Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

श्रीवर्धनमध्ये भाजपने रणशिंग फुंकले

श्रीवर्धन : रामप्रहर वृत्त – तटकरे कुटुंबीयांनी खासदार, आमदार व महत्त्वाचे पदे स्वत:कडे ठेवली आहेत, येथील युवकांना त्यांनी जाणीवपूर्वक डावलले आहे. भाजप त्यांची घराणेशाही संपवेल आणि रयतेचे राज्य आणेल, असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी श्रीवर्धनमध्ये  केले. आगामी नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  श्रीवर्धन येथील सार्वजनिक …

Read More »

रायगडातील 229 शाळा अद्यापही कुलूपबंदच

20 शिक्षकांना कोरोनाची लागण अलिबाग : प्रतिनिधीराज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाच्या आठ महिन्यांनंतर इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सोमवार (दि. 23)पासून सुरू झाल्या, मात्र शिक्षकांच्या कोरोना तपासणीअभावी रायगड जिल्ह्यातील 644 पैकी 229 शाळा सुरूच होऊ शकल्या नाहीत. दुसरीकडे ज्या शाळा सुरू झाल्या तेथे विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती होती. दरम्यान, आतापर्यंतच्या चाचणीत 20 …

Read More »

अंबा नदीतील अडथळ्यांचे खडक होणार दूर

नागोठणे : प्रतिनिधी शहरातील गणेश विसर्जनाचा मुख्य सोहळा दरवर्षी येथील अंबा नदीवर होत असतो. या ठिकाणी असलेल्या  पुलाच्या पायथ्याशी काही वर्षांपूर्वी काँक्रीटीकरण करण्यात आले होते. ते उखडून पसरले असल्याने मूर्ती विसर्जन करताना गणेशभक्तांना त्रास सहन करावा लागत होता. नागोठणे ग्रामपंचायतीने सोमवार (दि. 23) पासून हे काँक्रीटचे खडक कॉम्प्रेसरने फोडण्याच्या कामाला …

Read More »

म्हसळ्यातील आदिवासी कुटुंबीयांना निवारा व स्वच्छता साहित्याचे वाटप

म्हसळा : प्रतिनिधी दिल्लीस्थीत इंडो-ग्लोबल सोशल सर्व्हीस सोसायटी आणि इस्लामिक रिलीफ वर्ल्डवाईड या संस्थांनी निसर्ग चक्रीवादळ बाधीत म्हसळा तालुक्यातील आदिवासी कुटुंबियांना सुमारे पन्नास लाख रुपयांच्या निवारा व स्वच्छता साहित्याच्या संचाचे वाटप केले. जूनमध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा म्हसळा तालुक्याला मोठा तडखा बसला. प्रामुख्याने जंगलाला लागून असलेल्या आदिवासी वाड्या-वस्त्या तसेच समुद्रालगतच्या कोळीवाड्यांतील …

Read More »

कर्जतमध्ये 52 जणांचे रक्तदान

कर्जत : प्रतिनिधी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल प्रखंड कर्जत यांच्या संयुक्तवतीने घाटकोपर समर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने येथील श्री कपालेश्वर देवस्थानच्या सभागृहात रविवारी (दि. 22) आयोजीत केलेल्या रक्तदान शिबिरात 52  जणांनी रक्तदान केले. श्री रामजन्मभूमी आंदोलनात हुतात्मा झालेल्या कारसेवकांच्या स्मृतीप्रित्यर्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी …

Read More »

ग्रामपंचायत निवडणूक मतदारयादीचा कार्यक्रम रद्द

अलिबाग : प्रतिनिधी एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणार्‍या तसेच काही नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि त्यासाठी राबविण्यात आलेला मतदारयादीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींची मतदारयादी व निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये 31 मार्च रोजी जिल्ह्यात एप्रिल ते जून …

Read More »

पेणमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ

पेण : प्रतिनिधी गेल्या आठवडाभर पेण तालुक्यात दररोज एक ते दोन कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र शुक्रवारी (दि. 20) थेट 14 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा भितीचे वातावरण दिसून येऊ लागले आहे. कोरोना पुर्ण नष्ट झालेला नसतानाही दिवाळीच्या तीन  दिवस अगोदर पेण शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी …

Read More »

वाढीव वीज बिलाविरोधात भाजपचे आंदोलन

कर्जतमध्ये विद्युत देयकांची जाहीर होळी कर्जत : बातमीदार तालुका भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी (दि. 23) कर्जतमधील लोकमान्य टिळक चौकात वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाढीव वीज बिल आणि बिल न भरल्यास वीज मीटर कापण्याचे सत्र महावितरण कंपनीने सुरू केले आहे. …

Read More »

रायगडात 96 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 22) नवे 96 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एकाच्या मृत्यूची नोंद झाली, तर 79 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 60 व ग्रामीण 10) तालुक्यातील 70, खालापूर आठ, माणगाव व रोहा प्रत्येकी चार, अलिबाग व सुधागड प्रत्येकी तीन, कर्जत दोन आणि पेण …

Read More »

नांदगाव हायस्कूलसमोरील अनधिकृत बांधकाम हटवले

मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील नांदगाव हायस्कूलच्या प्रवेशद्वारासमोर अतिक्रमण करून भाजी विक्रीसाठी काही शेड उभारण्यात आल्या होत्या. मात्र त्याविरोधात मुख्याध्यापकांनी उपोषणाचा इशारा देताच संबंधीतांनी या शेड तात्काळ हटवल्या आहेत. मुरूड तालुक्यातील यशवंतनगर -नांदगाव येथे श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय ही माध्यमिक शाळा  आहे. या शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील मुंबईकडे जाणार्‍या रस्त्यावर  अज्ञात इसमांनी …

Read More »