू …

Read More »

मुक्या जनावरांसाठी आदिवासी लोकांनी बांधला वनराई बंधारा

कर्जत : बातमीदार मुक्या प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बेकरेवाडीमधील आदिवासी ग्रामस्थांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला आहे, त्यात साचून राहिलेल्या पाण्यामुळे ग्रामस्थ आनंदले आहेत. कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगर रांगेत बेकरेवाडी ही आदिवासीवाडी असून, वन विभागाच्या दळी भूखंडावर वसलेल्या या आदिवासी वाडीमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते आणि त्याचा फटका माणसापासून …

Read More »

कशेडी घाटात व्हॅन दरीत कोसळली; चौघे प्रवासी सुदैवाने बचावले

पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील धामणदिवी गावाच्या हद्दीतील एका तीव्र वळणावर चालाकाचा ताबा सुटल्याने ओमनी व्हॅन 100 फूट खोल दरीमध्ये कोसळली. सुदैवाने व्हॅनमधील चारही प्रवासी बचावले आहेत. चालक गणेश पर्वती गाडे (वय 35) हा त्याच्या ताब्यातील ओमनी व्हॅन (एमएच-12,क्यूएफ-9338) घेऊन शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी खेड येथून …

Read More »

खंडाळा घाटात दोन अपघात

चार गंभीर तर आठजण किरकोळ जखमी खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी (दि. 19) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चारजण गंभीर जखमी तर आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. एक्सप्रेस वेवरून चाललेल्या ट्रकला पाठिमागून आलेल्या कारने शनिवारी सकाळी सात वाजता धडक दिली. या अपघातात कारमधील तिघेजण जखमी झाले असून त्यातील …

Read More »