Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

द्रुतगती महामार्गावर सहा गाड्या एकमेकांवर आदळल्या

जीवितहानी नाही; वाहनांचे मात्र नुकसान खालापूर : प्रतिनिधी मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रविवारी (दि. 22) सकाळी सहा गाड्या  एकमेकांवर आदळल्या. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. दिवाळीच्या सणानंतर सुट्टी संपल्याने द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर रविवारी सकाळी वाहनांची मोठी गर्दी होती. आडोशी …

Read More »

म्हसळा नगरपंचायतीचा अजब कारभार

भारतीय जनता पक्षाने केले सर्वेक्षणाचे आवाहन म्हसळा : प्रतिनिधी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात म्हसळा, तळा व माणगाव या तीनही नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. तीनही नगरपंचाय तीवर राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीची एकहाती सत्ता आहे, मात्र तेथे स्थानिक विकासाचं उद्दिष्ट किती पूर्ण झालं याचा अभ्यास त्या त्या …

Read More »

अखेर जंजिरा किल्ला खुला

पर्यटकांसह स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण मुरूड ः प्रतिनिधीआठ महिन्यांपासून बंद असलेला जंजिरा किल्ला अखेर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. सोमवार (दि. 23)पासून येथून जलवाहतूक सुरू होणार असल्याने स्थानिक व्यावसायिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, मार्च महिन्यापासून किल्ला बंद असल्याने परिसरात झाडेझुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने सरपटणार्‍या प्राण्यांपासून पर्यटकांनीदक्ष राहण्याचे आवाहन करण्यात …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांनी धरले एमएसआरडीसीच्या अधिकार्‍यांना धारेवर

राज्य महामार्गाचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश सुधागड ः प्रतिनिधीवाकण-पाली-खोपोली या राज्य महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम ठप्प आहे. या संदर्भात पाली विश्रामगृहात झालेल्या बैठकीत आमदार रविशेठ पाटील यांनी एमएसआरडीसीचे अधिकारी व ठेकेदारांना धारेवर धरले. त्यानंतर मंगळवार (दि. 24)पासून रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. या वेळी सुधागड तालुक्यातील इतरही समस्यांचा …

Read More »

माथेरानमध्ये पत्रकाराला मारहाण; पोलिसाविरोधात तक्रार दाखल

कर्जत : बातमीदार – माथेरानमध्ये पोलिसाकडून पत्रकारास मारहाण प्रकरणी पत्रकार आक्रमक घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास माथेरानमध्ये दमदाटी करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या प्रकरणी मारहाण करणार्‍या पोलिसाविरोधात सर्व पत्रकार आक्रमक होऊन पोलीस ठाण्यात धडक देऊन पोलिसाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. 20 नोव्हेंबरला रात्री …

Read More »

रायगडात सोमवारपासून उघडणार 545 शाळांची कवाडे  

पालकांची मात्र ‘नकारघंटा’ अलिबाग : प्रतिनिधीराज्य शासनाच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यातदेखील पनवेल महापालिका क्षेत्र वगळता इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवार (दि. 23)पासून सुरू होणार आहेत. शिक्षण विभागामार्फत शिक्षकांची कोविड आरसीपीटीआर चाचणी, शाळांचे सॅनिटायझेशन सुरू आहे. पाल्याला शाळेत पाठविण्यासाठी पालकांनी हमीपत्र द्यावे असा तगादा आता शाळांमधून लावला जात असून, त्याकरिता …

Read More »

अलिबागेत पतसंस्थांच्या पदाधिकार्यांसाठी चर्चासत्र

अलिबाग : प्रतिनिधी स्पर्धेच्या युगात पतसंस्थांनी ग्राहकांना तप्तर सेवा देणे गरजेचे असून एनईएफटी, आरटीजीएस, एसएमएस सेवा देता आली पाहिजे, असे प्रतिपादन ‘नेटविन‘ चे मार्केटिंग मॅनेजर जगदिश सूर्यवंशी यांनी अलिबाग येथे केले. राष्ट्रीय सहकार सप्ताह निमित्त अलिबाग येथे  तालुक्यांतील सहकारी पतसंस्थांच्या संचालक, पदाधिकार्‍यांसाठी  चर्चासत्र घेण्यात आले. त्यात जगदिश सूर्यवंशी बोलत होते. …

Read More »

बोंबल्या विठोबाची यात्रा रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय खालापूर : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा खालापूर तालुक्यातील साजगाव येथील बोंबल्या विठोबाची यात्रा होणार नसल्याची माहिती खोपोली नगरपालिका व विठोबा मंदिर देवस्थान समितीच्या बैठकीत देण्यात आली. धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध असणार्‍या साजगाव येथील विठ्ठल रखमाई मंदिर परिसरात दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक कृष्ण एकादशी या …

Read More »

पालीत माकडांचा उच्छाद

उपद्रव व हल्ल्यांमुळे नागरिक हैराण पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याती पाली गावात माकड व वानरांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. काही लोकांवर देखील या माकडांनी हल्ले करून जखमी केले आहे. या उपद्रवी माकडांचा लवकरात लवकर बंदोबस्त झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल, असे मत स्थानिक रहिवाशी व्यक्त करत आहेत. पालीमधील राम आळी, …

Read More »

रायगडात 133 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 20) नव्या 133 कोरोना पॉझिटिव्ह आणि चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर 102 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 90 व ग्रामीण 12) तालुक्यातील 102, पेण 14, माणगाव पाच, उरण, अलिबाग व रोहा प्रत्येकी तीन, श्रीवर्धन दोन आणि खालापूर तालुक्यातील एकाचा समावेश …

Read More »