रेवदंडा : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागाव ग्रामपंचायत हद्दीत जनता कर्फ्यू पाळण्यात येत असून, पहिल्याच दिवशी येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे शुकशुकाट पहायला मिळाला. कोरोना विषाणूची साखळी तुटावी यासाठी नागावमध्ये 2 ते 6 जुलैदरम्यान बंद आहे. शेजारील गावात कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्याने खबरदारी म्हणून हे पाऊल …
Read More »रायगडात सहा जणांचा मृत्यू; 247 नवीन रुग्ण
पनवेल : रायगड जिल्ह्यात गुरुवारी तब्बल 247 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला, तर 109 रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात 115, पनवेल ग्रामीणमध्ये 67, रोहा 16, खालापूर 14, पेण 13, अलिबाग 12, कर्जत सहा आणि उरणमध्ये चार रुग्ण आढळले. रायगडात कोरोना रुग्णांची एकूण संख्या …
Read More »तीन दिवसांच्या बंदनंतर कर्जत बाजारपेठेत झुंबड
कर्जत ः प्रतिनिधीकर्जत तालुक्यात कोरोनाचा ससेमिरा सुरूच आहे. दररोज कोरोनाग्रस्तांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना पसरला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जतच्या व्यापारीवर्गाने 29, 30 जून व 1 जुलै असा तीन दिवस कडकडीत बंद पाळला, मात्र गुरुवारी (दि. 2) बाजारपेठ उघडल्यानंतर कर्जत बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.तालुक्यात …
Read More »कारखान्यांमुळे कोरोनाग्रस्त रुग्णांत वाढ; व्यवस्थापनावर लगाम घालण्याची मागणी
खोपोली : प्रतिनिधी खालापूर खोपोली शहरात सह अन्य ठिकाणी कारखाने पूर्वी प्रमाणेच सुरू झाल्याने या कारखान्यात व्यवस्थापन विभागात काम करणारे काही कर्मचारी, अधिकारी हे कोरोनाग्रस्त तालुक्यासह मुंबई-पुणे या भागातून खोपोली खालापुरात येतात. परिणामी या रूपाने कोरोनाचे शिरकाव करून कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे. खालापूर तालुक्यात व खोपोली शहरात …
Read More »डॉक्टर्स डेनिमित्त डॉक्टरांचा सत्कार
मुरूड ः प्रतिनिधी – रोटरी क्लब ऑफ अलिबाग सी शोअरने डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून अलिबागमधील मान्यवर डॉक्टरांचा तसेच अलिबाग जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णांची सुश्रुषा करण्यात महत्त्वाचा वाटा असणार्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कामगारांचा सत्कार केला. गेली 40-45 वर्षे अलिबाग व जिल्ह्यातील रुग्णांना अविरत सेवा देणार्या फिजिशियन डॉ. जॉर्ज मथाई, …
Read More »रायगड चाइल्ड लाइनकडून आदिवासींना मदतीचा हात
कर्जत ः बातमीदार – केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या मान्यतेने आणि दिशा केंद्र सामाजिक संस्थेच्या समन्वयाने रायगड जिल्ह्यात कार्यरत रायगड चाइल्ड लाइन 1098 या प्रकल्पाच्या वतीने कर्जत तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. त्या अनुषंगाने बीड (बू)वाडी व खाणीच्या वाडीतील आदिवासी कुटुंबांना धान्याचे वाटप करीत त्यांनी सामाजिक बांधिलकी …
Read More »माणगाव शहरात जनता कर्फ्यूला नागरिकांचा प्रतिसाद
माणगाव ः प्रतिनिधी – माणगाव नगरपंचायत हद्दीत कोरोना रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीकडे गांभीर्याने लक्ष देत नगरपंचायत हद्दीतील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, व्यापारी तसेच ग्रामस्थांनी एकत्रित येऊन 29 जून ते 3 जुलैपर्यंत जनता कर्फ्यूचा एकमुखी निर्णय घेतला आहे. या जनता कर्फ्यूला सलग चौथ्या दिवशी गुरुवारी नागरिक आणि व्यापार्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या …
Read More »कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
कुंडलज वांजळे येथील कुटुंबाला मिळाला न्याय कर्जत ः बातमीदार – बाळंतपणासाठी आलेल्या गरोदर महिलेचे बाळ मृत अवस्थेत जन्मल्यानंतर महिलेला झालेला रक्तस्त्राव रोखण्यात कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर अयशस्वी ठरले होते. त्यात दोघांचे बळी गेल्याने डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली होती. दरम्यान, त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला असून दोन महिन्यांनी सदर …
Read More »‘चक्रीवादळग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे चुकीचे’
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात काही ठिकाणी चक्रीवादळग्रस्तांच्या नुकसानीचे चुकीच्या पद्धतीने पंचनामे करण्यात आले आहेत तसेच चुकीच्या लोकांना मदत निधी दिला गेल्याची कबुली म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी मंगळवारी (दि. 1) येथे दिली. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पंचनामे व मदत वाटपात झालेला प्रकार जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास …
Read More »श्रीवर्धनमधील जीवना कोळीवाडा अंधारात
महिनाभरानंतरही वीजपुरवठा खंडित; नागरिक हैराण श्रीवर्धन : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळ होऊन आता महिना उलटायला आला तरीही श्रीवर्धन तालुक्यातील जीवना कोळीवाड्यातील वीजपुरवठा खंडितच आहे. मुख्यमंत्री, अन्य मंत्री तसेच खासदार व बडे नेेते जिल्ह्याचा दौरा करून गेले, मात्र श्रीवर्धनची विद्युतसेवा पूर्ववत करण्यात राज्य शासन आणि महावितरणला अद्यापही यश आले नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त …
Read More »