Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

दहिवली रस्त्याचे काँक्रीटीकरण करा; अन्यथा ठिय्या आंदोलन; भाजपचा इशारा

कर्जत : बातमीदार नगर परिषद हद्दीतील दहिवली येथील द. पा. डोंबे विद्यालय ते श्रीराम पूल या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्जत येथील उपअभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दहिवलीतील डोंबे विद्यालय ते श्रीराम पूल या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था …

Read More »

पाचाड आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. येथील बंद दूरध्वनी, पाणीटंचाई, भंगार वाहन, मोडकळीस आलेल्या कर्मचारी वसाहती अशा अनेक समस्यांना या केंद्रातील कर्मचार्‍यांना तोंड द्यावे लागत आहे. या ठिकाणी शासकीय खर्च होत असला तरी तो वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे. ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी …

Read More »

माथेरानमध्ये प्रेमीयुगुल अपघातात जखमी

कर्जत : बातमीदार माथेरान फिरून घरी परतत असताना दोन प्रेमीयुगलांच्या दुचाकीने समोरून येणार्‍या वाहनाला धडक दिल्याची घटना माथेरान घाटात घडली आहे. या अपघातात दुचाकी चालवणार्‍या प्रियकराला जबर मार बसला असून त्याला पुढील उपचारासाठी बदलापूर येथे हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहिती नुसार हे प्रेमी युगल माथेरान फिरण्यासाठी रविवारी आले होते. माथेरान …

Read More »

स्कूल बसचालकांचे पेणमध्ये धरणे आंदोलन

पेण : प्रतिनिधी रायगड जिल्हा शालेय विद्यार्थी वाहतूक वाहन चालक मालक संघ या संघटने तर्फे संघटनेचे संस्थापक हरीश बेकावडे व अध्यक्ष बा. म. बिराजदार यांच्या उपस्थितीत पेण तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करुन तहसीलदार अरुणा जाधव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. रायगड जिल्ह्यात विद्यार्थी वाहतूक संघटनेचे सुमारे 700 सभासद …

Read More »

‘मुरूडमध्ये हमीभाव केंद्र सुरू करा; अन्यथा जन आंदोलन’

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यात हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने मुरूड तालुक्यातील शेतकरी नाराज झाले असून, येत्या आठ दिवसात भात खरेदी केंद्र सुरु झाले नाही तर सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून जन आंदोलन करतील असा इशारा किसान क्रांती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीधर जंजीरकर यांनी दिला आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यांत एकूण …

Read More »

पेण न. प.च्या विविध विषय समिती सभापतींची निवड

पेण : प्रतिनिधी पेण नगरपरिषदेच्या बांधकाम समिती सभापतीपदी दर्शन बाफना, कर व शुल्क समिती सभापतीपदी सुहास पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी तेजस्विनी नेने, शिक्षण, क्रीडा व पाणीपुरवठा समिती संभापतीपदी राजेश म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या विविध विषय समिती सभापती पदाची निवडणूक मंगळवारी (दि. 15) तहसीलदार तथा …

Read More »

चक्रीवादळातील वाताहतीकडे दुर्लक्ष; नांदगाव, चाफेवाडी, ओलमणमधील आरोग्य उपकेंद्रे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

कर्जत : बातमीदार निसर्ग चक्रीवादळात कर्जत तालुक्यातील प्राथमिक शाळा आणि आरोग्य उपकेंद्रांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र त्याकडे बघायला कर्जत पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषद यांना वेळ नाही. त्यामुळे  तालुक्यातील नांदगाव, चाफेवाडी आणि ओलमण येथील आरोग्य उपकेंद्रे आजही नवीन छपराच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जत तालुक्यात 3 जून 2020 मध्ये …

Read More »

रोह्यात कचर्‍याचे साम्राज्य

धाटाव : प्रतिनिधी रोहा शहरातील तहसील कार्यालय, पोलीस ठाणे आणि  वनविभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. तेथील कचरा कुजून परिसरात दुर्गंधी भरून राहिली आहे, मात्र त्याकडे कानाडोळा करून रोहा नगरपालिका रोगराईला आमंत्रण तर देत नाही ना, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.  राज्यासह संंपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान …

Read More »

रायगडातील शेतकरी अद्यापही शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत

अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये 28 हजार 621 आणि निसर्ग चक्रीवादळात 11 हजार 371 असे एकूण 39 हजार 992 हेक्टरवरील कोरडवाहू शेतीचे नुकसान झाले. निसर्ग चक्रीवादळात 11 हजार 281 हेक्टर फळ बागायतींना हानी पोहचून जिल्ह्यातील 84 हजार 344 शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी 44 …

Read More »

जेलीफिशमुळे मच्छीमारांची डोकेदुखी वाढली

मुरूड : प्रतिनिधी मासळी पकडण्यासाठी मच्छीमारांनाखोल समुद्रात जावे लागते. मात्र मासळीच्या जाळ्यात सध्या जेलीफिश मोठ्या प्रमाणात अडकत असल्याने स्थानीक मच्छीमारांची डोकेदुखी वाढली आहे. जेलीफिशच्या स्पर्शाने हाताला खाज व सूज येत असल्याने मच्छीमारांच्या आरोग्याचा धोका वाढला आहे. जेलीफिश हे माशांची अंडी आणि पिल्लांना खातात. त्यामुळे सागरी मत्स्य साठ्यावर आणि वाढीवर परिणाम …

Read More »