Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पतीच्या निधनानंतर आठवडाभरात पत्नीचाही मृत्यू

कर्जत : बातमीदार – आंबेडकरी चळवळीत काम करणारे नेरळ येथील कार्यकर्ते लक्ष्मण जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर दोन आठवड्यांतच त्यांच्या पत्नी कलावती यांचीही कोरोनाच्या संसर्गाने जीवनयात्रा संपली. या घटनेने जाधव कुटुंबावर दुःखाची छाया पसरली आहे. लक्ष्मण जाधव यांचे 13 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेे. निधनानंतर त्यांचे …

Read More »

पत्रकार संतोष पवार मृत्यू प्रकरण : कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांची अखेर उचलबांगडी

कर्जत : बातमीदार – माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचा 9 सप्टेंबर रोजी आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्य शासनाने मृत्यूस कारणीभूत असलेल्या सर्वांवर कारवाई होईल, असे जाहीर केले होते, मात्र 20 दिवसांत कोणतीही कारवाई झाली नसल्याने पत्रकार आक्रमक झाले. ते पाहून अखेर या प्रकरणाला गती मिळाली …

Read More »

रायगड जिल्ह्यात एकाच दिवशी 25 रुग्णांचा मृत्यू; 407 नवे पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 1) 25 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 407 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 531 रुग्ण बरे झाले आहेत. मयत रुग्णांमध्ये पनवेल (मनपा सहा व ग्रामीण सहा) तालुक्यातील 12, खालापूर पाच, उरण दोन, कर्जत, पेण, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. …

Read More »

शेतातील भाजीपाला ग्राहकांच्या दारी

माणगाव ः प्रतिनिधी शेतकर्‍यांच्या शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांच्या दारी या संकल्पनेसाठी निर्धार सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊन काळात शेतकर्‍यांच्या शेतातील भाजीपाला व अन्य वस्तू विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या होत्या. या काळात शेतातील भाजीपाल्याचे नुकसानही झाले होते. ग्राहकांनाही भाजीपाला योग्य व वेळेत उपलब्ध होत नव्हता. …

Read More »

सरपंचपदी कुणाल पाटील, तर उपसरपंचपदी प्रमिला म्हात्रे; कणे ग्रामपंचायत निवडणूक

पेण ः प्रतिनिधी कणे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या वेळी निवडणुकीत एका सदस्याचे मत बाद झाल्यानंतर सात सदस्यांपैकी सहा सदस्यांची सहा मते अशा प्रकारे दोन पक्षांच्या चार उमेदवारांना प्रत्येकी तीन-तीन मते मिळाली. या वेळी ही निवडणूक बरोबरीत झाल्यावर अधिकारी डी. एस. साळुंखे यांनी चिठ्ठी काढून निर्णय …

Read More »

खालापुरात जनावरे चोरणारी टोळी सक्रिय

खालापूर ः प्रतिनिधी तालुक्यातील दस्तुरी येथून चोरीला गेलेली म्हैस कत्तल करून मांस नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे. दस्तुरी येथील शेतकरी भाऊ बाबू शेडगे यांनी म्हैस चोरीला गेल्याची तक्रार खोपोली पोलीस ठाण्यात दिली होती. मंगळवारी म्हशीची कत्तल करून तिचे मांस घेऊन अज्ञात चोरटे पसार झाल्याचे उघडकीस …

Read More »

जातीनिहाय जनगणना व्हावी; कर्जत तालुका आगरी समाज संघटनेची मागणी

कर्जत ः बातमीदार आगामी 2021मध्ये होणारी जनगणना ही केंद्र व राज्य सरकारने नेमलेल्या विविध समित्यांच्या शिफारसीनुसार जातीनिहाय करावी, अशी मागणी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. आपल्या मागणीचे निवेदन संघटनेच्या वतीने कर्जत तहसीलदारांना देण्यात आले असून आगरी समाज संघटनेने मराठा समाजाला यापूर्वी दिलेले शैक्षणिक आणि नोकरीबाबतचे आरक्षण …

Read More »

धरमतर खाडीचा संयुक्त पाहणी दौरा

पेण ः प्रतिनिधीधरमतर खाडीतील मच्छीमारांवरील अन्याय, नुकसानभरपाई व पुनर्वसन अशा अनेक मागण्यांसंदर्भात पेण व अलिबाग तालुक्यातील धरमतर खाडीच्या किनारपट्टीवर असलेल्या 47 गावांतील रहिवाशांच्या मागणीमुळे 21 फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार डॉ. विवेक वर्तक, शास्त्रज्ञ खारजमीन संशोधन केंद्र, पनवेल यांच्या अध्यक्षतेखाली धरमतर खाडी व कोकणातील इतर खाड्ड्यांत मत्स्यव्यवसाय व प्रदूषणविषयक अभ्यासासाठी समिती गठीत …

Read More »

कारमध्ये गुदमरून चिमुकल्यांचा मृत्यू

महाड ः प्रतिनिधीमहाडमधील एका भंगाराच्या गोदामामधील बंद कारमध्ये अडकून दोन बालकांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी 7 वाजता खेळायला गेलेली मुले आली नसल्याने भयभीत झालेल्या पालकांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी शोध सुरू केला असता घराजवळील भंगार गोदामात उभ्या असलेल्या कारमध्ये ही दोन मुले अत्यवस्थ स्थितीत आढळली.  सोहेल जकात …

Read More »

विकास हीच भाजपची परिभाषा : आमदार प्रशांत ठाकूर

पेणमधील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये पेण : प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा देशाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून ते कोणीही कोणत्या जाती-धर्माचा असो वा कोणत्या प्रातांचा असो विकास हीच परिभाषा समोर ठेवून काम करीत आहेत. पक्षाची वाटचालही त्या दृष्टीनेच सुरू आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »