Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगड जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्तपदी पदोन्नती

अलिबाग ः रामप्रहर वृत्त रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी पदी ऑगस्ट 2021मध्ये नियुक्त झालेल्या डॉ. कल्याणकर यांच्याकडे मागील काही महिन्यांपासून कोकण आयुक्तपदाचा जादा भार सोपविण्यात आला होता. त्यानंतर पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या डॉ. कल्याणकर यांची शासनाने पदोन्नती करण्यात आली आहे. डॉ. …

Read More »

आजपासून रायगडात पोलीस भरती

संपूर्ण मैदानात सीसीटीव्ही कॅमेरे अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पोलीस भरतीला मंगळवारपासून (दि. 3) अलिबागेत पोलीस मुख्यालयात सुरुवात होणार आहे. ही भरती प्रक्रिया 22 जानेवारीपर्यंत सुरू राहील. पोलीस शिपाई पदाकरीता 19176 तर चालक पोलीस शिपाई पदांकरीता 647 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. भारती प्रक्रिया पारदर्शक व्हावी व कोणताही अनुचित पराक्र घडू …

Read More »

मुरुड नगर परिषदेसमोर कोळी समाज ठिय्या आंदोलन करणार

मुरुड :  प्रतिनिधी मुरुड शहरातील जुना पाडा महादेव कोळी समाज मुरुड सिटी सर्वे नंबर 65़ ड 2 या कोळी लोकांचे बिन आकारी होळीचे मैदान असून येथे मुरुड नगरपरिषदेचे गटाराचे बांधकाम सुरु असतानाच काळ भैरव देवस्थान मंदिर ट्रस्ट भंडारी समाज मुरुड यांनी गटाराच्या मूळ बांधकामात अनधिकृतपणे लोखंडी खांब उभे केले आहेत. …

Read More »

छत्रपती संभाजीराजेंबद्दल अवमानजनक विधान

खोपोली भाजपतर्फे विरोधी पक्षनेते अजित पवारांचा निषेध खोपोली : प्रतिनिधी छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते असे अवमानजनक विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 2) खोपोली भारतीय जनता पक्ष, महिला मोर्चाच्या वतीने दीपक चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज व …

Read More »

नागोठणे बंदला शंभर टक्के प्रतिसाद

नागोठणे : प्रतिनिधी सतत होणारे धर्मांतर, लव्ह जिहाद तसेच मुरूड येथील प्रकरणातील आरोपी मोकाट फिरत असल्याच्या निषेधार्थ नागोठणे विभाग सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने सोमवारी (दि. 2) शहर बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला अत्यावश्यक सेवा वगळता 100 टक्के प्रतिसाद लाभला. मुरूड येथील चंदन जैन यांचा काही दिवसांपूर्वी अकस्मित …

Read More »

रायगडातून परतताना पर्यटकांचे हाल

रस्त्यांवर वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा अलिबाग ः प्रतिनिधी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्ष स्वागतासाठी रायगडात आलेल्या पर्यटकांचे परतीच्या प्रवासात चांगलेच हाल होत आहेत. एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या त्याही अपुर्‍या पडल्या. तिकीट काढण्यासाठी अलिबाग एसटी स्टँडवर प्रवाशांची मोठी रांग लागली होती. खासगी प्रवासी वाहतूक करणारे पर्यटकांकडून अव्वाच्या …

Read More »

मुरूडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील तिसले आदिवासीवाडीजवळील जंगलात रविवारी (दि. 1) सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. दिलीप भोईर (वय 45, रा. उंडरगाव) असे जखमीचे नाव असून त्यांच्यावर मुरूड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मुरूडच्या फणसाड अभयारण्यात विविध वन्यजीव आहेत. त्यामध्ये बिबट्यांची संख्या अधिक आहे. सुमारे …

Read More »

पेणमध्ये उपसरपंचपदासाठी मोर्चेबांधणी

  आज निवडप्रक्रिया पेण: प्रतिनिधी पेण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीपैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली. तालुक्यात 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीत पार पडल्या. आता तालुक्याच्या ग्रामीण भागातील राजकीय वर्तुळाचे लक्ष उपसरपंच निवडीकडे लागले आहे. या पदासाठी इच्छुक सदस्यांनी फिल्डींग लावली असली तरी निर्णायक स्थितीत सरपंचाच्या विशेष अधिकाराला महत्व असणार आहे. तालुक्यातील उपसरपंचाची निवड …

Read More »

चौक, खालापूर पोलिसांची गस्त; धुंद चालकांवर कारवाई

  चौक : प्रतिनिधी रात्री अपरात्रीपर्यंत मौजमजेसाठी सरकारने वेळ द्यायचा आणि त्यांचे रक्षण पोलिसांनी ठेकेदार बनून करायचे हे कुठवर चालणार? असा प्रश्न पडतो. नव्या वर्षाच्या स्वागताला आपल्या परिवारासह लोक बाहेर पडतात आणि त्यांचे रक्षण पोलीस करताना दिसत आहेत. तसेच यावेळी कांही धुंंद वाहन चालकांवर कारवाईही केली. काल दुपार पासूनच राष्ट्रीय …

Read More »

गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी!

पाली-खोपोली मार्गावर वृक्षतोडीमुळे सावली हरपली पाली : प्रतिनिधी पाली-खोपोली महामार्ग हा वाहतुकीच्या व प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. खोपोली-वाकण महामार्ग हा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडणारा एक महत्वाचा दुवा असल्याने या महामार्गावर रहदारी करणा-या वाहनांची संख्या मोठी आहे, मात्र या मार्गाची स्थिती पाहता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी अशी …

Read More »